ब्रह्मा, उत्पत्ति, सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक यांविषयी.
धों०-युरोपखंडांतील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली, याजवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमांस हरताळ लाविला; कारण मनुसंहितेत लिहिले आहे की, ब्रम्हदेवाने आपल्या मुखापासून ब्राम्हणास उत्पन्न केलें; आणि त्या ब्राम्हणांची फक्त सेवाचाकरी करण्याकरिता त्यानें आपल्या पायांपासून शूद्रांस उत्पन्न केले,
जो०- इंग्रज वगैरे सरकारांनीं दास करण्याची बंदी केली. याजवरून त्यांनी ब्रम्ह्याच्या आज्ञेस हरताळ लाविला म्हणून तुझें म्हणणे आहे. तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नाना प्रकारचे लोक आहेत, त्यास ब्रम्ह्याने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे ?
धो०-याजविषयीं सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असे उत्तर देतात की, इंग्रज वगैरे लोक अधम, दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेंत त्या लोकांविषयी मुळीच लेख नाहीं.
जो० यावरून तुझ्या मतें ब्राम्हणामध्ये अधम, दुराचारी गुळीच नाहीत की काय ?
चो०- शोधाअंती इतर लोकांपेक्षां ब्राम्हणांमध्ये अधिक अधम व अधिक दुराचारी आहेत असे आढळते?
जो० तर मग अशा अधम व दुराचारी ब्राम्हणांविषयी मनुसंहिर्तत कसा लेख आला?
धो०-यावरून असे सिद्ध होते की, मनूने जी उत्पत्ति लिहिली आहे ती अगदी खोटी आहे; कारण ती सर्व मनुष्यांस लागू पडत नाहीं ।
जो०- म्हणूनच इंग्लिश वगैरे लोकांतील ज्ञात्यांनी ब्राम्हणातील पुस्तककर्त्याच्या लबाड्या जाणून दास करण्याची बंदी केली. ब्रम्हा हा सर्व मनुष्यमात्रांच्या उत्पत्तीस खरोखर कारण असता तर त्यांनी दास करण्याची बंदीच केली नसती. मनूने चार वर्णाची उत्पत्ति लिहिली आहे, ती एकंदर सर्व सृष्टिक्रमाशी ताडून पाहिली म्हणजे सर्व खोटी आहे असे आपणास कळून येते.
धों० म्हणजे ती कशी ?
जो०- ब्राह्मण ब्रह्मयाच्या मुखापासून झाले; परंतु एकंदर सर्व ब्राह्मणांची मूळ माता ब्राह्मणी ही ब्रम्ह्याच्या कोणत्या अवयवापासून झाली याविषयी मनूने काहीच लिहून ठेविलें नाही, हे कसें?
चौ० कारण ती त्या विद्वान ब्राह्मणांच्या म्हणण्याप्रमाणें अधम आणि दुराचारी असेल, यास्तव तूर्त तिजला म्लेंछाच्या पंक्तीस बसवा. जो० आम्ही भूदेव, आम्ही सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ, असे मोठ्या गर्वानें नेहमी बोलणारे अशास जन्म देणारी मूळमाता ब्राह्मणी ना? आणि तूं
तिजला म्लेच्छांचे पंक्तीस कसे बसवितोस? तिला तेथील दारू व गोमांसाचा घमघमाट कसा आवडेल? हे तू मोठे अनुचित् बोलतोस बाबा !
