shabd-logo

बालपण आणि शिक्षण

27 June 2023

41 पाहिले 41
११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आजोबा शंभूराव भावे एक प्रगतीशील विचाराचे पण धार्मिक प्रवृत्तीचे होते. विनोबांची आई रुक्मिणीदेवी अत्यंत भाविक, सतत परमेश्वर भजनात मग्न असे. विनोबाचे पाळण्यातले नाव विनायक. त्यांचे बालपण गागोद्यात आजोबांच्या सहवासात गेले. वाईच्या शिव मंदिराचे व्यवस्थापन भावे कुटुंबियांकडे असल्यामुळे वर्षातून सहा महिन्यात एकदा विनोबा आपल्या आजोबासोबत वाईलाही जात. सतत आजोबा सोबत असल्याने विनोबावर आजोबांचा प्रभाव पडला. शंभूराव धार्मिक असले तरी त्यांनी वाईचे शिवमंदिर दलितासाठी खुले केले. कधी कधी मुस्लीम गायकाच्या भजनाचे कार्यक्रमही या मंदिरात घेण्यात येत त्यामुळेकट्टर हिंदू शंभूरावाची टवाळी करीत. तरीही शंभूरावानी कुणालाही जुमानले नाही. या सर्वांचा प्रभाव बालपणातच विनोबावर पडल्यामुळे विनोबांचे विचार धार्मिक व उदारमतवादी बनले.

गागोदे येथे भावे कुटुंबाची शेती होती. या शेतात अनेक आंब्याची झाडे होती. आंब्याच्या दिवसात आंब्याची पहिली खेप शंभूराव आपल्या इष्टमित्रांना वाटीत व नंतरच घरी खात. शंभूराव नाडीपरीक्षा, रोग्याची शुश्रुषा, औषधोपचार विनामुल्य करीत. वयाच्या ३७ व्या वर्षी शंभूरावांनी गृहत्याग करून कोटेश्वराच्या सेवेत पुढील आयुष्य घालवले.

विनोबांची आजी गंगाबाई. वयाच्या ५५ व्या वर्षी लिहीणे, वाचणे शिकली. उदारमताची आणि कौटुंबिक अडचणींना धीराने सामोरे जाणे हा तिचा स्वभाव होता. विनोबांचे वडील नरहरराव. विवेकी, नियमबद्ध, व्यवस्थित आणि टापटीपीचे गृहस्थ होते. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान विषयावर त्यांचे प्रेम होते. बडोद्याच्या कलाभवन येथून त्यांनी कला, शिक्षण क्षेत्रातील पदविका मिळविली होती. त्यांची वृत्ती संशोधकाची होती. खाकी कपड्याचा शोध हे त्यांचेच संशोधन ह्यालाच पुढे ब्रिटीशांनी सैन्याच्या गणवेषासाठी स्वीकार केला. काही दिवस बकींगहॅम गिरणीत रंग विभागात सेवा केल्यानंतर ते बडोद्यात गेले. बडोदा संस्थानच्या कार्यालयात कारकूनाची नोकरी केली.

नरहररांची वृत्ती संशोधकाची असल्यामुळे कापडाच्या नवनव्या छपाईचे, नवनवे रंग, डिझाईन तयार करणे हा त्यांचा छंद होता 'कपडा छपाई' तंत्रज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता. तसेच शिस्तबद्ध आणि जबाबदार व्यक्ती म्हणूनही त्यांचा लौकिक होता. आपल्या प्रमाणेच विनायकानेही इंग्रजी, फ्रेंच शिकावे, परदेशात जावे. बॅरिस्टर व्हावे किंवा किमान आपल्याप्रमाणे (Textile Chemist) औद्योगिक रसायनशास्त्री व्हावे असे त्यांना सतत वाटे.

आजोबा, आजी वडीलांबरोबर विनोबाच्या जीवनावर त्यांच्या धर्मनिष्ठ, प्रेमळ आईचा मोठा प्रभाव होता. विनोबांची आई अत्यंत साधी, संयमी आणि व्रतवैकल्याचे पालन करणारी गृहिणी होती. 'देतो तो देव आणि राखतो तो राक्षस' हा गुप्तमंत्र विनोबांना त्यांच्या आईनेच दिला होता. दारावर आलेला भिकारी हा ईश्वर असतो. पात्र अपात्रता ठरवणे हे आपले काम नाही. विनोबाचे जेव्हा आजन्म ब्रह्मचारी राहून समाजसेवा करण्याचा मानस बोलून दाखवला तेव्हा त्यांच्या या विचाराला संमती व त्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम त्यांच्या आईनेच केले होते. जो व्यक्ती विवाहानंतर सदाचारयुक्त आयुष्य घालवतो तो कुलकिर्ती वाढवतो. पण जो व्यक्ति ब्रह्मचारी राहतो तो मात्र आपल्या ४२ पिढ्यांचा उद्धार करतो. हा विचार विनोबांनी वयाच्या १० व्या वर्षी ऐकला तेव्हाच त्यांनी आजीवन ब्रह्मचारी राहण्याचा निश्चय केला. त्यांचे धाकटे भाऊ बाळकृष्ण उर्फ बाळकोबा शिवाजी आणि दत्तात्रय पैकी दत्तात्रयाचे अकाली निधन झाले. परंतु बाळकोबा आणि शिवाजी यांनीही आजन्म ब्रह्मचर्याचे पालन केले. बहिण शांताबाईच्या लग्नानंतर काही दिवसातच तिचा मृत्यू झाला.

