जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिसत होती. अशा वेळी कोणते उपाय करण्यासारखे आहेत हा विषय आम्ही तिथे चिंतीत असूं. परंतु जेलमधून सुटून आल्यानंतर थोडयाच दिवसात जपान आणि अमेरिका युद्धांत पडून आधींची च कठिण परिस्थिति अधिक च कठिण झाली. त्यामुळे जेलमध्ये करून ठेवलेले कांहीं विचार अपुरे पडले, तर काहीं दृढावले. ह्या युद्धाला विरोधी कारणे देतांना पहिले कारण युद्धाची हिंसकता, दुसरे कारण उभयपक्षी न्यूनाधिक पण साम्राज्यवादी तृष्णा, तिसरें हिंदुस्थानची संमति न घेणे, अशी तीन कारण आम्ही देत असूं. परंतु जपान आणि अमेरिका यांच्या प्रवेशानंतर आतां बहुतेक सबंध जग च युद्धांत पडल्यासारखें झालें. अर्थात् आतां हैं युद्ध मानवाच्या हातांत न राहतां उलट युद्धाच्या च हातांत मानव गेला असल्यामुळे हैं युद्ध स्वैर किंवा मूढ आहे हा एक नवा मुद्दा निर्माण झाला. वासुदेव कॉलेजमध्ये * बोलतांना त्यावर च मीं मुख्य उभारणी केली होती.
परंतु अशा रीतीनें जगांतील सगळी मोठीं राष्ट्र युद्धांत सामील झाल्या- नंतर हिंदुस्थान, जो मूळचा च दरिद्री आणि विषम परिस्थितींतला, तो अधिक च विषम परिस्थितींत आतां जात आहे. इंग्रजी राज्य येण्यापूर्वी हिंदुस्थान स्वावलंबी होता. इतकेच नव्हे तर आपली गरज पुरवून पर" देशाला हि तो थोडाफार पुरवठा करीत होता. परंतु आज पक्कया मालाच्या * 'युद्धाचे टोणपे लक्षण' हें तें व्याख्यान होय.
- बाबतीत हिंदुस्थान जवळ जवळ पूर्ण परावलंबी झालेला आहे. राष्ट्रीय रक्षणाची साधनें, युद्धविषयक सरंजाम वगैरे बाबतींतल्या परावलंबनाची गोष्ट मी बोलत नाहीं — यद्यपि अहिंसेचा मार्ग मोकळा नसल्यास राष्ट्र-बुद्धीनें विचार करायचा तर ही हि बाब चिंतावी लागते च-परंतु जीवनोपयोगी नेहमींच्या मालासंबंधी मी बोलत आहे. असा माल आज हिंदुस्थानांत होत नाहीं आणि बाहेरून तो तूर्त कमी च येऊ शकेल. लढणारी राष्ट्र युद्धोपयोगी सामान च निर्मिण्याच्या फिकरींत असणार, त्यामुळे बाहेर पाठविण्यासाठीं माल त्यांच्यापाशीं कमी तयार होणार, आणि इतक्याउपर जो माल तयार - होईल तो दुसऱ्या राष्ट्रांना न पोचावा अशी व्यवस्था शत्रु राष्ट्रे करणार ! अमेरिकेचा माल येऊं लागल्यास जपान तो बुडवीत राहील आणि जपानचा माल तर येऊच शकणार नाहीं. अशा रीतीनें बाहरेचा पक्का माल येण्याचें -मंदावलें किंवा थांबले तर हिंदुस्थानची दशा अतिशय दीनवाणी होईल. नवीन पक्का माल इथे च बनविण्यासंबंधी सरकार कदाचित् हेतुपूर्वक न .म्हटलें तरी पारीस्थितीच्या निमित्तानें पण उदासीन राहील. लढाईत सर्व चित्त गुंतल्यामुळे दुसऱ्या गंभीर योजना सुचर्णे कठिण. जो कांहीं गांभीर्य-पूर्वक विचार व्हायचा तो युद्धविषयक च व्हायचा. हिंदुस्थानचें कसें तरी रक्षण- आणि रक्षण म्हणजे इंग्रजांच्या हातांत तो टिकून राहणें-झार्ले म्हणजे पुरें, - अशीच सरकारची मनोवृत्ति राहिली तर त्यांत कांहीं नवल वाटायला नको.
