गोविंदराव प्र० तूर्त हैं एकीकडे ठेवा, परंतु ताज्यातवान्या गायागुरे यांचे व बोकड यांचे बुक्यानें प्राण घेऊन त्यांचे मांस खाणारे अघोरी आर्यभट्ट ब्राह्मण व त्याचप्रमाणे रोगानें अथवा लंगडीलुलीं, आंधळीपांगळीं आपमृत्यूने मेलेल्या जनावरांचे मांस खाणारे लाचार मांगमहार या दोहोंपैकी आपण कोणास निर्दय व कूर म्हणाल?
जोतीराव उ० या दोहोंपैकी धूर्त आर्यभट ब्राह्मणांस पक्के निर्दय व क्रूर म्हटले पाहिजे, असे न्यायाचे ठरते..
गोविंदराव प्र० यावरून आपण कोणत्या न्यायानें लाचार मांगाह्यारांस निर्दय म्हणून क्रूर मानितां ? पाला काय आधार आहे?
जोतीराव उ०- अरे, येथे तू मध्येच कोठून न्याय आणिलास? अघोरी खादाड आर्यब्राह्मण ताज्यातवान्या गायाबोकडाचे प्राण घेऊन त्यांचे मास मोठ्या आवडीने बेधडक खातात; याला मूळ आधार धूर्त आर्यभट ऋषींनी ताडपत्रावर लिहून ठेवलेले वेद होत
गोविंदराव प्र० आर्य ऋषींनी ताडपत्रांवर लिहून ठेवलेले वेदांत आचार असला म्हणजे धूर्त आर्यभटांनी पाहिजेल में बेधडक करावें, त्यांला मनाची तर लाज नाहीच; पण त्यांना आपण सर्वाच्या निर्मिकांचेसुद्धा भय वाटत नाहीं, हे कसें?
जोतीराव उ० धूर्त आर्यभटांच्या मनाला आपण सर्वाच्या निर्मिकाविषयीं मुळींच भय वाटत नाहीं, कारण ते वेदाती बनून भृगु ब्राह्मणासारखी
कल्पित विष्णु देवबापास लाथ मारून आपणच स्वतः अहंब्रह्म अथवा भूदेव होऊन, आपणा सर्वाच्या निर्मिकास पालथा घालण्यास जर भीत
नाहीत, तर त्यांच्या ठायीं निर्मिकांचे भय कोठून असणार?
गोविंदराव. प्र० याशिवाय आर्यलोक गायागुरें बोकड (मुख्यत्वेंकरून काळ्या कपिला गाया) खाण्यामध्यें जरी पुण्य मानीत असत, तथापि त्यांनी पुढे बौध्यधर्माच्या धाकानें मांस खाणें जरी सोडून दिलें, तरी हल्लीं ते शुद्ध होण्याच्या निमित्ताने गोमांसाऐवजी गोमूत्र प्राशन करून आपल्यास पवित्र मानून घेतात, याला काय म्हणावें?
जोतीराव उ० पूर्वीचे आर्य पुण्यप्राप्तीसाठी यज्ञ व श्राद्धामध्ये गाया बोकडांचा वध करून त्याचे मांस खात होते. आणि नाईलाजास्तव
हल्लींचे आर्य गोमूत्र प्राशण करून शुद्ध मानून घेतात. यावरून तूंच विचार करून पहा की, एकंदर सर्व चूर्त आर्यभटांच्या आचरणांत
कोणत्याच तऱ्हेचा चिरकाळ घरबंद नसतो ते कोणत्या वेळी आपली पोटे जाळण्याकरिता काय करतील, याचा नेम नाहीं.
गोविदराव. प्र० आतांशी बरें सुचलें, काही " अठरा वर्णानां ब्राह्मणो गुरुः" असता त्यांनी मानवी शुद्रादि अतिशूद्रांची विष्टा खाणाऱ्या पशु गाईचें जरी मूत्र पिऊन शुद्ध मानून घेतात, तरी ते अत्युत्तम अतिशुद्र मानवांचा जेवताना स्पर्शसुद्धा होऊ देत नाहीत, याला काय आधार असावा बरे?