विनोबांच्या आयुष्यात वरील सर्व वडीलधाऱ्या मंडळींपैकी आईचेस्थान अनन्य साधारण असे होते. भावी आयुष्यातील अनेक गोष्टीचे मुळ त्यांच्या आईच्या शिकवणुकीत आढळते. 'जीवनाचा खरा आनंद संयम आणि संतोषातच असतो, मनात कोणतीही भीती न बाळगता ईश्वराप्रती पूर्ण श्रद्धा ठेव.' इत्यादी शिकवणुकीचा समावेश होतो.

विनोबांची बालपणीची आठ दहा वर्षे गागोद्यातच गेली. या काळात त्यांचा प्राथमिक शाळेची संबंध आला नाही. आईनेच त्यांच्यावर नैतिक संस्कार केले. या वयातच त्यांना वाचन आणि पाठांतराची गोडी लागली. १९०१ साली गागोद्यातच त्यांचा उपनयन संस्कार करण्यात आला. १९०३ साली वयाच्या नवव्या वर्षी विनोबा बडोद्यास वडीलांकडे आले. बडोद्यात त्यांना एकदम तिसरी इयत्तेत प्रवेश मिळाला. विनोबा पुढे सतत प्रथम येत त्यामुळे दरवर्षी शिष्यवृत्ती त्यांना मिळत असे. सातवीत असताना विनोबांनी मराठीत ६५ टक्के आणि संस्कृतमध्ये ८५ टक्के मार्क्स मिळवून सर्वांना आश्चर्यचकीत केले होते.

बडोद्याला हायस्कूलमध्येच पुढील शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. प्रवेशासाठी इंग्रजी येणे आवश्यक होते. तेव्हा त्यांच्या वडीलानीच त्यांना इंग्रजी शिकविले. गणित हा त्यांचा आवडता विषय आणि भूमितीतील प्रमेये सोडवणे हा त्यांचा छंद होता. वाचनाचा त्यांना जबरदस्त व्यासंग होता. दिवस दिवस ते वाचनालयात काढीत. 'देवानंतर कोणती एखादी वस्तू मला प्रिय असेल तर ती भूमिती होय." असे ते म्हणत. याकाळात वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही ते गणित सोडवण्यासाठी मदत करीत. ते सतत आपल्या मित्रांना सूचवत एखादे गणित तुम्हाला सोडवता येत नसेल तर ते लिहून घेत व वर्गात शिक्षक गहन विषय समजूत सांगत अशा वेळी ते गणित सोडवित बसत.

विद्यार्थी दशेपासून लोकमान्य टिळकांच्या 'केसरी'चे विनोबा नियमित वाचक होते. देशांतर्गत राजकीय घटनापासून स्वतःला अवगत ठेवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभागी होण्याची त्यांची उत्कट इच्छा होती. बंगालच्या क्रांतीकारी आंदोलनाचेही त्यांना फार आकर्षण होते. १९०५च्या वंगभंगाच्या आंदोलनाच्या काळात टिळक, चिपळुणकर हे त्यांचे आवडते नेते होते.

प्राथमिक शाळेप्रमाणे हायस्कूलमध्येही विनोबांनी आपला प्रथम क्रमांक सोडला नाही. मराठी आणि संस्कृतातील अभ्यासक्रमाबाहेरचे वाचनावर त्यांनी भरपूर वेळ दिला. मोरापंताची' केकावली' हे त्यांचे आवडते काव्य विनोबांनी 'केकावली' चे भाषांतर इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत करावे अशी त्यांच्या वडीलांची इच्छा होती. तर आपल्या मुलाने मराठी आणि संस्कृतकडे अधिक लक्ष द्यावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती. मातृभक्त असल्याने विनोबाचे वडीलांच्या इच्छेकडे दुर्लक्ष केले व मराठी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले. इंग्रजीवरील त्याचे प्रावीण्य वडीलांमुळे होते.

'मौनार्थ सर्वार्थ साधनम्' हाच विनोबाचा विद्यार्थी जीवनातला आदर्श होता. अधिकाधिक वेळ मौन हा त्यांचा परिपाठ होता. गंभीर विषयावरील चर्चेत भाग घेणे त्यांना आवडे. स्वच्छ साधा पोषाख पण अस्ताव्यस्त केस असा त्यांचा अवतार असे. अस्ताव्यस्त केसाबद्दल कुणी टवाळी केल्यास तुझे केस कापण्याचे दुकान आहे का? असा सवाल ते करीत.

विद्यार्थी दशेतच शिवजयंती साजरी करताना त्यांनी दाखवलेला स्पष्टवक्तेपणा शिक्षक आणि सहकारी मित्रांना चकीत करणारा ठरला. "गुलाम घरात शिवजयंती साजरी करता येऊ शकते का?" असा प्रश्न विनोबांनी शिक्षक आणि सहकारी मित्रांना करून वर्गाबाहेर शिवजयंती साजरी करण्याचे समर्थन केले. त्यासाठी झालेला दंडही त्यांनी भरला.

