हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि निर्माण केलेले राष्ट्राला अर्पण करण्याची, ही कल्पना कार उज्ज्वल आहे. आजकाल आपण जी खादी काढतों, ती पन्नास लाखाच्या आसपास आहे. जोर मारला तर एसाद कोटपर्यंत काढू शकू, अर्से बोलले जाते. परतु हिंदुस्थानचा प्रश्न माणशी पाच रुपयाचा कपडा धरला तरी, दोनों कोटींचा आहे. त्या हिशेबाने आपल्या कार्याची गति पार न अल्प आहे. तिला वेग मिळत नाही, ह्याचें मुख्य कारण नित्ययज्ञाच्या ह्या कल्पनेच्या मुळाशी असलेले महान् आध्यात्मिक तत्त्व आमच्या लक्षात आलेले नाहीं, हे आहे कोणता हि सार्वजनिक प्रयोग जोपर्यंत आपण त्याच्या थेट मुळाशी जाऊन पोचत नाहीं, तोपर्यंत सार्वत्रिक होत नाहीं.
लोकात नित्याच्या कल्पनेबाबत स्फूर्ति का उत्पन्न होत नाहीं, याचा विचार करता एक गोष्ट लक्षात येते ती अशी : अति प्राचीन काळापासून कोणत्या हि उपायाने शक्य झाल्यास कर्मातून मुक्त होऊन जाणे हे एक आध्यात्मिक तच आम्ही ठरवून टाकले आहे. अतिम ध्येय म्हणून ते बरोबर आहे. पण आम्ही तें जणू आमचें आचारसूत्र च बनविल्यासारखे आहे. आम्ही ध्यान re, भक्तीचा विचार करू, ज्ञानचची क्रू; परंतु त्यासाठी प्रत्यक्ष कार्योवन अलग होऊन जाणे जरूर आहे असे आम्ही मानून घेतलें आहे. मध्ययुगीन सत आपापल्या रोजच्या कार्यात तन्मय असत हे रारें; परंतु तें कार्य करण्यातच त्याना भक्तीचा किंवा आत्मशानाचा अनुभव येत होता की काय, याबाबत नि शंक्ता नाहीं. भजनातल्या आनदाचा अनुभव न त्याना आपल्या रोजच्या आजीविनेच्या उद्योगात येत होता, की तो उद्योग एक प्राप्त कर्तव्य समजून ते क्रून टाकीत आणि त्यातून मोकळे होऊन भजनाचा आनंद खुटीत १ मी जें पाहू शक्ल त्यावरून कार्यमा जरी ते असत, तरी त्याची कमीहून वेगळी अशी उपासना होती, असे दिसतें त्याबद्दल माझी तक्रार आहे असे नाही. पण माझा प्रश्न हा आहे, की मध्ययुगीन काळी सताच्या जीवनाची अशी स्थिति होती का, वीं चरसा, नागर किंवा असले एमा उपजीविकेचे औजार है च त्याचे उपासनेचे द्वार, तद्द्वारा होणान्या क्रिया हीच त्याच्या उपासनेची धार, त्यात मन होणें हेंच त्याचें ध्यान, त्यातून निघालेले पलित समाजाला अर्पण करणें हें च भगवताला समर्पण, त्यात अनुभवलेली चित्ताची समता हा च योग १ हैं सर्व त्याच्या उपासनेच्या, भक्तीच्या व्याख्येत होते का ? ज्या अष्ट सात्त्विक भावाची भाषा ते बोलत, ते भाव त्याना त्याच्या उपास्य मूर्तीच्या चिंतनात किंवा कीर्तनात उत्पन्न होत असत, परतु त्याची रोजची देनिन पर्मे च ते उपासनारूप मानीत असे निश्चित सागता येत नाहीं. "कर्मे च उपासनारूप करावीं " असे सागणारी वचनें हि सताच्या वाणीत आढळणारी आहेत पण सर्व सताचा सामग्न्यार्ने विचार केला तर त्याच्या एकूण जीवनप्रवाहात र्ती वचनें थोडीं गौण पडतात असें वाटतें सभव आहे, सताच्या विषयींचा हा समज चुकीचा असेल परंतु आम लोकाच्या बाबतीत बोलायचं तर हे निश्चित म्हणता येईल, की शेकडो वर्षापासून लोकात ही च कल्पना रूढ आहे. कर्से हि करून मग ते निवृत्तीच्या नावानें म्हणा किंवा भक्तीच्या नावानें म्हणा- कर्म टाळणे हीच सरी भक्ति, आणि हें च सरे ज्ञान, कर्म केल्याशिवाय तर सुटकाच नाहीं कारण, त्याशिवाय आजीविका चालणें कठिण, आणि दुसन्यावर आपला भार हि पडतो म्हणून कर्म करून टाकावे, इतकी च फार तर लोकाची उडी जाते. परंतु शैवटीं उपासना ही कर्माहून वेगळी असली पाहिजे; अशी लोकाची कल्पना. ज्याची अशी कल्पना होती किंवा आहे, त्याच्या विचारात उणेपणा आहे, हे मला सागायचे आहे. कर्म दाळणे, निदान थोडक्यात करून मोकळे होणे, हा आध्यात्मिकतेचा आधार मानण्यात, माझ्या मर्ते, विचार-दोष आहे आणि त्यामुळे हानि झाली आहे. म्हणून आपल्याला जर राष्ट्र उद्योगशील व्हावे असे वाटत असेल, तर उद्योगशीलतेत च खरी आध्यात्मिकता आहे, हा विचार जीवन उद्योगशील बनवून स्थिर केला पाहिजे, त्याचा स्वतः अनुभव घेतला पाहिजे आणि दुसन्याना त्याची प्रेरणा देत राहिले पाहिजे.