जोतीराव उ० शूद्रादी अतिशूद्रमानव केवळ अज्ञानी असल्यामुळे धूर्त आर्यभट ब्राह्मण चेष्टेखोर पशु माकडासह सरपटणाऱ्या विषारी सर्पाची
पूजा करण्यास लाजत नाहींत, तरी शूद्रादि अतिशूद्रांनी तुच्छ मानून अपक्त केलेल्या वैसवारांडांबरोबर ते निर्लज्यपणे खाणे, पिणें वगैरे सर्व
प्रकारचे व्यवहार करण्यामध्यें आनंद मानितात यावरून धूर्त आर्य भटांस अत्युत्तम अतिशूद्रास नीच मानण्याविषयीं आधार काय आहे?
म्हणून तू विचार करून पहा, ह्मणजे तुझ्या सहज ध्यानात येईल.
गोविंदराव प्र० या सर्व मागील इतिहासावरून आर्यभट ब्राह्मण आपल्या वेदांस ख्रिस्ती लोकांसारखे बाहेर काढीत नाहीत, तर ते मोठे धूर्त आहेत व त्यांनी तसे केल्याबरोबर वेदाचे सहज महत्व कमी होणार आहे, असे सिद्ध होते.
जोतीराव उ० धूर्त आर्यभटब्राह्मणांनी वेद लपवून ठेविल्याकारणामुळे वेदांची अज्ञानी शुद्रादि अतिशूद्रांत पोकळ पत्राज वाढली आहे खरी, परंतु यापुढे त्यांनी ख्रिस्ती लोकांच्या बायबलासारखें, आपल्या वेदास बाहेर काढून त्याचें प्राकृत करून जगजाहीर केल्याबरोबर, धूर्त आर्यभटोसह त्यांच्या वेदांची बाजारच्या कोल्हाटणीसुद्धा फटफजीती करण्यास कधीं भिणार नाहीत, अशी मी प्रतिज्ञा करून सांगतों.
गोविंदराव प्र० तर मग आयच्या वेदांत एकंदर सर्व जगास बोध घेण्यासारखे बिलकूल कांहीच नाहीं, असें तुम्हांला वाटते काय?
जोतीराव उ० असे कसे म्हणतोस? वेदामध्ये नीति वगेऱ्यांविषयीं में प्रतिपादन केलें आहे, ते सर्व आपल्या जातीच्या आप्पलपोटचा धूर्त आर्यभटांच्या हिताकरिता मात्र योजिले आहे. त्यामध्ये एकंदर सर्व पराजित केलेल्या शूद्रादि अतिशुद्र, भिल्ल, कोळी वगैरे लोकांस म्लेंछ या सर्वास, मान्य होऊन त्यापासून त्या सर्वाचें बिलकूल हित होण्यासारखें नाहीं.
गोविंदराव प्र० दुसरे, आपण पूर्वी असे म्हणालांत कीं, "मनुष्यांनी आपल्या शेजाऱ्याबरोबर कसें वर्तन करावे, याविषयीं प्रत्येक मनुष्यास आपल्या स्वतःच्या अनुभवावरून सहज सिद्ध करतां येतें, या सिद्धांताविषयीं एकदर सर्व आर्य लोकांसह त्यांच्या वेदकर्त्यास बिलकूल ज्ञान झाले नव्हते. याविषयीं आता उलगडा करून जर प्रतिपादन कराल, तर बरे होईल.
जोतीराव उ०- आपण सर्वाच्या निर्मिकानें एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतः स्वतंत्र प्राणी निर्माण केला आहे. आणि त्यास आपआपसांत सारखे हक्काचा उपभोग घेण्यास समर्थ केला आहे. आणि याच कारणास्तव प्रत्येक मनुष्य गावांतील व मुलखांतील अधिकारांच्या जागा चालविण्याचा अधिकारी आहे.
गोविंदराव प्र० यावरून एकदर सर्व मनुष्य सर्व कामी सारखे अधिकारी असता, आर्य धूर्त भट ब्राह्मण, शूद्रादि अतिशूद्रांस आपले दासानुदास करून त्यांचे धनी कोणत्या न्यायाने झाले?