Sasural मुक्कामात विनोबांनी लोकमान्य टिळकाचे गीतारहस्य व जोसेफ मॅझिनी या दोन्ही पुस्तकाचे वाचन केले होते. अभ्यासमंडळात या दोन्ही पुस्तकावर भाषण करणें त्यांना आवडे. संघटनात्मक काम मात्र त्यांना आवडत नसे. "तुकारामाला एखाद्या ऑफिसात कारकूनीचे काम देणे" असे त्यांचे संघटनात्मक कामाबाबत मत होते. अभ्यास मंडळाच्या निमित्याने ते सतत बाहेर राहत, उशिरा घरी येत तरी त्यांच्या आईने याबाबत तक्रार केली नाही. उलट उशीरा घरी गेल्यानंतरही आई त्यांना गरम जेवण वाढी. इतका विनोबावर त्यांच्या आईचा विश्वास होता. बाळकोबा त्यांच्या या कालखंडाविषयी लिहीतात, "विनायक अर्ध्या रात्री पर्यंत वाचीत बसे, यामुळेच त्याची दृष्टी अधू झाली, तरी त्याने चष्मा घेण्यास नकार दिला. पुढे म. गांधीच्या आग्रहावरून चष्मा घेतला. विनायकाने आपल्या प्रकृतीची केव्हाही काळजी घेतली नाही. त्याला सतत ताप असे तरी स्वतःची कामे तो स्वत:च करी.

उच्च शिक्षण: १९१३ साली विनोबानी मॅट्रीकची परीक्षा पास केली आणि बडोदा कॉलेजात इंटर मिजीएटसाठी प्रवेश घेतला. तेथेही त्यांच्यात काहीच बदल झाला नाही. उलट भटकण्याच्या त्यांच्या छंदात वाढ झाली. आधुनिक शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात काहीच उपयोग नसल्याने आजकालची महाविद्यालये म्हणजे yours most obedient servant तयार करणारे कारखाने होत असे विनोबा आपल्या मित्रांना सांगत. ह्याही काळात विनोबांनी चौफेर वाचन केले. बडोदा सेंट्रल लायब्ररीत उन्हाळ्याच्या दिवसात विनोबा शर्ट टोपी काढून उघड्या अंगाने वाचीत बसले असता असे बसणे वाचनालयाच्या परंपरेविरुद्ध आहे असे म्हणताच, 'महाशय, देवाने बुद्धी दिली आहे म्हणून मी असा बसलो आहे' असे उत्तर दिल्यामुळे त्यांची तक्रार ग्रंथपालाकडे करण्यात आली. ग्रंथपालाने शिस्त सभ्यतेविषयी सांगायला सुरुवात केल्याबरोबर विनोबा उद्गारले, "महाशय, सभ्यता तुम्हालाच शिकवावी लागेल, समोर खुर्ची रिकामी असताना आलेल्यास आधी बसण्यास सांगावे हा साधा नियम आपणास माहिती नाही का?" विनोबाच्या धाडसाचे कौतुक करीत ग्रंथपालाने हसत हसत विनोबाचा निरोप घेतला.

बडोद्याच्या वास्तव्यातच विनोबांच्या जीवनाचे ध्येय निश्चित होत होते. त्यांच्याभोवती सतत दहा पाच विद्यार्थ्यांचा गराडा असे. विनोबांची बुद्धीमत्ता, निर्भयता, त्यांचे वाचन, मनन, चिंतन आदीमुळे त्यांना विद्यार्थी आणि शिक्षकात लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या नेहमीच्या मित्रात गोपाळराव काळे, शंकरराव तगारे, महादेव मोघे, श्रीधर धोत्रे यांचा समावेश होता. हे सर्व दर रविवारी एकत्र येत. विविध विषयावर चर्चा करीत. यातून १९१४ साली 'विद्यार्थी मंडळा' ची स्थापना करण्यात आली. स्वदेशी, स्वधर्म आणि स्वभाषा हा या विद्यार्थी मंडळाचा प्रमुख उद्देश होता. १९१४ सालचे विद्यार्थी मंडळ म्हणजे विनोबांच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. मंडळाची स्थापना झाली तरी या मंडळामार्फत घ्यावयाच्या कार्यक्रमासाठी, वाचनालयासाठी लागणारा पैसा आदीचा प्रश्न आला तेव्हा विनोबांनी नेतृत्व करावे असे मित्रांनी सुचवले, तेव्हा विनोबा म्हणाले, "एखाद्यावर बॉम्ब टाकायला झाला तर मी तो टाकेन पण माझे पुढारीपण म्हणजे तुकारामाने बँक मॅनेजर होण्यासारखे आहे. "

विद्यार्थी मंडळासाठी पैसे जमविण्यासाठी विनोबांनी घरोघरी जाऊन भाजी विकणे, भांडी घासणे, कपडे धुणे, दळण आणून देणे इत्यादी पर्याय सुचवले आणि सर्वांना ते मान्य झाल्यामुळे अशा प्रकारची कामे करून पैसा जमविण्यास सुरुवात झाली. यातूनच पुस्तकांची जमवाजमव शिवजंयती, गणेशोत्सव, रामदास नवमी साजरी करणे, विविध विषयावर व्याख्याने आयोजित करणे आदी कार्यक्रम घेण्यात येऊ लागले.

