परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या एकूण अनुभवावरून मी अशा निर्णयावर आलो आहे, की गाईचें ताजे ताक हे खेडेगांवचे एक मोठें तारक तत्त्व आहे. त्यासाठी मीं संस्कृतांत एक सूत्र रचले आहे : " तक्रं तारकम् " खेडेगावांत खांडके, खरूज, गजकर्ण इत्यादि चर्म रोग लहान मुलां-
पासून म्हातान्यांपर्यंत सर्वांना दिसून येतात. त्याची कारणे मला आढळलीं,
ती उपयांसह नमूद करतो.
१ अस्वच्छ राहणी - त्यांतल्या त्यांत स्नानाची हेळसांड. स्नान रोज. न करणारे आहेतच. पण जे रोज करणारे आहेत, त्यांचे हि स्नान 'स्नान " म्हणता येणार नाहीं. त्याला मराठीत 'आंघोळ' शब्द रूढ झाला आहे, तो कदाचित् शोभेल. कारण 'आंघोळ' चा अर्थ मी समजलों आहे, आंग ओले करणे." पण पुष्कळवेळां तर असें दिसून येतें, की देहाचा कांहीं. भाग तर पुरता ओला सुद्धां होत नाहीं. ह्यासाठी घरांत नीट आडोसा अस- लेली एक स्नानाची जागा पाहिजे. आणि तिथे नग्न स्नान करण्याची पद्धति. रूढवली आणि शिकवली पाहिजे. गुह्य अवयव स्वच्छ धुतले पाहिजेत. हा एक सार्वत्रिक शिक्षणाचा विषय आहे.
२ पिण्याचें अस्वच्छ पाणी-विशेषतः नदीकाठच्या गांवांत आणि त्यांत हि पावसाळ्यांत, लोकांच्या पिण्यांत जे पाणी येतें, तें अति च घाणेरडें असतें. ह्याला कमीत कमी उपाय उकळून पाणी पिणें हा आहे. हरिजन- वस्तीत तर स्वच्छ पाणी लाभायर्चेच नाहीं. हरिजनांच्या पाण्याचा प्रश्न,, हा अगदी सामान्य भूतदयेचा प्रश्न आहे. असल्या साध्या प्रभाकडे हि जो समाज दुर्लक्ष करील त्याची स्वराज्याची पात्रता कशी सिद्ध व्हावयाची ? ३ आहारांतील उणिवा आणि चुका ह्या सदराखालीं तीन मुख्य दोष आढळून येतात. यांना मी खेड्याच्या आहारांतील त्रिदोष म्हणतो.
(अ) आहारांतील चूक ज्याला म्हणतां येईल, ती म्हणजे सडलेली किंवा किडलेली वस्तु वापरणे लेख्यांत मांस आणि मासळी, जी विकत घेऊन खाल्ली जाते ती, बहुतेक 'सडलेली' म्हणतां येईल. महारोग वाढून राहिला आहे. त्याच्या कारणांचा पुरता छडा अजून तज्ज्ञांना लागलेला नाहीं. परंतु एक कारण सडलेली किंवा घाणेरडी मासळी खाणें हें आहे. ‘किडलेले' म्हणजे मजुरांच्या पदरांत पडणारें धान्य, हें पुष्कळवेळां रद्दींतलें रद्दी असतें. ह्या वाबतीत खेडेगांवच्या महाजनांनी लक्ष दिल्याशिवाय सुधारणा होणें अशक्य आहे.
(आ) खेड्यांच्या आहारांतली एक मोठी उणीव, म्हणजे नित्याच्या जेवणांत भाजी नसर्णे. भाजीच्या महत्त्वाविषयीं अधिक लिहिण्याची गरज नाहीं. कारण, ती एक सर्व मान्य बाब आहे. शेतकऱ्यांच्या आवारांत कांहीं ऋतूंत तर मुळीं च भाजीचे नांव नसतें. "धान्याच्या चौपट भाजी खाल्ली पाहिजे" असे म्हणण्यापर्यंत कांहीं छांदिष्टांची मजल आहे. असलें कांहीं मला म्हणावयाचे नाही. उलट, भाजींचे प्रमाण सामान्यतः अल्प च बरें, असें मी मानतो. तथापि रोजची माणशी दहा तोळे भाजी तरी शेतकऱ्यांच्या भोजनांत अवश्य आहे, असें समजलें पाहिजे.
(इ) आहारांतील दुसरी उणीव, म्हणजे ह्या लेखाच्या आरंभी उल्लेखिलेलें गाईचें ताक, रोजच्या जेवणांत कांही तरी पाचक अम्ल तत्त्व अवश्य आहे. गाईचे ताजे ताक, हे थोड्या प्रयत्नाने सर्वोना आणि रोज मिळण्यासारखे उत्तम अम्ल आहे. पण त्याशिवाय दुधांतले सर्व ओज (प्रोटीन) ताकांत आहे. खनिर्जे हि त्यांत भरपूर आहेत. वऱ्हाड-नागपूरकडच्या ग्रामिण आहारांत अम्ल बहुतेक नसते च. ज्वारीची भाकर आणि मीठ व हळद टाकलेले साधें वरण, हया दोन उत्तम वस्तु त्यांच्या जेवणांत असतात. त्याशिवाय बेसनाचे पिठले, ज्याला ते 'चून' म्हणतात आणि ज्यांत मिरची इत्यादि जिह्वादेश टाकलेले असतात, ती एक गौण वस्तु ते आवडीनें खातात. त्यामुळे खरूज इत्यादि रक्तदोषाचे रोग फार आढळतात. असे अनेक रोग सकाळच्या न्याहरीत पावशेर ताजें ताक देऊन तेवढ्याने च दुरुस्त होतात, असें मी पाहिलें आहे.
इतके ताक सर्वांना थोड्या प्रयत्नाने मिळण्यासारखे आहे, म्हणून वर म्हटले. पण तेवढा प्रयत्न तरी केला तर व्हायचा ना १