जोतीराव उ० धूर्त आर्यभट ब्राह्मण शूद्रादि अतिशूद्रांचे अन्यायानें धनी झाले म्हणून आपण सर्वाच्या निर्मीकास संताप झाला आणि त्यानें मोंगल, पठाण, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्लिश या सर्व लोकांकडून धूर्त आर्य भटांचें ऐश्वर्य नष्ट करुन त्यांस त्यांचे धनी केलें.
गोविंदराव, प्र० आपल्या सर्वाच्या निर्मीकार्ने मुसलमान व ख्रिस्ती वगैरे लोकाकडून धूर्त आर्यभटांचे ऐश्वर्य नष्ट करून जरी त्यांचे मुसलमान व ख्रिस्ती धनी केले, तरी त्यापासून आपण शूद्रादि अतिशूद्राचे कोणत्या प्रकारचे फायदे झाले, याविषयीं मला उघड काही समजत नाहीं.
जोतीराव उ०- अरे बाबा, आपण सर्वाचा निर्मीक परम दयाळू व परम न्यायी आहे आणि त्याच्या न्यायाविषयीं तुला काहीं उघड समजत नाही, म्हणून मला मोठी हळहळ वाटते कारण क्षुल्लक अशा अति चिमुकल्या मुंगीच्या अवयवांचा तिच्या इंद्रिय वगैरे उद्योगाचा आह्मी कधींच विचार करीत नाहीं, तथापि तिजला कोणी निरर्थक त्रास देऊ शकत नाहीं व त्याचप्रमाणे या अत्युत्तम मानव प्राण्यांच्या अवयवांचा त्यांच्या दशेंद्रियांचा आणि त्यांच्या ज्ञानाच्या थोरवीविषयीं विचार करू गेल्यास आम्हांस थांग लागत नाहीं. आणि अशा मानवांपैकी शूद्रादि अतिशूद्रांचे पूर्वी तरवारीच्या आणि सांप्रत ठकबाजीच्या जोरानें धनी आर्य मानव बनले आहेत. यास्तव सर्वन्यायी आपल्या सर्वाच्या निर्मीका शूद्रादि अतिशूद्रांबद्दल धूर्त आर्यभटांस प्रायश्चित देऊन त्यांस शुद्धीवर आणण्याकरितां पूर्वी मुसलमानांस व हल्लीं ख्रिस्ती लोकांस आर्याचे धनी केले आहेत, हैं पक्के समज.
गोविंदराव प्र०-शूद्रादि अतिशूद्राबद्दल मुसलमान लोकानीं धूर्त आर्यभटास कोणत्या तन्हेचें प्रायश्चित दिल, याविषयीं फारच थोड्यांत येथे विवेचन कराल, तर बरे होईल ?
जोतीराव उ०- मुसलमान लोकांनी धूर्त आर्य भट्टांच्या कोरीव दगडाच्या मूर्तीचा विध्वंस करून त्यांनी जुलमानें दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशूद्रांचे कळपाचे कळप त्यांच्या तावडीतून सोडवून मुसलमान करून त्या सर्वास आपल्या मुसलमानी धर्मात सामील केलें इतकेंच नव्हे परंतु त्या सर्वाबरोबर रोटी व बेटी व्यवहार सुरू करून त्या सर्वास सर्व कामी बरोबरींचे हक्क दिले. आणि त्या सर्वास आपल्यासारखे सुखी करून त्यांच्या तोंडाकडे आर्यभटांस टकमका पहावयास लाविले.
गोविंदराव, प्र०-त्याचप्रमाणे ख्रिस्ती लोकांनी शूद्रादि अतिशूद्रांबद्दल धूर्त आर्यभटास शुद्धीवर आणण्याकरिता कोणकोणती प्रायश्चिते दिली, याविषयी थोडेसे येथे विवेचन कराल, तर बरे होईल.