गृहत्यागः आई, आजोबा, वडीलांच्या प्रभावाबरोबरच चौफेर वाचनामुळे विनोबांना गौतमबुद्ध, जगत्गुरू शंकराचार्य आणि रामदासस्वामी यांच्या आयुष्याचे आकर्षण वाटू लागले. या तिन्ही व्यक्तींनी ज्याप्रमाणे घर सोडून नवे आयुष्य घडवले तसेच आपणही करावे अशी सुप्त इच्छा या काळात त्यांच्या मनात घोळत होती. २५ मार्च १९१६ रोजी इंटरमिजीएटची परीक्षा देण्यासाठी विनोबा आपले मित्र गोपाळराव काळे आणि इतर मित्रासह गाडीत बसले. सुरत स्टेशन आल्यानंतर गोपाळरावाच्या हाती वडीलांच्या नावे पत्र देत म्हणाले, "मुंबईला गेल्यानंतर पोस्टात टाक." आणि विनोबा, तगारेआणि बेडेकर या मित्रासह भुसावळ मार्गे काशीला जाणाऱ्या गाडीत चढले. वडीलाच्या नावे लिहिलेल्या पत्रात विनोबांनी लिहीले होते, "मी परीक्षेला जाण्याऐवजी इतरत्र जात आहे, आपला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे याची मला जाणीव आहे आणि आपणास हेही माहित आहे की मी कोठेही गेलो तरी कोणतेही गैरकृत्य करणार नाही." हे पत्र वाचून नरहररावांनी मात्र आकाशपाताळ एक केले. टक्केटोपणे खाऊन येईल परत अशी मनाची समजूत घालून ते गप्प राहिले. आईची प्रतिक्रिया मात्र बोलकी होती, “विन्या जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. "

विनोबांनी काशीला जाण्याचे निश्चित केले होते, कारण त्यांना तेथे

संस्कृतचा अभ्यास करायचा होता, बंगाल, हिमालयाचा प्रवास करायचा होता.

काशी या सर्वांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे विनोबांनी मनोमन काशीची निवड

केली होती. काशीला गेल्यानंतर विनोबांनी आपला मुक्काम आहिल्याबाई

होळकर वाचनालय आणि निवासासाठी तात्या टोपेची बहीण खुर्देकराच्या वाड्यात

जागा मिळाली. काशीला पोहोचण्याबरोबर विनोबा वेद आणि उपनिषदाच्या

अभ्यासात मग्न झाले. अन्नछत्रात जेवण आणि अभ्यास असाच त्यांचा दिनक्रम

होता. काही दिवसानंतर त्यांनी घरी पत्राने कळविले, 'मी संसार सोडला असून

ब्रह्मजिज्ञासा हे माझे एकमात्र लक्ष ठरवले आहे. '

काशी येथील वास्तव्यात विनोबा शास्त्रार्थ चर्चेच सहभागी होत. खाजगी शाळेतील नोकरीचा पगार म्हणून त्यांनी स्वतःच दोन रुपये पगार मागीतला. ‘“जेवण अन्नछत्रात असल्यामुळे मला महिन्याला दोन रुपये पुरतील अधिकची जरुरी नाही" असे त्यांनी संस्थाचालकांना सांगीतले. काशीतील सुरुवातीच्या वास्तव्यात विनोबांच्या जीवनात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यांच्या सोबत गृहत्याग केलेल्या बेडेकरांचा अचानक मृत्यू. त्यामुळे नोकरीचा पहिला पगार त्यांना बेडेकरांच्या अंत्यसंस्कारासाठी खर्च करावा लागला. दुसरी घटना घरासाठी कुलुप खरेदीची. तीन आण्याचे कुलुपाचे दुकानदाराने दहा आणे मागितले. विनोबांनी त्याला दहा आणे देत म्हटले, "मला माहित आहे या कुलुपाची किंमत तीनच आणे आहे तरीपण मी आपणावर विश्वास ठेवून दहा आणे देत आहे." विनोबा त्या दुकानासमोरून दररोज जात, दररोज त्यांची अन् दुकानदाराची नजरानजर होई. एके दिवशी मात्र त्या दुकानदाराने विनोबांना बोलावून सांगितले, "कुलुपाची किंमत तीनच आणे असताना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून दहा आणे दिले, कृपा करून आपले सात आणे परत घ्या." विनोबांच्या आयुष्यातला हृदय परिवर्तनचा हा पहिला यशस्वी प्रयोग होय. आयुष्यातला पहिला मृत्यू आणि पहिले हृदय परिवर्तनाने विनोबा भारावून गेले.

काशी विद्यापीठ- गांधींचे भाषण : ६ फेब्रुवारी १९९६ रोजी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिग्ज यांच्या हस्ते

काशी विद्यापीठाचा उद्घाटन समारोहाच्या निमित्ताने म. गांधींचेही भाषण झाले होते. या भाषणाचा वृत्तांत विनोबांनी काही महिन्यानंतर बडोद्यात वाचला; पण गांधीनी आपल्या भाषणात दाखविलेल्या धाडसाचा, स्पष्टवक्तेपणाचा प्रभाव विनोबावर पडला. या भाषणात म. गांधीनी म्हटले होते, "मला माझ्या देशबांधवांशी या पवित्र कार्यात या नव्या विद्यापीठाच्या कक्षेत परक्याच्या भाषेतून आपले विचार मांडावे लागत आहेत ही अत्यंत लाजेची आणि अपमानजनक बाब आहे." या विचारांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून ब्रिटीशांच्या सत्ता वैभवाच्या प्रदर्शनावर टीका करीत कार्यक्रमाला हजर असलेल्या संस्थानिकांच्या बडेजाव आणि भरजरी पोषाख व दागिन्यावर गांधींनी टीका केली. म. गांधी पुढे म्हणाले, “या विशाल मंडपामध्ये काय दिसते? एक. भपकेबाज दृश्य की श्रीमंती, जडजवाहीराचे प्रदर्शन, की परदेशातून पॅरीसमधून येणाऱ्या बड्या जवाहिऱ्याच्यासाठी श्रीमंतीचे प्रदर्शन आपल्या ऐश्वर्याने नटलेल्या या संस्थानिकांशी मी या देशातील लक्षावधी हिंदी बांधवांची तुलना करतो... पण मला असे म्हणावेसे वाटते की आपल्या देशबांधवांचे विश्वस्त बनल्याशिवाय या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही. "

