मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच
परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांत
प्रमाणपत्रे मला प्रमाणपत्रे मिळाली, त्यांचे ज्ञान मला नसल्यासारखें च आहे. आणि ज्या विषयांची मी परीक्षा दिली नाहीं, त्यांचें ज्ञान मला चांगले आहे. परंतु इथे दिलेली प्रमाणपत्रे केवळ परीक्षेचीं नाहीत; म्हणून तीं निरर्थक ठरणार नाहींत, अशी मी आशा करतो. मगनवाडी, वर्धा येथें ता. २९-४-४२ ला ग्रामसेवक- विद्यालयाच्या पदवीदानप्रसंगी प्रमाणपत्र वितरणानंतर केलेलें अध्यक्षीय भाषण. मूळ हिंदी भाषणावरून मराठी.
आपण जगांत नाना वाद ऐकतो. अनेक पक्ष पाहतों. पण सेवकांनीं सर्व वादांपासून आणि पक्षांपासून अलग राहिले पाहिजे. आमच्यासाठी सबंध जगांत पक्ष दोन च आहेत. एक, • सेवक आणि दोन, स्वामी. सेवक आम्ही स्वतः आणि
आणि सेवक
स्वामी बाकीचे सर्व लोक स्वामीची सेवा करून • सुटावयाचे, हा च सेवकाचा धर्म. सेवकाला पक्षभेदाशीं काय काम ? - खेड्यांत पक्ष भरपूर च असतात. त्यांच्या मुळाशीं कांहीं तत्त्व असतें असें हि नाहीं. प्रायः द्वेष आणि स्वार्थ असतो. अशा कोणत्या च पक्षांत सेवकानें सांपडता कामा नये. त्याने निःपक्ष राहून सेवा केली पाहिजे. सेवा करणें एवढेच त्याचे काम. आपल्या सेवेनें कोण राजी झाला आणि कोण नाराज, ह्याशी आम्हांला काय कर्तव्य १ हृदयस्थ ईश्वर प्रसन्न असला म्हणजे पुरें.
आणखी एक गोष्ट. उद्योग आणि विद्या अलग नाहींत. तीं जेथें अलग केली जातात, तेथे दोन्ही निरुपयोगी होतात. विद्या हैं शिर म्हटले, तर उद्योग रोज कांहीं वेळ प्रत्यक्ष उद्योगाचें घड म्हणावयाचे. दोन्ही अलग करणे, म्हणजे दोन्ही मारून टाकणे. म्हणजे राहूसारखी गत. पण तुम्हांला येथें उद्योग आणि विद्या एकत्र लाभलेली आहेत. उद्योगा- अगत्य बरोबर च विद्या तुम्हांला दिली गेली आहे. म्हणून तुमची विद्या वीर्यहीन असणार नाहीं. तथापि, ह्यापुढे खेड्यांत जाल तेव्हां तुम्हांला अनेक वेगवेगळी कामे करावी लागतील. व्यवस्था पाहर्णे, हिशेब लिहिणे, शिकवणें, प्रसंर्गी व्याख्यान देणे इत्यादि अनेक गोष्टी ग्रामसेवेच्या अंगाने कराव्या लागतात च. पण त्या करीत असतांना तुम्हीं रोज कांहीं वेळ प्रत्यक्ष उद्योगांत घालवला पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. त्यानें तुमची विद्या ताजी राहील, नवीन होणारे शोध कळत राहतील, आणि तुम्हांला हि नवीन शोध सुत्रत राहतील. पुष्कळदा असे आढळून येते, की चांगले उद्योगांत प्रवीण झालेले लोक, पण प्रत्यक्ष सेवेला लागले म्हणजे शरीरप्ररिश्रम करायचे विसरतात. वेळ मिळत नाहीं म्हणतात. पण त्यामुळे कार्यकत्यांची आणि त्यांच्या कार्याची हानि झालेली दिसते. उद्योगाशी नित्या परिचय न राहिल्यामुळे ज्ञान मागासुतें, मग जुन्या ज्ञानावर च काम. भागवतात, हें बरें नाहीं. ह्यासाठी ग्रामसेवकानें प्रतिदिन कांहीं वेळ- माझ्या मर्ते शक्य तर अर्धा दिवस-उद्योगाला दिला पाहिजे. ग्रामसेवेचें तें अंग च समजलें पाहिजे
खेड्यांत जाल, पण तेथें जमीन टणक राहील. येथें संस्थेत तुमच्या साठी सर्व सोई हजर आहेत. खेड्यांत सर्व गैरसोई असतील, पाचर तुटली, वाढ्याचें काम येत नाहीं, वाढी ( सुतार ) मिळत नाहीं. घाणा अडकून पडला. त्यामुळे खचून जातां कामा नये. धीर धरला पाहिजे. धीराचें काम आणि बारीकसारीक गोष्टींचें पूर्ण ज्ञान करून घेतलें पाहिजे. मोठ्या गोष्टीइतके च लहान गोष्टींना महत्त्व दिले '
लहान गोष्टींचे
महत्त्व
पाहिजे. किंबहुना, लहान गोष्टींना च अधिक महत्त्व दिले पाहिजे. मोठ्या गोष्टी सहसा कोणी विसरणार नाहीं. कारण, त्या मोठ्या च. म्हणून लहान वाटणाऱ्या गोष्टीकडे च अधिक लक्ष पुरवायला पाहिजे. नाहीं तर त्यांच्या ज्ञानाच्या अभावी गार्डे अडकून पडायचे. विणकामांत चांगला तयार होऊन एकजण खेड्यांत माग घालून बसला. पण त्याला विणर्णे जरी उत्तम येत होते, तरी माग कसा बसवावा, हैं नीट अवगत नव्हते. त्यामुळे त्याच्या मागावर कपडा, यावा तसा येई ना. जो म्हणून त्या मागावर विणी त्याचे कापड बिघडावयाचे. हा परिणाम- कशाचा ? माग कसा बसवावा, ही बाब क्षुल्लक म्हणून दुर्लक्षिली त्याचा.
खरी प्रमाणपत्रे
मला सांगायचें तें मी थोडक्यांत सांगितले. तुम्हांला आज इथे संस्थेकडून प्रमाणपत्रे तर मिळाली. पण खरी प्रमाणपत्रे जनतेकडून च मिळावयाची आहेत. आणि तीं आपल्या खऱ्या सेवेच्या गुणामुळे च तुम्हांला मिळतील. शेवटी मी इतकी च. आशा करतो, की खेड्यांत जाऊन आणि जनतेची उत्तम. सेवा करून त्या वास्तविक प्रमाणपत्रांचे तुम्ही अधिकारी व्हाल.