जोतीराव उ०- प्रथम कर्नल लिग्यांड जेकप, सर वुईल्यम जोन्स वगैरे इंग्लिश सत्पुरुषांनी धूर्त आर्यभट ब्राह्मणांच्या वेदासह स्मृत्या, संहितांचे आडे फोडून त्यातील शूद्रादि अतिशूद्र वगैरे लोकास निःक्षत्रीय करून त्यास कसकसे त्रास दिले, याविषयी साद्यंत इतिहासाचा तपास का जगप्रसिद्ध केल्यामुळे आपण सर्व शुद्रांचे आताशे डोळे उघडून एकदर सर्व धर्त आर्यभट ब्राह्मणाचे ब्रह्मकपट आपल्या दृष्टीपुढे स्वयंभू थयथया नाचू लागले आहे.
गोविंदराव प्र०-कर्नल लिग्याड जेकप, सर वुईल्यम जोन्स वगैरे सत्पुरुषानी धूर्त आर्यभटांचे ब्रह्मकपट जेव्हा बाहेर पाहिले, तेव्हा आमच्या
इंग्रज सरकारने आम्हा अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांच्या मुक्ततेविषयी काहीच प्रयत्न केला नाही, याविषयी मोठा अचंबा वाटतो! जोतीराव उ०- धूर्त आर्यभट ब्राह्मणांच्या पूर्वजानी शूद्रादि अतिशूद्राविषयीं रचलेले ब्रह्मकपटाविषयी त्यांची खात्री होऊन त्यास पश्चाताप होऊन त्यांनी आपणच होऊन शूद्रादि अतिशूद्रास तुच्छ मानून त्यांस ठकविण्याचे अर्जाबाद वर्ज करावे म्हणून प्रथम इंग्रज सरकारने या सर्व
बलिस्थानात शूद्रादि अतिशूद्राच्या करपट्टीतून पैसे खर्च करून धूर्त आर्यभट ब्राह्मणांच्या मुलास खरें ज्ञान होण्याकरिता जागोजाग इंग्रजी
विद्यालय स्थापून त्यांस फुकट विद्यादान देण्याचे सुरू केलें.
गोविंदराव प्र० शुद्रादि अतिशूद्रांनी परिश्रम करून सरकारास वसूल दिलेल्या करपट्टीच्या पैशातून धूर्त आर्य भटबाह्मणांच्या मुलांकरिता प्रथम इंग्रजी विद्यालय स्थापून त्यामध्ये त्यास विद्वान केले खरे, परंतु त्यांच्या मुलांनी इंग्रजी शाळात शिकून, परिणामी काय केलें, याविषयीं थोडेसे विवेचन केल्याबरोबर सरकारासह शूद्रादि अतिशूद्रांचे डोळे उघडणार आहेत.
जोतीराव उ० अज्ञानी शूद्रादि अतिशुद्राच्या परिश्रमाच्या करपट्टीतून धूर्त आर्य भटब्राह्मणांची मुले जेव्हा शाळांनी विद्वान झाली. तेव्हा त्यांच्या पूर्वजांनी ब्राह्यात्कारी धर्मसंबंधी, परंतु आंतून शुद्ध राजकीय, रचलेल्या ब्रह्मगारुडावर केवळ झाकण घालण्याकरिता कपटाने सध्या आपला बचाव करण्यास्तव आपल्या डोळ्यावर कातडी ओढून मोठ्या घादलीने त्यांनी ब्रह्मसमाज व प्रार्थनासमाज उभारले आहेत व त्यांनी त्या समाजात एकदर सर्व ख्रिस्ती धर्माचे उष्टमाष्टं चोरून छपून गोळा केले आणि त्यानी आपल्या कल्पित ब्रह्माजीच्यापुढे डोळे झाकून बाकीच्या अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांच्या मनात पुनः एक तऱ्हेचा ब्रह्मघोळ करण्याची खटपट सुरू केली आहे...
गोविंदराव प्र०-या सदरच्या समाजाशिवाय धूर्त आर्यभट ब्राह्मणांच्या मुलांनी दुसऱ्या काही सभा उपस्थित केल्या आहेत काय?