पुढे याच भाषणातून गांधीजींनी क्रांतीकारकांच्या दहशतवादी मार्गावर टीका करताना ते म्हणाले, "मीही एक क्रांतीवादी आहे. पण निराळ्या प्रकारचा. आपल्यामध्ये अराजकतावादी क्रांतीकारकाचा आणखी एक वर्ग असून त्यांच्यापर्यंत जर माझा आवाज पोहोचत असेल तर मी त्यांना सांगेन की भारतीयांना जर त्यांना जिंकायचे असेल तर भारतात अराजकतावादाला स्थान नाही. अराजकतावादीचे देशप्रेम मी मान्य करतो, स्वदेशासाठी मरण पत्करण्याच्या त्यांच्या धैर्याचे मी कौतुक करतो पण त्यांची हत्या सन्माननीय नाही अशा मार्गांना कोणत्याही धर्मग्रंथात स्थान नाही.....

सर्वात शेवटी गांधीजी म्हणाले, "इंग्रजांनी या देशात् न राहता हा देश सोडून चालते व्हावे असे आम्हाला वाटते... स्पष्टपणे असे सुचवल्यामुळे जर आम्हाला मृत्युदंड दिला तरी आम्ही राजी खुषीने मृत्युदंडही स्वीकारण्यास तयार आहोत.

म. गांधींच्या या भाषणामुळे मात्र सभाध्यक्ष अॅनी बेझंट, सभेत उपस्थित संस्थानिकांनी सभात्याग केला आणि सभा गोंधळात पार पडली.

या घटनेपासून म. गांधींना भेटण्याची विनोबांना तीव्र इच्छा होती. गांधींच्या निर्भयता, अहिंसक प्रतिकाराच्या भावनेचा विनोबावर प्रभाव पडला. काशीतील दोन महिन्याच्या वास्तव्यानंतर त्यांना असे वाटू लागले की आपली राजकीय आणि अध्यात्मिक विषयक आकांक्षाची पूर्तता गांधी भेटीतूनच पूर्ण होऊ शकेल. म्हणून त्यांनी म. गांधींना काही पत्रे लिहिली. यातून आपल्या काही तात्त्विक, सैद्धांतिक शंका त्यांनी विचारल्या. तेव्हा गांधींनी विनोबांना कळवले अशा प्रश्नाची उत्तरे पत्राने देता येत नाहीत त्यासाठी अहमदाबादेस कोचरब आश्रमात येऊनच सर्व शंकाचे समाधान होऊ शकेल.

Mahatma Jyotirao Phule ची आणखी पुस्तके

1

गुलामगिरी भाग १

23 June 2023
0
0
0

ब्रह्मा, उत्पत्ति, सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक यांविषयी.धों०-युरोपखंडांतील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली, याजवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमांस हरताळ लावि

2

गुलामगिरी भाग २

23 June 2023
0
0
0

मत्स्य आणि शेखासूर याविषयी.धो०- वामनापूर्वी इराणातून या देशात आर्य लोकांच्या एकदर किती टोळ्या आल्या असाव्या?जो० या देशात आर्य लोकांच्या टोळ्या जळमागनि अनेक आल्या.धो० त्यापैकी पहिली टोळी जळमार्गाने लढा

3

गुलामगिरी भाग 3

23 June 2023
0
0
0

कच्छ, भूदेव अथवा भूपती, क्षत्रिय, द्विजआणि कश्यपराजा याविषयी.धो०- मासा आणि कासव यामध्ये एकदर सर्व गोष्टी ताडून पहातां त्यामध्ये थोडे थोडे अंतर दिसून येते; परंतु इतर काही गोष्टीत म्हणजे जलीत रहाणे, ओडी

4

गुलामगिरी भाग ४

23 June 2023
0
0
0

वराह आणि हिरण्याक्ष याविषयी.घो०-कच्छ मेल्यामागे द्विजाचा कोण अधिकारी झाला ?जो०- वराह.घों०-वराह हा डुकरापासून जन्मला असे भागवत वगैरे इतिहासकयोंनी लिहून ठेविलें आहे, याविषयी आपले मत कसे काय आहे?जो०- वास

5

गुलामगिरी भाग ५

23 June 2023
0
0
0

नारसिंह, हिरण्यकश्यपु, प्रल्हाद, विप्र,विरोचन इत्यादिकाविषयी.धो०- वराह मेल्यावर द्विज लोकाचा कोण अधिकारी झाला?जो०- नृसिंह,धो० नृसिंह स्वभावाने कसा होता?जो०- नृसिंहाचा स्वभाव लोभी, कृत्रिमी, फितूरी, कप

6

गुलामगिरी भाग ६

23 June 2023
0
0
0

बळीराजा, जोतीबा मऱ्हाठे, खंडोबा, महासुभा नऊ खंडांचा न्यायी, भैरोबा, भराडी, सात आश्रयीत, तळी भरणे, आदितवारास पवित्र मानणे, वामन, पक्ष घालणे, विध्यावली, घट बसविणे, बळीराजाचे मरण, सति जाणे, आराधी लोक, शि

7

गुलामगिरी भाग ७

26 June 2023
0
0
0

ब्रह्मा, ताडपत्रावर लिहिण्याची चाल, जादुमंत्र, संस्कृताचें मूळ, आटक नदीचे पलीकडेस जाण्याची बंदी. पूर्वी घोडी वगैरे जनावरें ब्राह्मण लोक खात होते, भट, राक्षस, यज्ञ, बाणासुरांचे मरण, परवारी, सुताचे पाष्