अशा स्थितीत आम्हां कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी येऊन पडते. 'एरवीं, खादीचा खप फारसा होत नाहीं, त्यासाठी लोकांची मनधरणी करावी लागते, असा लोकांवर आक्षेप होता. आतां हल्लींच्या युद्धाच्या परिस्थितीत, आम्ही लोकांना खादी पुरवूं शकत नाहीं, असा आक्षेप आमच्यावर येणार आहे. अशा संकटकाळांत जर खादीला आपण चालना देऊ शकलों नाहीं, तर खादीविषय भविष्यकाळी आशेला फार थोडी जागा उरणार आहे. जाजूसाहेबांनीं 'खादी जगत्' मध्ये नुकतीच एक योजना मांडली आहे तींत त्यांनी हे पटवून दिलें आहे की सरकारला दुसरे जे कांहीं उद्यो बेकारांना देतां येतील ते देऊन हि शार्क हार खाईल आणि भूक शिल्लक उरेल तर तितक्या अंशाने खादीला वाव देणे सरकारचें कर्तव्य आहे. कसल्या
हि सरकारला खादीचें है कार्यक्षेत्र प्रायः कबूल करावे लागेल. पण ही योजना म्हणजे उघड च जिथे आपला प्रवेश होत नाहीं अशा ठिकाणीं हिकमतीन आपलें गांठोडे ठेवून देण्यासारखे आहे. आमचें घर बळकावून बसलेल्या माणसाला म्हणायचे की " बाबा ! घर तुझें च सही, पण तें तुला अगर्दी भरलेले वाटतें तसें नाहीं. ती त्या पलीकडच्या कोपऱ्यांत थोडी रिकामी जागा दिसते आहे. हे माझे गांठोर्डे तिथे राहू दे." आणि कर्मीत कमी अपेक्षित सद्गुणांवर हा हल्ला असल्यामुळे त्याचा परिणाम व्हायला च पाहिजे.
परंतु अशा रीतीची दुष्काळी खादी हा खादीचा पाया नव्हे. आज जी खादीची उत्पत्ति - विक्री चालली आहे, तो हि तिचा पाया नव्हे. तो एक इमारतीचा भाग जरूर आहे. खादीच्या अंतिम योजनेमध्ये हि उत्पत्ति- विक्रीचा भाग राहील आणि आजच्यापेक्षां तो पुष्कळ च जास्त राहील. परंतु. संपूर्ण योजनेंतलें तें एक अंग झाले, तसेंच आज जे ठिकठिकाणीं वस्त्र- स्वावलंबन चालले आहे, कुठे या गांवांत चार वस्त्रस्वावलंबी लोक, कुठे त्या तालुक्यांत शेंदोनशें, असें ठिकठिकार्णी करीत जायचे, त्यानें हि आपलें मुख्य काम होत नाहीं. तें म्हणजे ठिकठिकाणी चौकांत म्युनिसिपालिटीचे दिवे लावल्यासारखे आहे. त्याचा हि उपयोग आहे च. त्याने सगळीकडचे. वातावरण प्रकाशित राहील. परंतु चौकांतले दिवे घरांतल्या दिव्यांचे काम करीत नाहींत. म्हणून हे असले विखुरलेले वस्त्रस्वावलंबन हि खादीचे मुख्य कार्य नव्हे. शेतकरी आपल्या शेतांत धान्य काढतो तसा आपला कपडा. त्यानें घरीं च काढावा, हा खादीचा पाया आहे.
