मत्स्य आणि शेखासूर याविषयी.
धो०- वामनापूर्वी इराणातून या देशात आर्य लोकांच्या एकदर किती टोळ्या आल्या असाव्या?
जो० या देशात आर्य लोकांच्या टोळ्या जळमागनि अनेक आल्या.
धो० त्यापैकी पहिली टोळी जळमार्गाने लढाऊ गलबतावरून आली किंवा कसे?
जो० लढाऊ गलबतें त्या काळी नव्हती, सबब ती टोळी लहान लहान मचव्यातून आली व ते मचवे माशासारिखे त्वरेने पाण्यावरून चालत असत, म्हणून त्या टोळीच्या अधिकाऱ्यांचे टोपणनाव मत्स्य पडले असावें.
घो०-तर मग ब्राम्हण इतिहासकर्त्यानी भागवत वगैरे ग्रंथात तो टोळीचा अधिकारी मत्स्यापासून जन्मला म्हणून लिहिले आहे, हे कसें?
जो०- त्याविषयी तूच विचार करून पाहा की, मनुष्य आणि मासा यांच्या अवयवांत, आहारात, निद्रेत, मैथुनात आणि उत्पत्तीत किती अंतर आहे? आणि त्याच प्रमाणे त्यांच्या मगजात, काळजीत, फुफ्फुसांत, आतड्यात, गर्भ वाढण्याचा जाग्यांत, आणि प्रसूत होण्याच्या मार्गात किती चमत्कारीक अंतर आहे! मनुष्य हा जमिनीवर गुजारा करून राहाणारा प्राणी होय. तो पाण्यात पडल्याबरोबर गटांगळ्या खाऊन आपल्या प्राणास मुकतो. मासा हा सर्व काळ पाण्यांत राहून आपला गुजारा करणारा प्राणी होय, व त्यास पाण्याबाहेर काढल्याबरोबर तो तरफडून मरतो स्त्रिया बहुतकरून एकाच मुलास जन्म देतात; परंतु मत्स्यीण प्रथम पुष्कळ अंडी घालून काही काळानंतर त्या सर्वास फोडून त्यातून आपली सर्व बच्ची बाहेर काढिते आता ज्या अंड्यामध्ये हे मत्स्यबाळ होते, त्यास मात्र तिने पाण्याबाहेर आणून फोडिले, आणि त्यातून तिने ते मत्स्यबाळ बाहेर काढले असेल असे म्हणावे तर तिचा प्राण पाण्याबाहेर कसा वाचला असेल? कदाचित् तिने पाण्यातच ते अंडे फोडून मत्स्यास बाहेर काढले असेल असे म्हणावे तर त्या मत्स्य मानवासारिखे बाळकाचा प्राण पाण्यात कसा वाचला असावा? कोणी अशी शंका घेतील की, मनुष्यातील एखाद्या सराईत पाणबुड्याने पाण्यात तळी बुडी मारून मत्स्य बालक ज्या अंड्यामध्ये होते ते अंडे मात्र ओळखून जमिनीवर घेऊन आला असेल, असो, तसे का होईना, पण पुढे त्या मत्स्यिणीचें अंडे कोणत्या चतुर मर्दाने फोडून त्यांतून मत्स्यबाळ बाहेर काढिलें असावें बरे? कारण जरी आता युरोप व अमेरिका खंडात पुष्कळ सुधारणा होऊन मोठमोठे नामांकित विद्वान वैद्यशास्त्रांत निपूण झाले आहेत, तथापि त्यांपैकी एकाच्यानेहि छातीला हात लावून मी मत्स्यिणीचें अंडे फोडून त्यातून जिवंत मत्स्यांचे बच्चे काढीन, असे म्हणवणार नाही असो बरे, ते अंडे पाण्यात आहे. म्हणून तो मोठ्या महत्वाचा निरोप कोणत्या अमर मत्स्याने पाण्याबाहेर येऊन त्या पाणबुड्यास कळविला असेल व त्या जळचर निरोप्याची भाषा मानव पाणबुड्यास कशी समजली असेल. अशा नाना प्रकारच्या शंकांचे त्या इतिहासातल्या लेखावरून यथास्थित समाधान करून घेता येत नाहीं यास्तव त्याविषयी असे अनुमान सिद्ध होते की, मागाहून काही लबाड लोकानी सधी पाहून एकंदर प्राचीन ग्रंथांत ही दंतकथा कोंबली असावी.
घोर-बरें, तो टोळीचा मत्स्य अधिकारी आपल्या लोकासहीत कोणत्या ठिकाणी येऊन उतरला?
जो०- पश्चिम समुद्रातून येऊन तो एका बंदरावर उतरला.
धो०- मत्स्याने बदरावर उतरल्याबरोबर काय केले?
जो० मत्स्याने शंखासूर या नांवाच्या क्षेत्रपतीस मारून त्याचे राज्य घेतले. पुढे तें शंखासुराचे राज्य आर्य लोकांच्या ताब्यांत मत्स्याच्या मरणकाळापावेतो बिनधोक राहिले. मत्स्य मरताच शंखासुराच्या लोकानी आपले राज्य परत घ्यावे या इराद्याने मत्स्याचे टोळीवर मोठ्या निकराने हल्ला केला.
धो०- पुढे त्या हल्ल्यामध्ये काय परिणाम झाला?
जो०-त्या हल्ल्यामध्ये मत्स्याचे टोळीचा पराभव झाल्यामुळे तिने रणभूमी सोडून पळ काढिला नंतर शंखासुराच्या लोकांनी तिचा पाठलाग केल्यामुळे ती अखेरीस एका डोंगरावर जाऊन झाडीत लपून महिली. इतक्यात इराणीतून आर्यलोकाची दुसरी एक मोठी टोळी कथव्यामधून बंदरा येऊन उतरली व ते कचवे मचव्यापेक्षा काहीसे मोठे असल्यामुळे पाण्यावर कासवासारिखे सावकाश चालत असत, या कारणामुळे त्या टोळीच्या अधिकाऱ्याचे टोपण नाव कच्छ पडले.