दुसरे बळीराजे, ब्राह्मणधमांची फजीती, शंकराचार्यांचे कृत्रिम नास्तिक मत, निर्दयपणा, प्राकृत ग्रंथकार, कर्म आणि ज्ञानमार्ग, बाजीराव, मुसलमानांचा द्वेष, आणि अमेरिकन व स्कॉच उपदेशकानी बाह्मणांचा कृत्रिमरूपी कोट फोडला, इत्यादिकाविषयी.. धो०-जाता मात्र शिकस्त झाली. कारण आपण शिवाजीच्या पवाड्याच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे साफ सिद्ध होतें कीं, चार घरच्या चार ब्राह्मण ग्रंथकार पोरी मिळून त्या घरातल्या घरकुंडात बराच त्या लटक्या मुटक्याचा खेळ खेळल्या.
जो०- परंतु पुढे जेव्हा तो एक दीनांचा कैवारी, महापवित्र, सत्यज्ञानी, सत्यवक्ता बळीराजा या जगात उत्पन्न झाला, तेव्हां त्याने जो आपण सर्वाचा उत्पन्नकर्ता व सर्वाचा महापिता त्याचे हेतु मनी धरून ज्याने आपण सर्वास दिलेल्या सत्यमय पवित्र ज्ञानाचा व अधिकाराचा सर्वास सारखा उपभोग घेता यावा, यास्तव त्याने एकंदर सर्व भटासारख्या कृत्रिमी, दुष्ट आणि मतलबी फासेपारध्याच्या दास्यत्वापासून आपल्या दीन व दुबळ्या आणि गाजलेल्या बांधवांस सोडवून देवाचें राज्य स्थापन करण्याची सुरवात करून त्यानें आपल्या वडील बायांचे काहीसे भविष्य पूर्ण केलेसे वाटतें अरे, जेथे मिस्टर टॉमस पेन्सासारिख्या मोठमोठ्या विद्वानाच्या पूर्वजानी या बळीराजाचे अंकीत होऊन आपल्या मागच्या सर्व इडापीडा दूर करून सुखी झाले. परंतु अखेरीस जेव्हा त्या बळीराजास चार दुष्ट लोकांनी सुळावर देवविले तेव्हा एकदर सर्व युरोपखंडात मोठी ढवळाढवळ होऊन कोट्यावधी लोक त्याचे मतानुयायी झाले व ते आपल्या उत्पन्नर्क्याच्या नेमाप्रमाणे या जगात त्याचेच निवळ राज्य स्थापावें म्हणून रात्रंदिवस झटू लागले. अशा संघानीत एकंदर सर्व या देशांत थोडीशी स्वस्थता झाल्याबरोबर येथील कित्येक बुद्धिमान बळींनी त्या घरकुड्यातील पोरीसोरीच्या लटक्यामुटक्या खेळाची बरीच दाणादाण केली म्हणजे सारव्यमुनिसारिख्या विचारी सत्पुरुषांनी ब्राह्मणांच्या वेदमंत्रजादूविधिप्रमाणे देव्हारा घुमवून गुराढोराचा वध करून ढवरे व पालेजत्राच्या निमित्ताने गोमांस खाणाऱ्या गर्विष्ट, दांभिक, मतलबी आनाचारी, इत्यादि दुर्गुणांनी भरलेल्या अशा ब्राह्मणांनी केलेल्या एकंदर सर्व चेटकांनी भरलेल्या ग्रंथांच्या मुखावर तेल कावळाचे माखाण करून बहुतेक ब्राम्हणांस शुद्धीवर आणून त्यांस आपले धर्मानुसारी केले. परंतु त्यातून कित्येक उरलेले कुतर्की ब्राह्मण करनाटकात पळून गेल्यानंतर त्या लोकामध्ये शंकराचार्य नामे करून एक तऱ्हेची तरकट विद्या जाणणारा महा पंडित उत्पन्न झाला, त्याने आपल्या ब्राम्हणजातीच्या दृष्ट कर्माची सर्व ठिकाणी फजिती व निंदा होऊ लागली, व बुद्धधर्माचा प्रसार होत चालला, हे पाहून त्यास सहन होईना त्यानें आपल्या लोकांचा उदारनिर्वाहाचा रोजगार ठीक चालेना ह्मणून ज्या दुष्ट कर्मावरुन आपल्या वेदासहित सर्व ग्रंथाचा बौध्य लोकांनी धिक्कार व पराभव केला होता त्यापैकी गोमांस खाणे व दारू पिणे मात्र बंद करून एकंदर आपल्या सर्व ग्रंथात फेरफार करून त्या सर्वांस मजबूती येण्याकरिता एक नवीन नास्तिक मत उपस्थित केले; त्यास हल्ली वेदात्त अथवा ज्ञानमार्ग म्हणतात. नंतर त्याने शिवलिंगाची स्थापना करून या देशांत