8

गुलामगिरी भाग ८

26 June 2023
0
0
0

परशुराम, मातृवध, एकवीस स्वाऱ्या, दैत्य, खंडेरावाने रावणाचा आश्रय केला. नऊखंडाची जाणाई, सात आसरा, महारांच्या गळ्यातील काळा दोरा, अतिशूद्र अत्येज, मांग, चांडाळ, महारास जिवंतच पायामध्ये दडपणे, बाह्मणात प

9

गुलामगिरी भाग ९

26 June 2023
0
0
0

वेदमंत्र, जादूचे वजन, मूठ मारणे, देव्हारे घुमविणे, जप, चार वेद, ब्रम्हघोळ, नारदशाई, नवीन ग्रंथ, शूद्रांस ज्ञान देण्याची बंदी, भागवत व मनुसंहिता यांचा असंगतपणा, इत्यादिकाविषयी.धो०- तुम्ही खुटीस नागर बर

10

गुलामगिरी भाग १०

26 June 2023
0
0
0

दुसरे बळीराजे, ब्राह्मणधमांची फजीती, शंकराचार्यांचे कृत्रिम नास्तिक मत, निर्दयपणा, प्राकृत ग्रंथकार, कर्म आणि ज्ञानमार्ग, बाजीराव, मुसलमानांचा द्वेष, आणि अमेरिकन व स्कॉच उपदेशकानी बाह्मणांचा कृत्रिमरू

11

गुलामगिरी भाग ११

26 June 2023
0
0
0

पुराण सांगणे, बड़े वगैरे परिणाम, शूद्र संस्थानिक, कुळकर्णी, सरस्वतीची प्रार्थना, जप, अनुष्ठाने, देवस्थाने, दक्षिणा. मोठ्या आडनावाच्या सभा इत्यादिकाविषयी.धो०- काय? या अधर्म भटगारुड्याच्या दंगेखोर मूळ प

12

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

13

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

14

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाचे

15

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपलीतय

16

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

17

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

18

गुलामगिरी भाग १२

27 June 2023
0
0
0

वतनदार भट कुळकर्णी, युरोपिअन लोकाचे वसाहतीची जरुरी, विद्याखात्याच्या तोंडावर काळोखाचा डाग, युरोपिअन कामगारांची अक्कल गुंग कशी होते, इत्यादिकाविषयी घो०- असो, परंतु आपण पूर्वी म्हणाला की, बाकी एकदर स

19

गुलामगिरी भाग १३

27 June 2023
0
0
0

मामलेदार, कलेक्टर, रेव्हिन्यु, जज्ज आणि इंजिनियरखात्यातील भट कामगार, इत्यादिकाविषयी धो०-यावरून भट मामलेदार असल्यामुळे ते काही अज्ञानी शूद्रांचे नुकसान करितात काय? जो०- आजपर्यंत जे भट मामलेदार झा

20

गुलामगरी भाग १४

27 June 2023
0
0
0

युरोपियन कामगारांचा निरुपाय, खोतांचे वर्चस्व, पेन्शन घेऊन निर्वेध झालेल्या युरोपियन कामगारांनी सरकारांत गांवोगावच्या हकीगती कळविण्याची जरुरी, धर्म आणि जात्याभिमान इत्यादिकाविषयी धो०- असे जर अनर्थ

21

गुलामगिरी भाग १५

27 June 2023
0
0
0

सरकारी शाळाखाती. म्युनिसिपालिटी, दक्षणा प्राइज कमेटी व भट वर्तमानपत्रकत्यांची जूट आणि शूद्रादि अतिशूद्रांच्या मुलानी विद्या शिकू नये म्हणून भट लोकांचा कट इत्यादिकाविषयी.. धो०- सरकारी शाळाखात्यातील

22

गुलामगिरी भाग १६

27 June 2023
0
0
0

ब्रह्मराक्षसाचे पिंडेचा धिक्कार. ० या सर्व आपल्या सवादावरून असे सिद्ध होते की, एकदर सर्व भटानी आपल्या कृत्रिमी धर्माच्या अडून आपल्या भोळ्या सरकारच्या डोळ्यात माती टाकून आपण सर्व शूद्रादि अतिशूद्रास

23

सार्वजनिक सत्यधर्म ( ग्रंथकर्त्याची प्रस्तावना)

29 June 2023
0
0
0

या आपल्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये निर्मिकानें अनंत सूर्यमंडळासह त्यांच्या ग्रहोपग्रहांसीहत तत्संबंधी एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न केले आहे त्यांपकी आपण सर्व मानवस्त्रीपुरुषानी त्याविषयी काय

24

सार्वजनिक सत्यधर्म (सुख)

29 June 2023
0
0
0

यशवंत जोतीराव फुले. प्रश्न- मानवप्राणी एकंदर सर्व जगात कशाने सुखी होईल?जोतीराव गोविंदराव फुले. उत्तर - सत्य वर्तन केल्याशिवाय मानवप्राणी जगात सुखी होणार नाही याविषयी प्रमाण देतो.|| अखंड ||।। सत्य सर्व

25

सार्वजनिक सत्यधर्म (धर्मपुस्तक)

29 June 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर प्र०-यावरून कोणत्याच धर्मपुस्तकात सर्वचैव प्राणीमात्रास सुख देण्यापुरते सत्य नाही काय?जोतीराव गोविंदराव फुले उ०- या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढी म्हणून मानवांनी धर्मपुस्तकें केली

26

सार्वजनिक सत्यधर्म (निर्माणकर्ता)