धौं०-तुम्हीच कित्येक वेळा भर सभेत बोलला की, ब्राह्मणांचे मूळ पूर्वज जे ऋषि-वर्य, ते श्राद्धाचे निमित्ताने गाई मारून त्यांच्या मांसाची नाना तन्हेची पक्वान्ने करून खात होते, आणि आता मात्र त्यांच्या मूळ मातेस घाण येईल म्हणून म्हणता हे कसे तुम्ही इंग्रजी राज्यास हयाती चितून थोडे दिवस थांबा, म्हणजे हल्लींचे बहुतेक सावळे ब्राम्हण, रेसिडेंट, गव्हर्नर वगैरे कामदारांची आपल्यावर जास्ती मेहेरबानी व्हावी, याकरिता त्यांच्या टेबलावरचे उरलेले मासाचे तुकडे बुटलेराच्या वाटणीसदेखील येऊ देणार नाहीत असे तुम्हांस दिसेल. आताशा बहुतेक महार बुटलेर ब्राह्मणांच्या नावाने आतल्या आंत कुरकुरण्यास लागले आहेस हें तुम्हांला ठाऊक नाही? मनूनेच ब्राम्हणीच्या उत्पत्तीविषयी लिहून ठेविले नाही. सबब या दोषाचें खापर त्याच्याच बोडक्यावर फौडा, त्याविषयीं तूं अनुचित बोलतोस म्हणून तुम्ही मला का दोष देता? पुढे चालू द्या-
जो०- बरे तुझी मर्जी, तसें कां होईना. आतां ब्राम्हणास जन्म देणारे जे ब्रम्ह्याचे मुख ते दरमहाचे दरमहा दूर झाल्यामुळे तो चार दिवस सोंवळा होऊन बसत होता, किंवा लिंगाइतिणीसारखा राख लावून पाक होऊन घरांतील कामकाज करीत होता याविषयीं मनूचा कांहीं लेख आहे काय? ० नाही. परंतु, ब्राम्हणांच्या उत्पत्तीस ब्रम्हा हा मूळ कारण आहे, आणि त्यास लगाइतिणीचा उपदेश कसा आवडला असेल बरें? कारण, हल्लींचे ब्राम्हण, लिंगाईत वेटाळ पाळीत नाहींत म्हणून त्यांचा वीट मानितात.
जो० तर यावरून तूंच विचार करून पाहा की, ब्रम्हाचें मुख, बाहू, जघा आणि पाय, या चार ठिकाणच्या योनी दूरशा झाल्यामुळे त्यास एकंदर सोळा दिवस सोंवळे होऊन बसावें लागलें असेल, असें जर म्हणावे तर त्यांचे घरांतील खटाटोप कोण करीत असे? याविषयीं तरी मनूचा कांही लेख आहे काय?
धौं०-नाहीं.
जो०-बरें, तो गर्भ ब्रम्ह्याच्या मुखात संभवल्या दिवसापासून नऊ महिन्यांचा होईतोपावेतों कोणत्या ठिकाणी राहून वाढला याविषयीं काही मनूनें म्हटलें आहे काय?
धौं०-नाहीं.
जो०- बरे, पुढे त्या जन्मलेल्या ब्राम्हण बालकास ब्रम्ह्याने आपल्या स्तनाचें दूध पाजिलें अथवा वर दूध लावून त्यास लहानाचे मोठे केलें. याजविषयीं तरी काहीं लेख आहे काय?
धों०-नाहीं.
धो०- नाहीं.
जो०- बरें, तो गर्भ ब्रम्ह्याच्या मुखात संभवल्या दिवसापासून नऊ महिन्यांचा होईतोपावेतों कोणत्या ठिकाणी राहून वाढला याविषयी काहीं मनूनें म्हटले आहे काय?
चो० नाहीं.
जो०- बरं, पुढे त्या जन्मलेल्या ब्राम्हण बालकास ब्रम्ह्याने आपल्या स्तनाचें दूध पाजिलें अथवा वर दूध लावून त्यास लहानाचे मोठे केलें,
याजविषयीं तरी काहीं लेख आहे काय?
घो० नाहीं..
जो० - सावित्री ही ब्रम्ह्याची पत्नी असतांहि त्यानें त्या मुलाचे ओझें मुखांत नऊ महिने वागवून त्यास जन्म देण्याचें व त्याचे पालन पोषण करण्याचे लचाड आपल्या माथ्यावर का घेतले? हे मोठे आश्चर्य होय...
