जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ योजला आहे हे त्याच्या
रचेनवरून आणि परिणामावरून उघडच आहे पण त्यानीं लहान मुलाच्यासाठी हि रामायणात रित्येक करामती करून ठेवल्या आहेत, असे माझी शिक्षकाची नजर पाहत आहे. ह्या अनेक करामतींपैकी एक करामत भी ह्या लेखात उलगडणार आहे.
नागरीलिपी ही इतर दिव्याच्या मानाने जरी 'बाळबोध' म्हटली जाते, तरी तीतील जोडाक्षरे तितकीशी बाळरोध नाहीत. बालकाना ती चागलाच त्रास देतात, ही सर्वाच्या अनुभवाची गोष्ट आहे म्हणून आजकाल जोडाक्षर विरहित घडे मुलाच्यासाठीं रचीच असतात. हे धडे अर्थात् कृत्रिम आणि नीरस होऊ पाहतात. पण तुलसीदासानी अगदी सहजपणे आणि सरस रीतीनें लहान मुलाच्यासाठी रामायणात पुष्कळ व रिसाण जोडाक्षर- विरहित लिहून ठेवले आहे, असे दिसते.
हा मुद्दा तपासण्यासार्टी आपण आता गणितांत उतरू. प्रथम अयोध्या काडाला कौसल्या रामाला निरोप देत आहे हा एक उतारा सन्ध तपासू. कल्याणच्या मानसाकात छापलेले रामायण मजजवळ आहे त्यात पृष्ठे ३६०- ३६२ मध्ये तो आहे त्याची मुरवात "धरि धीरजु सुत बदतु निहारी " अशी आहे आणि शेवट " वरनि न जाहिं विलाप-कलापा " असा आहे ह्या उतान्यात २७ चौपाया आणि ३ दोहे मिळून ३० पचसख्या आहे.
आताच्या तालिकेचें थोडें मनन. 'म्ह' आणि 'न्ट' हीं प्रत्ययान्तरगत असल्यामुळें हिंदी भाषेत असख्य वेळा येणारी अक्षरें आहेत. तीं माझ्या विचाराप्रमाणे जोडाक्षरें नसून मुळाक्षरासारसीं च आहेत. कारण, म्हआणि न्ह हिंदी भाषेतील रूढीप्रमाणे हकारयुक्त उच्चारलेले 'म' आणि 'न' ह्याचे प्रकारभेद आहेत किया व्याकरणाच्या भाषेत ते म आणि न ह्याचे महाप्राण आहेत. 'जिनको' उधारण्याची दुसरी तन्हा 'जिन्हको' आणि 'तुमको चे महाप्राणयुक्त उच्चारण 'तुम्हको' हिंदी भाषेत च नव्हे, तर इतर हि भाषात अशीं महाप्राण उच्चारणाची उदाहरणे आहेत
'प्र' हे जोडाक्षर सरे, पण संस्कृतात असख्य वेळा येणारे असल्यामुळे area साहित्यकारानीं त्याला विक्रपाने मुळाक्षर मानून घेतल्यासारसे केले आहे. कारण, जोडाक्षराच्या पूर्वीच्या अक्षरावर आघात येतो आणि ते गुरु मानले जाते, हा नियम त्यानी 'प्र'च्या बाबतींत ढिला केला आहे. म्हणजे 'प्र' च्या पूर्वीच्या अक्षरावर अघात या वा नका देऊ, अशी त्याची मोकळीक आहे
म्हणून हिंदी भाषेच्या सोईसाठी म्ह, न्छ, आणि संस्कृत भाषेच्या सोईसाठी 'प्र' ही तीन अपवादात्मक जोडाक्षरे सोडून दिलीं, तर वरील उतान्यात निसळ जोडाक्षरें दोन च आली असून ती हि प्रत्येकीं एकेक वेळा च वापरली गेली आहेत, असे दिसतें. ७८४ अक्षरात २ वेळा जोडाक्षरे म्हणजे शून्यप्राय चपद्य-सख्येच्या मानानें २० पद्यापेकीं ज्यात, एकदा का होईना
जोडाक्षर आले आहे अशीं पर्ये २, म्हणजे शेंडा ७ प्रमाण पडले.
आता ज्यात विद्वान् वक्ता आहे आणि विषय तात्विक आहे, असा उतारा घेऊ. आणि म्ह, न्ह, म, ही मुळाक्षरें मानून, अथवा जोडाक्षरें मानली तरी मुळाक्षरानरोबर चर्ती मुलाना शिकवायची असे गृहीत धरून सोडाक्षराचं प्रमाण काय येते, तें पाहू. बाल्मीकि रामाला भगवताची निवासस्थाने सागत आहेत, हा अयोध्याकाडातील उतारा आता वाचायचा आहे मानसाकात तो पृष्ठे ४०८-४१२ ह्यामध्ये आहे. आरंभ : 'सहज सरल सुनि रघुवरवानी". शेवट " सो राउर निज गेह" ह्या उतान्यात ४२ चौपाया, ६ दोहे आणि १ छद मिळून ४९ पत्र संख्या आहे.
विद्वानाच्या तात्विक भाषणात हि तुलसीदास लहान मुलानें स्मरण रासून शेकडा ८० प जोडाक्षर - विरहित लिहीत आहेत. केवढी दया ! आणि शिक्षकाना क्रेपर्दे उदाहरण ! तुलसीदासानी लहान मुलासाठी खालील वर्णमाला कल्पिली आहे.
अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ ओ अ क स ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व सह; न्ह म्ह प्र. एकूण ४३ वर्ण. एवढे वर्ण शिकून घ्यावे आणि जोडाक्षरें न आली तरी ८० टक्के रामायण खुशाल वाचावें.
इतक्या विशद पण नीरस आकडेमोडीनंतर तुलसीदासजीचा जोडाक्षरविरहित सरस प्रसाद थोडा सेयन केल्याशिवाय संपवणे ठीक नाहीं.
'धरम न अरथ न काम रुचि, गति न चहउं निरवान | जनम जनम रति राम-पद; यह वरदानु न आन ||'