सुरवातीला च हें काम कदाचित् जमलें नसतें म्हणून आपण वेगळ्या रीतीनें खादीची उभारणी केली, तें हि ठीक झालें. त्यानें खादीला चालना मिळाली. आणि थोडीफार खादी आपण देऊ शकल. परंतु आतां लोकांची खादीची मागणी वाढेल, आपण ती आजच्या पद्धतीनें पुरखूं शकणार नाहीं. अशा स्थितींत जर आपण लाचार होऊन स्वस्थ बसलो तर आपल्यावर दोष येईल आणि तसा तो आला तर न्यायानें च येईल. कारण खादीला वीस वर्षांचा
अवकाश मिळून चुकला आहे. हिटलरने वीस वर्षात पडलेलें राष्ट्र उभ केलें... १८ साली जर्मनीचा पुरा पराभव झाला आणि ३८ सालीं तें पहिल्या दर्जाचें राष्ट्र म्हणून उभे झाले. रशियानें जें बळ कमावलें तें हि गेल्या वीस वर्षात च कमावलें. एवढ्या काळांत त्यानें एक नवीन विचाराची आणि आचाराच जगाला आकर्षिण्यासारखी प्रणाली रचली. खादीला हि अर्शी च वीस वर्षे.. संधि मिळाली असे मानले जाईल. एवढ्या अवकाशांत खादी विशेष चम- त्कार करूं शकली नाहीं याला कारणे पुष्कळ आहेत. आणि म्हणून जर्म- नीशी किंवा रशियाशी तोलून आपण आपणाला हिणवून घ्यायची जरूर नाहीं. तरी पण अशा संकटाच्या काळी जर आपण लाचार झालों तर मग मी मघां म्हटल्याप्रमाणे खादीसाठी एक कोपरा दाखवून तेवढ्यावर संतुष्ट व्हावे लागेल, पण मग खादीची मुख्य दृष्टि-जिला अहिंसेंच्या योजनेंत केंद्रस्थान आहे – सोडल्यासारखी होईल. खादीचे आणि अहिंसेचें नातें हिंदुस्थानांत तरी अतूट समजलें पाहिजे.
खादीची लोकांची मागणी वाढली म्हणजे आपण लोकांना सांगणार- 'सूत कांता ' तर ते म्हणतील, 'आम्हांला पेळू पुरवा ' आणि आपल्या. चळवळींतला पेळू हा एक मोठा द्वाड भाग आहे. पेळूच्या पुढचे भाग त्या मानाने सोपे आहेत, परंतु पेळूचा प्रश्न शास्त्रीय किंवा लौकिक रीतीनें हि- आपण अजून सोडविला नाहीं. मग लोकांना सांगावें लागणार की 'तुम्ही पिंजून घ्या. म्हणजे तांतीचा प्रश्न आला. मजबूत तांतीची व्यापक मागणी एकदम पुरविणे शक्य होणार नाहीं. म्हणजे काम अडलें. याचा जसजसा । मी विचार करतो तसतशी माझी नजर त्या दशयंत्र - पिंजणावर जाते. पांच आणि पांच मिळून दहा बोटांनी जे काम होर्ते त्याला दशयंत्र म्हणतात.. सोमरस दहा बोटांनी पिळला जातो म्हणून वेदांत "दर्शयंत्रा. सोमाः "" असा उल्लेख येतो. तसें हैं खांडण-विचरणाचें दशयंत्र-पिंजण आहे. ते फार लाभदायी आणि बहुतेक सर्व आपत्तीतून बचावणारे ठरणार आहे. परवा मी खरांगण्याला गेलो असतां तिथे हैं दशयंत्र - पिंजण करून दाखविलें, प्रेक्षकांपैकी एकानें 'मी करून पाहतों' म्हणून बघत बघतां १५-२० मिनि टांत उत्तम जरी नाहीं तरी बऱ्यापैकीं पेळू बनावला. शिकण्याला हे इतकें सोपें आहे. ह्याची गति द्दि व्यवहार-सुलभ झाली आहे. तत्संबंधी कांहीं बोधक आंकडे वल्लभस्वामींच्या लेखांत आले असून ह्याहून अधिक आकर्षक नवे आंकडे हि हात आले आहेत. नागपूर जेलमध्ये केलेल्या प्रयोगांच्या आधा- रावर मी जेलमधून एक लेख हि यावर लिहिला होता. रामदासजी गुलाटी यांना खांडन-विंचरण करून दाखविलें तेव्हां त्यांनीं तर सांगितलें कीं मिलच्या पेळूमधील बहुतेक सर्व अंगें या पेळूत येतात आणि शास्त्रीयदृष्ट्या हा जवळ जवळ निर्दोष पेळू आहे. हें दशयंत्र - पिंजण सार्वत्रिक करण्यासाठी ह्या विषय आणखी शोध, प्रयोग इथे ग्रामसेवामंडळांत झाले पाहिजेत. त्या च प्रभाणें गांधीसेवासंघ, चरखा संघ यांनी हि याला चालना दिली पाहिजे. ह्यानें - खादीच्या कामांतली फार मोठी अडचण दूर होण्याचा संभव आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट विणकरवर्गाने स्वतः कांतून त्याचीच खादी तयार करावी, ही आहे. जाजूसाहेबांनी इकडे सर्वाचे लक्ष वेधलें च आहे हिंदुस्थानांत विणकरांचा मोठा वर्ग आहे. युद्धाच्या काळांत त्यांची सोय कांहींच होणार नाहीं. म्हणून या खादीच्या कामांत त्यांना लावर्णे अवश्यक आहे. विणकर जर स्वतः कांतून विणील तर आज त्याला इतरांनी कांतलेले बरेवाईट आणि कसेबसे सूत विणण्यांत जी मजूरी मिळते त्यापेक्षां कमी मजूरी पडणार नाहीं, हे अनेक आंकडे काढून मी पाहून घेतलें आहे. त्याला स्वतःचे कांतलेले विणणे अधिक सुखावह तर होणार च आहे. ह्या बाबतींत हि व्यापक प्रयोग होण्याची गरज आहे.
