उद्योग, भक्ति आणि शिक्षण
माझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च नाहीं !
* पवनार येथें ता. २०-१२-१९३५ रोजी सायंकाळच्या प्रार्थनेत दिलेलें
एक प्रवचन,
ज्या देशातून उद्योग गेला त्या देशाला मोटी पीड लगली आहे, असे रामज पाहिजे. जो म्हणून सातो, त्यानें उद्योग हा केलाच पाहिजे मग तो उद्योग कोणता हि असो, पण उद्योगावाचून बसता उपयोगी नाहीं. घरात उद्योगाचें वातावरण पाहिजे ज्या घरात उद्योगाचे शिक्षण नाहीं, त्या घरातली मुले घराचे डोळ्यादेखत वाटोळे करतील. संसार आर्धी च दुःपमय. स्यानीं संसारात सुख मानले त्याच्यासारखे भ्रमात पडलेले दुसरे कोणी नाहीत. रामदासानी म्हटले आहे- " मूखमाजीं परम मूर्ख । जो या संसारी मानी सुख" जो जो मला भेटतो तो तो दुःखाची च कहाणी सागतो मी तर कधींच च हे ओळखून ठेवले आहे आणि पुष्कळ विचारान्तीं आणि अनुभवान्तीं तें पक्के झाले आहे. तर असा हा ससार जर थोडासा मुसाचा करायचा असेल तर उद्योगाशिवाय सुटका नाहीं. सफाई करायची म्हटली तरी उद्योगी वृत्ति पाहिजे, आणि आज सगळ्याना करता येण्यासारसा उपयोगाचा असा उद्योग सूत कातण्याचा आहे. कपडा प्रत्येकाला लागतो आणि प्रत्येक स्त्री, पुरुष, मुलगी, मुलगा सूत कातून आपला कपडा काई शक्तो. चरसा हा तर आपला मित्र होईल, शान्ति देणारा होईल-जर त्यावर आपण प्रेम क्रू तर. मन उदास झाले की चरसा हार्ती ध्यावा मनाला बरे वाटेल. गटे नावाच्या कवीचे एक काव्य आहे त्यात त्यानें एका बाईचें चित्र रंगविले आहे या बाईचे चित्त अतिशय शोकाकुल झालें होते. तिला काहीच सुचेना. शेवटी तिने तक्ली हातात घेतली क्वीनें असे दासविले आहे व तिला त्या तक्लीने सान्त्वन मिळाले. आणि मी है मानतो. उद्योगाशिवाय मनुष्याने बसता कामा नये. एसाद्याला झोप येत असेल तर त्याने निजावे त्याचे मला काही वाटणार नाहीं पण उठल्यावर त्याने वेळ आळसात काढता कामा नये.
दुसरी गोष्ट भक्तिमार्ग. लहानपणापासून माझ्यावर जर कोणता संस्कार घडला असेल तर तो भक्तिमार्गाचा त्या वेळी आईकडून शिक्षण मिळाले. पुढे आश्रमात दोन्ही वेळच्या प्रार्थना करण्याची सवय लागली. त्यामुळे माझ्यात ते मुरून च गेलें पण भक्ति म्हणजे धर्मशून्यता नव्हे. आपल्याला उद्योग सोडून सोटी भक्ति नाहीं करायची. दिवसभर पवित्र उद्योग करून शेवटी सध्याकाळी आणि सकाळी देवाचे स्मरण केले पाहिजे. दिवसभर पार्पे करून किंवा आळसात घालवून प्रार्थना होत नाहीं पण सत्कर्म करून, दिवस सेवेंत घालवून, ती सेवा संध्याकाळी देवारा अर्पण करण्यासाठी प्रार्थना होऊं शक्ते. आपल्या हातून नकळत झालेल्या पापाची देव क्षमा करतो पाप झाले तर त्यानद्दल तीन पश्चात्ताप वाटायला पाहिजे. रोज १५ मिनिटे का होईना, पण लहान-थोर सर्वांनी एकत्र येऊन निष्ठेनें प्रार्थना करावी ज्या दिवशी प्रार्थना झाली नाहीं तो दिवस वाया गेला असे समजावें, भगवान् नारदाला म्हणतात-" मी वैकुंठात नसेन, एक वेळ योग्याच्या हृदयात नसेन, सूर्यात हि नसेन; पण कुठे हि नसलो तरी जिथे नामघोष चालला असेल तिथे नेमका भी सापडेन." पण हा नामघोष कर्म करून, उद्योग करून, मगच करायचा. नाहीं तर तें ढोंग होईल. असा हा माझा भक्तिमार्ग आहे.
आणखी एका गोष्टीचा मला नाद आहे. ती म्हणजे खूप शिकायें व शिया याला जे येतें तें त्यानें दुसन्याला शिकवावें. आणि प्याला जें शिकता येईल ते त्याने शिकावें. म्हातारा असला तरी त्याने शिकावें अभग शिकावे, गीता पाठ करावी, गणित शिवावें, काही ना काहीं शिकावें च, आणि जे शिकविता येण्यासारसें असेल तें शिक्षा शाळेतल्या शिक्षणावर माझा विश्वास नाहीं. पाच-सहा तास मुलाना नसवून ठेवून त्याचे शिक्षण होत च नाहीं नाना उद्योग चालले पाहिजेत आणि त्यात एसादा तास शिकविलें म्हणजे पुरे आमची आई 'मत्तिमार्ग प्रदीप' बाचीत होती तिला वाचता मी येत होते. पण एकेक अक्षर वाचीत होती एक दिवस एक अभंग पंधरा मिनिटे पर्यंत तिचा वाचून च होत होता. मी माडीवर होतो. शेवटी मी खाली येऊन तिला तो अभग शिकवून दिला तिला म्हणायला सागितलें आणि पंधरा वीस मिनिटात तिचा तो अभंग पुरा झाला. त्यानंतर रोज तिला मी थोडा वेळ शिववीत होतों. शेवटीं तें पुस्तक तिचें पुरे झाले. अशा रीतीनें जें जे शिकविता येण्यासारखे आहे तें शिववीत राहिले पाहिजे व शिक्त हि राहिले पाहिजे.
ह्या तीन गोष्टींविपर्यी मला सागायचें होतें, तें आज भी सांगितले आहे.