बळवंतराव हरी साकवळकर, प्र० एकदर सर्व मानव कन्यापुत्रांनी आपल्या माता-पित्यांच्या प्रेतांची गति कशी लावावी ?
जोतीराव गोविंदराव फुले उ० एकंदर सर्व मानव कन्यापुत्रांच्या मातेने अथवा पित्यानें आपल्या मरणाच्या अगोदर आपल्या प्रेताची कोणत्या प्रकारानें गति लावावी, म्हणून त्यानी स्वतःची आपली इच्छा जशी प्रदर्शित केली असेल, त्याप्रमाणे त्याच्या कन्यापुत्रासह एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषानीं त्याच्या प्रेताची गति लावावी. अथवा मानव मातापित्याने त्याच्या मरणाच्या अगोदर त्याच्या प्रेताविषयीं आपली इच्छा कोणास प्रदर्शित जर केली नाही, तर त्यांच्या कुटुंबात पूर्वीपासून चालत आलेल्या वहिवाटीप्रमाणे त्यांच्या प्रेताची गति लावावी
बळवंतराव. प्र० मानव प्राण्याच्या प्रेताची गति लावण्याचे प्रकार जे आहेत, त्याविषयीं फारच थोडक्यात प्रतिपादन जर कराल, तर बरे होईल.
जोतीराव उ०- भूमीतील कसरवाळव्या वगैरे कीटकांनी प्रेताचा भंडारा करून खाण्याकरिता चार खंडासह बेटातील बहुतेक लोक आदिपासून हा काळपावेतो आपल्यातील प्रेतास मातीआड करून त्यावर खुणेकरिता एखादा मोठा दगड ठेवितात अथवा समाधि बांधितात. जलातील मगरमासे वगैरे प्राणीमात्रांनी प्रेताचा भंडारा करून खाण्याकरिता काही लोक आपल्यातील प्रेत जास्ती रुचिकर व्हावे, म्हणून त्यांस थोडासा अग्नीचा डाग देऊन वाहत्या पाण्यात ढकलून देतात. भूमीवरील कोल्हे लोडगे वगैरे चतुष्पाद जनावरांनी प्रेताचा भंडारा करून खाण्याकरिता काही लोक आपल्यातील प्रेताचे हातपाय तोडून चव्हाट्याच्या चार रस्त्यावर फेकून देत असत, याविषयी ग्रंथात मात्र आधार आहे, असे कित्येक लोक म्हणतात; परंतु हल्ली तसा प्रकार माझ्या पाहाण्यात कधीहि आला नाही. तथापि काही निर्दय जातीचे लोक आपल्यातील प्रेतासह प्रेताच्या जिवंत असलेल्या भार्येस जाळून टाकितात आणि त्याविषयीं त्याच्या शास्त्रांत लेख दाखवितात. परंतु त्याचप्रमाणे त्यांच्यातील महापतिव्रतेच्या प्रेतासह प्रेताच्या जिवंत असलेल्या भ्रतारास जाळून टाकावें, ह्मणून त्यांच्या शास्त्रांत अजिबाद मुळींच लेख नाहीं, यावरून त्यांच्यातील शास्त्रकर्ते पहिल्या प्रतीचेच अधम होते, असे सिद्ध होते आकाशातील कावळे, गिधाडे वगैरे द्विपाद पक्ष्यांनी = प्रेताचा भंडारा करून खाण्याकरिता काही लोक आपल्यातील प्रेतास आडरानात एके बाजूला एकांत स्थळी नेऊन ठेवितात. काही लोक आपल्यातील प्रेतास अग्नीमध्ये ढोसढोसून त्याची राखरांगोळी करितात आणि भूमीतील जलातील, भुमिवरील आणि आकाशातील कीटक पशुपक्ष्यादि मात्रास धुरी देऊन त्या प्रेताच्या नावाने मूठमर भाताचे अथवा कणिकीचे पिंड दर्भरूपी गवताच्या कावळ्याला मात्र लटुमुटी अर्पण करितात आणि एकंदर सर्व वगैरे मुक्या जनावरांची समस्त काढितात.
बळवंतराव. प्र० का हो, मूळ मानव स्त्रीपुरुषांस काष्टापासून अग्नी कसा याविषयी त्यास मुळीच माहिती जर नव्हती, तर इराणी आर्य लोकांनी कावळेगिधाड तोंडाला पाने पुसून त्यांनी आपच्या प्रेताचे दहन कसे केले असेल! यातील मूळ काय असावे?
जोतीराव उ०- इराणी आर्य लोकानी या बलिस्थानात लागोपाठ सतत शेत स्वाऱ्या करून येथील मूळच्या क्षेत्रस्थ दस्यू लोकातील कित्येक महारथी वीराचा परशुराम आयनि सहार करिताच, त्यांच्या स्त्रियांच्या पोटी होणाऱ्या अर्भक करून बाकी सर्व मागार वगैरे लोकांस पिढीजादा जेव्हा अनिवार त्रास देऊ तेव्हा बलिस्थानातील क्षेत्रस्य दस्यू लोकास अतिशय संताप जेव्हां झाला, तेव्हा आर्याच्या प्रेतास कावळे गिधाडांच्या हाती लागू न देता त्यांच्या प्रेतास हटकून भिन्न करून, त्यांची पाहिजेल तशी द्वेषाने विटंबना करू लागले. यामुळे एकदर सर्व आर्य लोक आपल्यातील एकदर सर्व स्त्रीपुरुषांसह आपल्या कन्या-पुत्रांचे प्रेतास करू लागले असावेत, असा अदमास निघतो.
बळवंतराव. प्र० असो, परंतु एकदर सर्व स्त्री-पुरुषांनी आपल्यातील प्रेत लावण्याकरिता काय करावे?
जोतीराव उ०- प्रेताची गति लावण्याकरिता प्रथम त्याच्या कन्या-पुत्र स्त्री-पुरुषांनी त्यास नान घालून त्याच्या अंगास सुवासिक तेल लावावे. त्यास नेसवून त्याजकरिता तयार केलेलें तिरडें अथवा जनान्यात नेऊन निजवावे. सर्वांग आच्छादित करून त्यावर पुष्पांच्या माळा घातल्यानंतर त्याच्या पुत्रासह सर्व मित्रांनी पाळीपाळीने प्रेतास खांदे देऊन स्मशानभूमीच्या ठिकाणावर न्यावे. कोणत्याहि तऱ्हेची गति लावण्याच्या पूर्वी त्याच्या अंगावरची वस्त्रे काढू नयेत. स्मशानांतून आपआपल्या घरोघर जाण्याच्या पूर्वी एखाद्या सत्यपालक वृद्धाने विषयी प्रार्थना करावी, ती अशी की :-