गुडीराम धोडीराम मवाशी प्र० तर्क या शब्दाचे किती अर्थ होतात?
जोतीराव गोविंदराव फुले. उ०- तर्क या शब्दाचे तीन प्रकारचे अर्थ होतात. १ला प्रकार प्रत्यक्ष कर्त्यावरून कर्माचे आणि कर्मावरुन कर्त्याचं ज्ञान होते. २ रा प्रकार पदार्थांच्या लक्षण दर्शनावरून कर्माचे जे ज्ञान होते ते. ३ रा प्रकार अनेक गोष्टीविषयी अनेक प्रकारचे मात्र अंतःकरणाचे आकार म्हणजे तरंग होतात, ज्यामध्ये निश्चयरूपता असत नाहीं.
जोतीराव 30 कातणीने जाळे केलें, पाकोळीने कोठे वांचिलें, आणि मनुष्याने शस्त्र केले या वाक्यास आळे, कोठे आणि शस्त्र यांचे कर्ते कातक, पाकोळी आणि मनुष्य व त्याचप्रमाणे कातन, पाकोळी आणि मनुष्य यांचे कर्म जाळे, कोठे आणि शस्त्र होत, असे ज्ञान होते.
गुडीराम प्र०-२ रा प्रकार पदार्थाच्या लक्षण दर्शनावरून कर्माचे जे ज्ञान होते, ते कसें?
जोतीराव उ०- आपणास कर्त्यांच्या लक्षणावरून कर्माचं ज्ञान होते. यावरून त्यांचे कर्ते अद्देश्य असावेत असे अनुमान होते. जसे वायूने जहाज बुडालें, विजेनें मनुष्य मेला आणि मनाने कुतर्क घेतले. या वाक्यांत जहाज, मनुष्य आणि कुतर्क ह्यांचे कर्म जहाज, मनुष्य आणि कुतर्क होत, असे ज्ञान होते.
गुडीराम प्र०- ३ रा प्रकार अनेक गोष्टीविषयी अनेक प्रकारचे जे अंतःकरणाचे आकार ह्मणजे तरंग होतात, ज्यामध्ये निश्चयरूपता असत नाहीं, त्याविषयीं कसें?
जोतीराव 30- ज्यामध्ये कर्त्यावाचून कर्म असते व त्याच्या साक्षात्काराविषयी अथवा लक्षणाविषयीं काहींच ज्ञान होत नाही. जे पहावें तें सर्व अनुमानाने वाटेल तसे भंगडासारखे स्वकपोलकल्पित केलेले असते, त्याविषयी महाभारतातील धूर्त आर्यभट्टानी अज्ञानी जनापासून आपला मतलब साधून हित होण्यासाठी आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याच्या जागी लटकेच अष्टपैलू बाळबोध काळ्या कृष्णास कल्पून त्याने लोभी अर्जुनास बोध केला होता, ज्यास गिता ह्मणतात, व पुढे काही काळाने जेव्हा जाहामर्द मुसलमान लोकांचे या देशांत राज्य झाले, तेव्हा अज्ञानी शुद्रादि अतिशूद्र पवित्र कुराणातील सार्वजनिक सत्य पाहून मुसलमान होऊ लागतील, या भयास्तव धूर्त देशस्थ आळंदीकर ज्ञानोबाने तो गीतेतील बोध उचलून, त्याच्यावर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ केला. तो सर्व अक्षरश: वाचून पाहिल्याबरोबर धूर्त आर्य धर्माचे
पाचपेची आंधळे भारुड सर्व लोकांच्या ध्यानांत सहज येईल?
गुडीराम प्र०- त्याविषयी येथे थोडक्यात विवेचन करण्याची कृपा कराल, तर बरे होईल.