जे तुर्क येऊन राहिले होते त्यांस हिंदु लोकातील क्षत्रिय लोकांत सरते करून घेऊन त्याच्या मदतीने, मुसलमान लोकाप्रमाणे तरवारीने, बुद्ध लोकांचा पराभव करून पुनः त्याने त्या आपल्या उरलेल्या जादूमंत्रविद्येचें आणि भागवतातील भाकड दंतकथेचे वजन अज्ञानी शूद्रांच्या मनावर बसविले. या शंकराचार्यांच्या धुमाळीत त्याच्या लोकांनी कित्येक बुद्ध धर्मी लोकास तेल्याच्या घाण्यात पिळून मारिले आणि त्यांचे बहुतेक उत्तम उत्तम ग्रंथ जाळून टाकिले. फक्त त्यांपैकी अमरकोश मात्र त्यांनी आपल्या उपयोगाकरिता ठेवून घेतला. पुढे जेव्हा त्या शंकराचार्यांचे दिवाभीत शिष्य आराध्यासारखे दिवसा मशाली पेटवून पालखीत बसून चहूकडे विठ्ठल सुवासिनीसारिखे सोवळेचाव करून नाचत फिरू लागले, तेव्हा मुकुंदराज, ज्ञानेश्वर वगैरे रामदासासारिखे अनेक 'पायलीचे पंधरा आणि आधोलीचे सोळा ब्राह्मण ग्रंथकार होऊन व्यर्थ वार्या गेले. परंतु त्यातून एकानेही आपण शूद्रांच्या गळ्यातील दास्यत्वाच्या पट्ट्याला बोटसुद्धा लावून दाखविले नाही. कारण त्यास त्यांच्या एकंदर सर्व उरलेल्या दुष्ट कर्माचा उघड रीतीने त्याग करण्याचे धैर्य होईना. सबब त्या सर्व दृष्ट कर्मास कर्ममार्ग आणि नास्तिक मतास ज्ञानमार्ग असे निरनिराळे दोन भेद करून त्याविषयी त्यांनी अनेक भारेचे भारे पोकळ प्राकृत ग्रंथ करून आपल्या मतलबी जातीस, अज्ञानी शूद्रांस लुटून खाऊं दिलें, परंतु पुढे जेव्हा नित्यशः रात्री जी नाहीं ती लाजीरवाणीं दृष्टकर्मे आचरून लागलीच दुसरे दिवशी फक्त आपल्या उत्पन्नकर्त्यास मात्र भजणाऱ्या मुसलमानाचे, सव्वा प्रहर दिवस येईपावेतो, तोंड न पहावे म्हणून सोवळे पाळणाऱ्या विटाळा रावबाजीच्या मजलशीच्या अखेरीस आदिभैरव रागाच्या आरंभी एकदर सर्व बाह्मणाच्या तुणतुण्याची तार तुटून, इंग्रज बाहदराचा बाहुटा चहूकडे फडकू लागला, तेव्हा बहुतेक त्या बळीराजाचे मतानुयायी अमेरिकन व स्काच उपदेशकांनी त्या त्या सरकारची काडीमात्र परवा न करिता या देशात येऊन त्याने एकंदर जो सत्य उपदेश केला होता, त्या सर्वांचा एकंदर सर्व कृत्रिम दुष्ट ब्राह्मणांस आधार दाखवून त्यांनी कित्येक शूद्रास ब्राम्हणाच्या कपटरूप दास्यापासून मुक्त करून शूद्रांच्या गळ्यातील दास्यत्वाचा पट्टा तोडून ब्राह्मणांच्या ग्रंथाच्या तोंडावर फेंकून दिला, तेव्हा बहुतेक ब्राम्हण आपल्या मनात खोचून खास समजले की, आता मात्र हे उपदेशक आपला कृत्रिमी धनीपणा बाकीच्या शूद्रावर बिलकुल राहू देणार नाहीत. या भयास्तव बळीराजाचे मतानुयायी उपदेशकाची आणि अज्ञानी शूद्रांची निवळ गांठ पडून त्या उभयतांच्या पुरत्या ओळखी होण्याच्या पूर्वी बहुतेक भटब्राम्हणांनी बळीराजाचे मतानुयायी उपदेशकांसहित इंग्रज सरकारास मुळीच या देशांतून हाकून द्यावे म्हणून नाना तऱ्हेच्या कल्पना काढून कित्येकांनी आपल्या पिढिवाद ठकविद्येच्या हिमायतीने अज्ञानी शूद्रास उपदेश करून त्यांच्या मनात इंग्रज सरकारचा द्वेष भरविण्याचा झपाटा चालविलार आणि बाकी उरलेल्या भटातून कोणी कारकूनी, कोणी काही. कोणी काही असे नाना प्रकारचे धंदे पतकरून एकंदर सर्व खात्यांत भट पडले नाहीत असे एकसुद्धा सरकारी अथवा घरगुती खातें सांपडत नाही..
२. उमाजी रामोशी व नाना