धों० त्याची बाकींची तीन डोकी तर या लचांडापासून दूर होती की नाही? काय? त्या राड्या राघोबाला असा पोरींतला घरकुंडी खेळ आवडला?
जो०- आता त्यास रांड्याराघोबा म्हणावे तर त्यानें सरस्वती नांवाच्या कन्येशी व्यभिचार केला व त्यामुळे त्याचे आडनांव बेटीचोद पडले. याच
निद्य कर्मावरून त्याचा कोणी आदरसत्कार (म्हणजे पूजा) करीत नाहीत.
धों० ब्रम्हास जर खरोखर चार तोडें होती, तर त्याच प्रमाणानें त्यास आठ स्तन, चार बेव्या, चार मूत्रद्वारे आणि चार मलद्वारे असली पाहिजेत: पण त्याविषयी खात्री होण्याजोगा लेख कोठेच आढळत नाहीं. पुढे त्याप्रमाणेच शेषशाईस लक्ष्मी पत्नी असता, त्यानें आपल्या बेंबीपासून है चार तोंडाचें मूल कसे निर्मिले याविषयीं विचार करू लागल्यास शेषशाईचीसुद्धा ब्रम्हासारखी दशा होईल..
जो० वास्तविक विचाराअंती असे ठरतें की ब्राम्हण लोक हे समुद्राचे पलीकडेस जो इराण देश आहे त्या देशांतील मूळचे राहणारे होत. पूर्वी त्यास ईराणी किंवा आर्य लोक म्हणत असत, असे कित्येक इंग्लिश ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केलें आहे. प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून या देशांत येऊन अनेक स्वाऱ्या केल्या व येथील बहुतेक राजांच्या मुलुखांत वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला. पुढे वामनाचे मागून आर्य लोकांचा ब्रम्हा या नांवाचा मुख्य अधिकारी झाला. त्यांचा स्वभाव फार हट्टी होता. त्याने आपल्या कारकीर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजांत रणांगण जिंकून आपले दास केले व त्यानें आपले लोक आणि हे दास या उभयतांमध्ये हमेशा भेद रहावा म्हणून अनेक तऱ्हेचे नेम बांधिले. ह्या सर्व कृत्यांवरून ब्रम्हा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नांवाचा आपोआप लोप होऊन त्यांचे नांव ब्राम्हण पडलें, नंतर मागाहून मनूसारखे अधिकारी झाले. त्यांनी बांधिलेल्या नेमाचा धिक्कार मार्गे पुढे कोणी करू नये, या भयास्तव त्यांनी ब्रम्ह्याविषयीं अनेक तऱ्हेतऱ्हेच्या नवीन कल्पित गोष्टी रचिल्या व त्या गोष्टी ईश्वरेच्छेनेंच झाल्या आहेत असा त्या दासांच्या मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनी शेषशाईचे दुसरें आंधळे गारुड रचिलें, आणि संधि पाहून कांही काळाने त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले त्या ग्रंथांविषयीं शूद्र दासांस नारदासारिख्या पटाईत बायकांतील भाऊजीनें टाळ्या पिटून उपदेश केल्यामुळे ब्रम्ह्याचे महत्त्व सहजच वाढले, आता आपण ह्या ब्रम्ह्यासारखी शेषशाईविषय चौकशी करू लागलो तर त्यापासून आपल्यास काडीमात्र फायदा न होतां आपला उभयतांचा वेळ मात्र व्यर्थ जाणार आहे; कारण त्यांनी मुळींच त्या बिचाऱ्यास उतार्णे पाहून त्याच्या बेंबीपासून है चार तोंडाचें मूल निर्माण केले आणि अशा मुळींच चीत झालेल्या दिनावर खब ठोकणे यामध्ये मोठा पुरुषार्थ होईल असे मला वाटत नाहीं.