या बरोबरच त्या त्या ठिकाणच्या वस्त्रत्रस्वावलंबी लोकांचें त्या त्या 'ठिकाणी विणण्याची सोय लागेल. त्यासाठी स्वावलंबी लोकांचें सूत सुधारलें पाहिजे. सूत सुधारायचें म्हणजे पुनः दशयंत्र-पिंजणाकडे च लक्ष जातें. सामान्य यंत्र-पिंजण एरवीं उपयुक्त मानले तरी युद्धाच्या काळांतील व्यापक योजनेंत ते कुचकामाचे आहे. त्या यंत्रांत जितका शास्त्रीय पेळू होत नाहीं तितका तो ह्या दशयंत्रांत होतो असा माझा दावा आहे. परंतु हे दशयंत्र पिंजण उर्फ खांडण-विंचरण कापसापासून व्हायला पाहिजे ही गोष्ट यांत गृहीत आहे. आज सर्वत्र प्रायः रुईपासून पुढच्या क्रिया होतात स्याऐवजी कापसापासूनच त्या केल्या पाहिजेत. शेतकन्यानें आपल्या शेतांतला उत्तम. मोठया बोंडाचा स्वच्छ कापूस राखून ठेवला पाहिजे. तो कापूस मग सळी- फळी सारख्या साधनाने रेचून घेतला पाहिजे. सळी फळीच्या रेचांतली प्राय:: एक हि सरकी वायां जाणार नाहीं आणि उत्तम वेचक बोर्डे निवडून घेत-- स्यामुळे निर्भेळ असे सुंदर बीं शेतकऱ्याला मिळून त्याचे शेत भरारेल. कापसापासून आरंभिण्याचे असे अनेक लाभ आहेत. ते रुईपासून आरंभिण्यांत आपण गमावून बसतो. खादीचें समग्र-दर्शन वस्तुतः इतक्या मजबूत अर्थ- शास्त्रावर उभे आहे कीं त्याहून अधिक स्वस्त कांही च सिद्ध होणार नाहीं... पण त्याऐवजीं खादीच्या नांवानें मधली च एक तुटक प्रक्रिया समजणे, म्हणजे खादीला विनाकारण बदनाम करून घेणें आहे.