29 June 2023
0
0
0

यशवंत जोतीराव फुले प्र० तर आपल्या या सूर्यमंडळासह आपण वस्ती करणाऱ्या पृथ्वीचा निर्माणकर्त्ता कोण आहे?जोतीराव फुले. उ०- पूर्व अथवा पश्चिम अथवा दक्षिण, अथवा उत्तर इत्यादि दहा दिशांपैकी एका तरी दिशेचा आप

27

सार्वजनिक सत्यधर्म (पूजा)

29 June 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर प्र०- आता आपल्या निर्माणकर्त्यावर पुष्पे चढवून त्याची पूजा आपण मानवानी कोणत्या तऱ्हेने करावी?जोतीराव उ० या अफाट पोकळीतील अनंत सूर्यमंडळासह त्याच्या ग्रहोपग्रहासहित पृथ्वीवरील पुष्

28

सार्वजनिक सत्यधर्म (नामस्मरण)

29 June 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर. प्र० निर्माणकर्त्याचे वारवार पोकळ नामस्मरण केल्याने त्यास संतोष होईल काय?जोतीराव फुले उ०- आपण घरी असता मी आपल्या घरी तुमच्या नावाने एखाद्या धातूच्या अथवा दगडाच्या मूर्तीवर पुष्पे

29

सार्वजनिक सत्यधर्म (स्त्री आणि पुरुष)

29 June 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर प्र० निर्मिकानें या आपल्या पृथ्वीवर जलचर, स्थलचर व खेंचर अशा प्रकारच्या जिवाच्या तीन जाती निर्माण केल्या आहेत; त्यांपैकी सर्वात श्रेष्ठ कोण आहे?जोतीराव गोविंदराव फुले उ० त्यापैकी

30

पाप (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

पापमानाजी बोलूजी पाटील. प्र०- पापाचरण करून एकंदर सर्व मानवी प्राणी दुःखात पडू नयेत, म्हणून मानवाच्या बचावासाठी आपल्या निर्मीकानें त्यास काही साधन दिले नाही काय ?जोतीराव गोविंदराव फुले. 30- असे कसें हो

31

पुण्य (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर प्र०-पुण्य कशास म्हणावे?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- स्वतःस मात्र सुख होण्याकरिता एकदर सर्व मानव प्राण्यास कायीक व मानसिक पिडा दिली नाही, म्हणजे त्यासच पुण्य म्हणावें.बळवंतराव प्र०

32

जातिभेद (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

यशवंत जोतीराव फुले. प्र०- मानवी प्राण्यात जातिभेद आहे किंवा नाही?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- मानवी प्राण्यात मूळ जातिभेद नाही,यशवंत प्र० मानवी प्राण्यात मूळ जातिभेद कसा नाहीं?जोतीराव उ०- पशुपक्षी वगैर

33

श्लोक (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

सहृदय समनस्य अविद्वेष कृणोमिवः अन्योन्य अभिहर्यत वत्सजात हवाध्या ।अनुव्रतः पितुः पुत्री मात्रा भवतु सम्मनः जायापत्ये मधुमतिं वाच वदतु शांतिवान् ।मा भ्राता भ्रातारं द्विषद् मास्वसार उतस्वसा संभ्यचः सव्

34

तर्क (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

गुडीराम धोडीराम मवाशी प्र० तर्क या शब्दाचे किती अर्थ होतात?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- तर्क या शब्दाचे तीन प्रकारचे अर्थ होतात. १ला प्रकार प्रत्यक्ष कर्त्यावरून कर्माचे आणि कर्मावरुन कर्त्याचं ज्ञान ह

35

ज्ञानेश्वरी, बारावा अध्याय ( सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

जोतीराव उ०- ज्ञानेश्वरी, अध्याय १२ वा II जो सर्व भूतांचे ठायीं ॥ द्वेषाते नेणेची काही II आप पर जया नाहीं II चैतन्या जैसे II १ II असा खरोखरच समज जर बाळबोध कृष्णाजीचा होता, तर त्याने पाडवांस मदत करून त्

36

ज्ञानेश्वरी, तेरावा अध्याय (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

तेराव्या अध्यायातील सातव्या व आठव्या ओवीतला अभिप्राय ज्या कोणास सर्वज्ञता आल्याबरोबर त्याचा महिमा वाढेल, या भयास्तव त्याने वेड्याचे सोंग घेणे व त्याने आपला चतुरपणा आवडीनें लपविण्यासाठी पिसा होणे, हें

37

दैव (सार्वजनिक सात्यधर्म )

3 July 2023
0
0
0

।। मना त्वाचि रे पूर्वसचीत केलें । तयासारिखे भोगणे प्राप्त झालें ॥। ८ ।।-रामदास.गणपतराव दर्याजी थोरात प्र० देवाचे कोणते प्रतिशब्द आहेत?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- दैवास नशीब, प्रालब्ध, प्राक्तन, संचित

38

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय)

4 July 2023
0
0
0

गोविंदराव प्र० तूर्त हैं एकीकडे ठेवा, परंतु ताज्यातवान्या गायागुरे यांचे व बोकड यांचे बुक्यानें प्राण घेऊन त्यांचे मांस खाणारे अघोरी आर्यभट्ट ब्राह्मण व त्याचप्रमाणे रोगानें अथवा लंगडीलुलीं, आंधळीपांग

39

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 2)

