29 June 2023
0 अनुयायी
ब्रह्मा उत्पत्ति सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक यांविषयी. धो०- युरोपखडातील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली. याजवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमांस हरताळ लाविला; कारण मनुसंहितेत लिहिलें आहे कीं, ब्रम्हदेवाने आपल्या मुखापासून ब्राम्हणांस उत्पन्न केलें आणि त्या ब्राम्हणांची फक्त सेवाचाकरी करण्याकरितां त्यानें आपल्या पायांपासून शूद्रांस उत्पन्न केलें, जो०- इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली. याजवरून त्यांनी ब्रम्ह्याच्या आज्ञेस हरताळ लाविला म्हणून तुझे म्हणणे आहे. तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नाना प्रकारचे लोक आहेत, त्यांस ब्रम्ह्याने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे ? ० याजविषयीं सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असें उत्तर देतात की. इंग्रज वगैरे लोक अधम, दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत त्या लोकांविषयी मुळीच लेख नाहीं.. जो० यावरून तुझ्या मतें ब्राम्हणांमध्ये अधम, दुराचारी मुळीच नाहीत की काय ? D