समग्र दर्शनाचा हा विचार कार्यकर्त्यांनीं नीट लक्षांत घेण्यासारखा आहे- गिरण्या स्वस्त पडतात असे बोलले जाते. आम्ही हिशोबाने त्या महाग आहेत. है दाखवितो. त्यांत व्यवस्थापकवर्गाचा भारी खर्च, यंत्र, घसारा, वाहतूक,, मालकांचा अजस्त्र नफा इत्यादि अनेक आपत्ति उघड आहेत. परंतु इतक्या सर्व आपत्ति मिळून हि गिरणी स्वस्त वाटते तर त्यांत कांहीं जादू तरी असली पाहिजे किंवा आम्ही मांडतो ते आक्षेप खोटे असले पाहिजेत. परंतु, आक्षेप तर खोटे म्हणतां येत नाहींत. म्हणून त्यांत जादू आहे हे च खरै. आणि ती जादू ही आहे की गिरणी म्हणजे एका संबंध यांत्रिक रचनेच्या सांखळींतला एक दुआ आहे. मोठ्या कारखान्यांत मुख्य उद्योगाबरोबर तत्संबद्ध दुसरे हि लहानसहान उद्योग करविले जातात. त्यासाठी म्हणून तो कारखाना चालत नसतो. म्हणून त्यांना गौण पैदास म्हणतात. अशा. गौण पैदाशींतून मिळालेल्या फायद्याचा लाभ कारखान्याच्या मुख्य कामाला दिला जातो. आणि असे सगळे मिळून मग तो कारखाना परवडतो... गिरणीची अशी व स्थिति आहे. ती एका संपूर्ण विचार-शृंखलेचा दुवा आहे. गिरण्यांबरोबर आगगाड्या आल्या. शांततेच्या काळांत माल नोण्या- आणण्याचे त्यांचे मुख्य कार्य. मग त्यावरोवर यात्रेकरूंना हि त्याचा लाभ दिला जातो. लोकांना दूर दूर जाण्याची सवय लागते. मग त्यांचे लग्नसंबंध हि दूर दूर होऊं लागतात. आणि रीतीनें आगगाडी त्यांच्या जीवनांतली एक आवश्यक वस्तु होऊन बसते. मग तिचा लाभ घेऊन गिरणीवर स्वस्तपणाचा आभास निर्मितां येतो. आगगाडीचें हें एक उदाहरण दिलें. अशा अनेक गोष्टीं गिरणीबरोबर उभ्या आहेत त्यामुळे गिरणी स्वस्त भासत आहे. एकटी गिरणी विचारांत घेतली तर ती फार च महाग ठरते. हा च न्याय खादीला लागू केला पाहीजे. खादीची केवळ एक च बाब विचारांत घेतली तर ती महाग वाटेल. पण असा तुटक विचार करतां येत नाहीं. एखाद्या सुंदर माणसाच्या शरीराचे वेगवेगळे अवयव कापून जर आपण सौंदर्य पाहूं लागलों तर कसे होईल ? कापलेले नाक का सुंदर होणार आहे ? आरपार भोर्के दिसतील त्यांत. पण असे पृथक केलेले अवयव जरी स्वतंत्र- पर्णे सुंदर दिसले नाहींत तरी ते च सगळे मिळून शरीराला सौंदर्य देतात. समग्र जीवन लक्षांत घेऊन त्यांतला खादी हा एक दुवा आहे असा विचार केला, म्हणजे मग वादी जीवन हैं मिल जीवनापेक्षां कितीतरी स्वस्त दिसेल.
खार्दीत वाहतुकीचा प्रश्न च नाहीं. ती जिथल्या तिथे च व्हायची. ती घरच्याघरी व्यवस्थित असायची. म्हणजे व्यवस्थापकांचा छेद. कापडाच्या गरजेपेक्षां विनाकारण अधिक कापूस पेरायचा नाहीं. म्हणजे कापसाचा बाजारभाव आपल्या हातचा निखळ बोंडे वेचून घेऊन ती घरच्या घरी रेचल्यामुळे पेरायला उत्तम सरकी मिळायची, आणि त्यामुळे शेती विशेष प्रफुल्लित आणि जोरदार व्हायची. बाकीची सरकी विकावी न लागतां सरळ गाईला मिळाली म्हणजे दूध, तूप, बैल उत्तम लाभायचे. वस्त्रस्वावलंबना- पुरती मोकळी बोंडें सळीफळीच्या किंवा तत्सम गुण असलेल्या रेच्यावर रेचलीं म्हणजे त्यांतली ताजी स्वच्छ रुई पिंजायला सुलभं जायची. दशयंत्रांत ती उत्तम पिंजली गेल्यामुळे सूत समान मजबूत निधायचे. सूत उत्तम झाल्यामुळे विणायला सोपें जायचें. उत्तम विणले गेल्यामुलें तें श्री रावर अधिक टिकायचे. आणि कपड़ा अधिक टिकल्यामुळे तितक्य प्रमाणांत कापसाच्या लागवडीच्या जमिनीची बचत व्हायची. आणि ह्या सगळ्याला तेलघाणा इत्यादि ग्रामोद्योगांची जोड देऊन मग ती खादी स्वस्त 'पडते की महाग पडते याचा विचार केला, म्हणजे ती मुळीं च महाग पडत -नाहीं असे दिसायचे. खादीचें हें 'समग्र-दर्शन' डोळ्यांत भर म्हणजे खादीकार्य कापसापासून न आरंभिता रुईपान आरंभिण्यांत केवढी घातक भूल आहे हें तर लक्षांत येईलच, पण एकूण सर्व च खादीकार्य सांगोपांग करण्याची दृष्टि लाभेल.