4 July 2023
0
0
0

गोविंदराव प्र० सदरची जागा चालविण्यास एकसुद्धा ह्यार अथवा मांग निवडणार नाही.जोतीराव उ० याचप्रमाणे मोघम आम्हा हिंदूस कलेक्टरांच्या जागा, युरोपियन लोकांसारख्या इंग्रज सरकाराने द्याव्यात, म्हणून सार्वजनीक

40

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 3)

4 July 2023
0
0
0

सत्यगणपतराव दर्याजी थोरात प्र० सत्यवर्तन करणारे कोणास म्हणावे?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- सत्यवर्तन करणाऱ्याविषयी नियम देतो, ते येणेप्रमाणे-१. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकदर सर्व प्राणीमात्रा

41

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 4)

4 July 2023
0
0
0

आकाशातील ग्रहबळवंतराव हरी साकवळकर. प्र० आकाशातील ग्रह या आपल्या भूमंडळावरील मानव स्त्री-पुरुषास पीडा देतात, ह्मणून ग्रहशास्त्रवेत्ते मोठ्या डौलाने ह्मणतात, हे खरे आहे काय?जोतीराव गोविंदराव फुले. उ० या

42

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 5)

4 July 2023
0
0
0

जन्मलक्ष्मण मनाजी, प्र० या जगात मानव स्त्री-पुरुषांस कन्या अथवा पुत्र झाल्याबरोबर त्यास कसें वाटते?जोतीराव फुले उ०- मानव स्त्री-पुरुषांस कन्या अथवा पुत्र झाल्याबरोबर त्यास आनंद होऊन उल्हास वाटतो खरा,

43

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 6)

4 July 2023
0
0
0

कन्या अथवा पुत्र यांचे नावाचा संस्कार,-अन्नाचा संस्कार आणि शाळेचा संस्कार.यशवंत जोतीराव फुले. प्र० कन्या अथवा पुत्र यांच्या नांवाचा संस्कार केव्हा करावा?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- कन्या असल्यास तिच्य

44

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 7)

4 July 2023
0
0
0

लग्नगणपतराव दर्याजी थोरात, पेन्शनर प्र० - लग्न म्हणजे काय?जोतीराव गोविदराव फुले. उ०- आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याने जेवढे म्हणून प्राणीमात्र निर्माण केले आहेत, त्यातून मानव स्त्री-पुरुषास एक तऱ्हेच

45

सार्वजनिक सत्यधर्म (दुष्टाचरण)

5 July 2023
0
0
0

लक्ष्मण मानाजी पाटील, मगर प्र०- आपण सर्वाच्या निर्मीकाने एकंदर सर्व प्राणी मात्रास उत्पन्न करतेवेळी फक्त मानव स्त्री-पुरुषांस सारासार विचार करण्याची बुद्धि देऊन, त्यास अतिपवित्र केले आहे, असा जर

46

सार्वनिक सत्यधर्म (मृत्यू)

5 July 2023
0
0
0

यशवंत जोतीराव फुले. प्र०- मृत्यु ह्मणजे काय?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- एकदर सर्व प्राणीमात्राचे देहस्थित प्राण्यांचे जे गमन ते.यशवंत प्र०- कित्येक मानव स्त्रीपुरुषांच्या तान्ह्या मुली-मुलास मरण येण्य

47

सार्वनिक सत्यधर्म. ।। प्रार्थना ||

5 July 2023
0
0
0

या तुझ्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये अनंत सूर्यमंडलासहित या पृथ्वीवरील प्राणीमात्रासह मज मानवास निर्माण करून मला सद्सद्विचार करण्याची बुद्धि दिलीस व तुझ्या आज्ञेप्रमाणे सत्यास स्मरून मी या जगांत वर्

48

सार्वनिक सत्यधर्म. (प्रेताची गती)

5 July 2023
0
0
0

बळवंतराव हरी साकवळकर, प्र० एकदर सर्व मानव कन्यापुत्रांनी आपल्या माता-पित्यांच्या प्रेतांची गति कशी लावावी ?जोतीराव गोविंदराव फुले उ० एकंदर सर्व मानव कन्यापुत्रांच्या मातेने अथवा पित्यानें आपल्या मरणाच

49

सार्वनिक सत्यधर्म. (प्रार्थना)

5 July 2023
0
0
0

तू एकदर सर्व पृथ्वीवरील मातीस निर्माण करून तिच्याद्वारे आम्हा सर्व मात्रांचे पोषण करवितोस. यास्तव आम्हांपैकी एका मानवाचे प्राणोत्कमण झाले. त्यातील माती, मातीस मिळवून आह्मी सर्व तुझ्या शाश्वत अविनाशी व

50

सार्वजनिक सत्यधर्म (श्राद्ध)

5 July 2023
0
0
0

गोविंद गणपतराव काळे प्र० श्राद्ध म्हणजे काय?जोतीराव गोविंदराव फुले उ०- मृत पितरांचे उद्देशाने पुत्रादिकांनी करायाचीं ब्राह्मणभोजने पिडदानें एतद् प्रधान कर्मे आहेत ती.गोविंद प्र०- यावरून शुद्रादी अतिशू

51

सार्वजनिक सत्यधर्म (एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांस ग्रंथकर्त्याची प्रार्थना)

5 July 2023
0
0
0

।। अखंड ||निर्मीकाने जर एक पृथ्वी केली । वाही भार भली । सर्वत्रीचा ||१॥ध्रु० ।। तृण वृक्ष भार पाळी आम्हासाठीं ।। फळें तीं गोमटी ।। छायेसह ।। २ ।। सुखसोईसाठी गरगर फेरे रात्रदीन सारें । तीच कर

---

एक पुस्तक वाचा