आतापर्यंत जे सादीकार्य झाले त्यात मला ह्या वस्तूची उणीव भासली आहे चरखासघाने आपल्या कार्यकर्त्यांकडून अशी अपेक्षा राखली आहे की, त्यानी रोज एक ल्ट कातावी. किंवा रोज एक न झाली, तर महिन्यातून निदान तीस लटी तरी काताव्या त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या खादी पत्रिकेत | गुड्या किती जणानी कातल्या, त्यापेक्षा कमी किती जणानी कातलें, आणि मुळींच न कातणारे किती, याचे आकडे दिले जातात. त्यात मी पाहतों, की न चातगाराची सख्या हि कमी नसते. न कातणारे कदाचित् असा विचार करीत असावेत, की "मजुरानी कातलेले ढीगच्या ढीग सूत आम्ही रोज तोलतो, त्याची मजुरी देतों, आणि एवन्या ह्या ढिगात आमच्या ७|| गुडयाची भर न पडली, तर काय मोठा परक पडणार आहे ? परंतु गुणाकार हैं दाखवून देईल, की थोडे थोडें म्हणून जे वाटते, ते वास्तविक किती महान आहे. सुताचे ढीग पडले आहेत असे वाटते, पण हिंदुस्थानची लेोसख्या हि चाळीस कोट आहे ना ? त्याना ढीग कमी व पडणार आहेत.
रोज स्वतः नियमित कातण्यातली विशेषता काय आहे, हे मडळींच्या
लक्षात अजून आलें नाहीं. सर्वोसाठी एक राष्ट्रीय उपासना सिद्ध करणे;
ही महत्वाची यस्तु आदे. त्यानें आध्यात्मिक मांति होईल आणि तद्द्वारा आर्थिक, राजकीय आणि सामाजिक क्रान्ति होईल. हे दर्शन त्यांना झाले तर ते अवश्य पाततील. ज्या दिवशी पांतले नमेल, त्या दिवशी जेवण गोड याटणार नाहीं. ही वस्तु आमचे लोक अजून पूर्णपणे समजले नाहींत, याद्दल मला खेद होतो. काँग्रेसने एके पाळी ठरविले होते, की जे लोक सूत मानून देतील ते च यॉग्रेसचे सभासद दोऊ शकतील. परंतु है पार दिवस चालले नाही. आम्ही बोलताना सर बोलतों, थीं श्रीमंताची सत्ता जाऊन गरिबाची सत्ता आली पाहिजे, गरिबाचे राज्य झाले पाहिजे. परंतु ज्या चरतूत श्रमाची प्रतिष्ठा राहिली असती, म्हणजेच गरिबाची प्रतिष्ठा राहिली असती, ती वस्तु सोडून देऊन त्या ठिकाणीं चार आण्याची, म्हणजेच पेशाची, प्रतिष्ठा आम्ही कायम बेली, सभासदत्वासाठीं सूत वातण्याची अट असती, तर कोण्या श्रीमताने एरवी केवढे हि पेसे काँप्रेसला दिले असते, तरी ते दान समजलें गेलें असतें. पण त्यानें सूत कातून दिल्याशिवाय त्याला सभासद होता आले नसतें. ह्या एकाच वस्तूनें समाजवादाचा जितका प्रचार झाला असता, तितका कचित च दुसन्या कोणत्या वस्तूने झाला असता. म्हणून माझे इथल्या विद्यार्थ्यांना सागणे आहे कीं, तुम्ही रोज सूतकाता. हा नियम आपल्या जीवनाचा नियम समजा. जेवणाला एसाद्या वेळी रजा देता येईल; कारण, रोज जेवणें नेहमीं च कर्तव्य ठरत नाहीं. जेवण सोडण्याचे जितके प्रसग कल्पिता येतील, तितके हा नियम तोडण्याचे सात्रीने कल्पिता येणार नाहींत ही वस्तु जर मडळी समजून जातील, तर आपलें पार मोठे काम होईल कारण, ही भावना जीवनात दासल झाल्यावर तिचा प्रभाव जीवनाच्या प्रत्येक क्रियेवर होणार आहे. अर्धा नियमित का, मानपूर्वक कारणे, त्यातल्या त्यात कातण्याचा वेळ हि शक्य तर निश्चित करणे, ह्या बानी अशा आहेत, कीं त्यानी एकूण सर्वच जीवनाचे थोडेफार नियंत्रण होईल. त्याचा आमच्या सत्त्वनिष्ठेवर चागला परिणाम होईल. आणि तसा तो झाला म्हणजे आसपासच्या लोकावर हि तो होणारच. मुलगा काढू लागला म्हणजे आईबापावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय रहायचा नाहीं. तसा च तो त्याच्या मित्रावर हि झाल्याशिवाय रहायचा नाहीं, असें हैं आत्म्याच्या व्यापनतेचे सूत्र आहे.