आणखी एक गोष्ट सांगायची आहे. त्यानें समग्र-दर्शन अधिक स्पष्ट होईल, आणि तो एक स्वतंत्र मुद्दा हि आहे. ५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रेल्वेच्या प्रवासांत असतांना माझा चरखा उघडून मी कातूं लागलों. आर्षी च डोळे वाईट, त्यांत. गाडीचे धक्के हि लागत होते त्यामुळे सावकाश कांतून हि बोर्डे तुटत होतें च. तुटल्याबरोबर माझ्या तत्त्वाप्रमाणे मी तें जोडून घेत होतों. माझ्या शेजारी एक गृहस्थ बसले होते. बी. एस्सी. झाले होते -ते. माझें हें सगळे ते लक्षपूर्वक पहात होते, थोडया वेळाने म्हणाले, “तुट- लेलें जोडत बसण्यांत तुम्ही इतका वेळ घालवितां त्याऐवजी तें तर्से च जाऊं दिले तर अर्थशास्त्रदृष्ट्या तें अधिक लाभाचें नाहीं का ठरणार ?" मी त्यांना म्हटले, "अर्थशास्त्र दोन प्रकारचें आहे : एक आंशिक अथवा एकांगी आणि दुसरें परिपूर्ण. पैकी एकांगी अथशास्त्र न घेतां परिपूर्ण अर्थशास्त्राची कसोटी लावर्णे च योग्य आहे, " ते म्हणाले, "बरोबर आहे", मग मी त्यांना विचारलें की "तुम्ही थोडे तुटलेलें वायां गेलें तरी चालेल म्हणतां तर त्याची मर्यादा काय ठरवितां १ किती टके माफ करतां ?" ते म्हणाले, “पांच टक्यांपर्यंत माफ करायला कांही हरकत नाहीं ", मग मी म्हणालों कीं जोडतां येत असून हि पांच टके सूत तुरूं देणें याचा अर्थ काय होतो तें पाहण्यासारखे आहे, याचा अर्थ असा आहे की असा कांतणारा बसल्या बसल्या कापसाच्या -लागवडीच्या शंभर एकरांपैकीं पांच एकर लागवड जाळून टाकतो, तांतीच्या शंभर कारखान्यांपैकीं पांच कारखाने बेकार करतो, कांतणान्यासाठी बांध- लेल्या शंभर इमारतींपैकी पांच इमारती पाडून टाकतो, हिशोबाच्या शंभर ह्यांपैकी पांच ह्या फाडून टाकतो, इत्यादि, शिवाय टक्यांचा न्याय ज्याला: मानवला त्याच्या जीवनांतील सर्व च व्यवहारांना तो ग्रासणार, त्यांतून होणारी हानि किती भयानक ठरेल है सहज समजण्यासारखे आहे, जेवतांना पात्रांत कोणी अन टाकले तर आपल्यांत त्याला माजोरी म्हणतात, कारण, प्रात्रांत टाकर्णे याचा अर्थ शेतकऱ्याच्या बैलांपासून रसाय करणाऱ्या आईपर्यंत सर्वोची मेहनत तो बुडवितो असा आहे, म्हणून पात्रांत टाकल्यामुळे आई रागावते तेवढे च बस नाहीं, नांगरणाऱ्या बैलाने त्याला एक लाथ मारली पाहिजे. आणि शेतकऱ्यांपासून पुढच्या सर्वोचा एकेक टप्पू त्याला मिळाला पाहिजे....
म्हणून कोणती हि वस्तु सामन्याने पहावी लागते, एवढयासाठीं च गीतेंत ईश्वर-ज्ञानाला हि 'असंशयं समयं ' ह्रीं विशेषर्णे जोडलीं आहेत. खादीच्या आपल्या चळवळीला आणि योजनेला समग्र-दर्शनाची फार गरज आहे. समग्र दर्शनपूर्वक जर आपण खादीला चालना देऊं तर आणि तर च ती व्यापक होऊं शकेल. आमच्या कसोटीचा हा काळ आहे. तसा तो खादीच्या व्यापक शक्यतेचा हि अवसर आहे, त्यासाठी माझ्या सूचना मीं थोडक्यांतः मांडल्या आहेत, त्याचा मंडळींनी यथायोग्य उपयोग करावा.