जोतीराव उ०- धूर्त आर्यभट ब्राह्मणांच्या मुलांनी ज्या सभा उपस्थित केल्या आहेत, त्यापैकी मुख्य पुणे येथील सार्वजनीक सभा आणि न्यौशनल कांग्रेस अशा मुख्य दोन सभा उभारल्या आहेत, म्हणून माझ्या ऐकिवात आहे.
गोविंदराव प्र० या त्यांच्या सार्वजनिक सभेच्या शुद्ध आडनावावरून या सभेमध्ये कुळंबी, माळी, धनगर, कोळी, भिल्ल वगैरे शेतकरी लोक सभासद असतील, नाही बरें ?
जोतीराव उ०- तुझ्या हादल्याप्रमाणें कुळंबी वगैरे शेतकरी लोकाचा या सभेत सभासद असण्याचा संभव नाहीं, असे मला वाटते.
गोविंदराव. प्र०-तर मग वाण्याउदम्याचा व्यापार करणारे गुजर, मारवाडी वगैरे दुकानदार व वस्त्रप्रावरणे विकण्याचा उद्योग करणारे साळी,
कोष्टी, खत्री, वगैरे लोक या सभेत सभासद असावेत, नाही बरे? जोतीराव उ०- गुजर, मारवाडी वगैरे दुकानदार व वस्त्रप्रावरणे विकण्याचा उद्योग करणारे साळी, कोष्टी लोकाचे या सभेत मुळीच नावसुद्धा
नाहीं, असें माझ्या ऐकिवात आहे.
गोविंदराव प्र०-बरें असो, लोहार, सुतार, चाभार, कुंभार, न्हावी, परीट वगैरे मिळून बारा बलुते व मांग, भट, जोशी वगैरे मिळून बारा आलुते तरी या सभेत सभासद आहेत काय?
जोतीराव उ० या सभेत या सभेत बारा बलुते सभासद आहेत म्हणून त्याचे नावसुद्धा येथे तू घेऊ नकोस: परतु बारा आलुत्यापैकी ब्राह्मण जोशी, उपाधी, आलुत्यांचा मात्र या सभेत भरणा आहे. त्यामध्ये जे सरकारी कामगार आहेत, ते जरी उघडपणे या सभेचे सभासद नाहीत, तरी त्यांच्या मुलाजाकरिता इतर जातीचे पांचपंचवीस सभासद सामील करून घेतले आहेत. त्यापैकी एकदोन मात्र श्रीमंत असून बाकी कोणी वकिली, कोणी कारकुनी करून पोटे जाळणारे आहेत.
गोविंदराव प्र० काहों, या बळिस्थानांत अदमासे एकंदर सर्व वीस कोटी खानेसुमारी आहे आणि त्यात दोन कोटी आर्य ब्राह्मण आहेत
त्यांपैकी पुण्यातील आर्य ब्राह्मणांनी पाचपंचवीस इतर जातीचे लोक सामील करून पुण्यात जर सभा केली; तर त्या सभेस सार्वजनिक सभा
कोणी ह्मणावी ?
जोतीराव उ०- सर्वाशी तुझे म्हणणे खरे आहे. कारण ह्याराच्या पडझड बाबीसंबंधी विचार करण्यासाठी या सार्वजनिक समेत ब्रह्मवृद सभासद द्वार सभासदास आपल्याबरोबर घेऊन कधी बसले होते? अथवा त्या पडझडीच्या संबंधाने त्या सर्वांनी कधी सरकारास अर्ज केला होता, ह्मणून माझ्या तर ऐकिवात नाही.
गोविंदराव प्र० तथापि या सभेच्या रेकार्डीत असणाऱ्या अर्जापैकी एक तरी अर्ज कोणी असा दाखवावा की, ज्यांत एकाच वर्गाचा किंवा
व्यक्तीचा संबंध आहे, असे एक सार्वजनिक पोरीच्या घरकुंडरूपी समेत बसून बढाई करणारा ह्मणत आहे.
जोतीराव उ०- त्याचे म्हणणे ठीक आहे. कारण त्यास असे वाटते की, मजवाचून या जगात दुसरा कोणी शहाणा नाही! परंतु तू अशी कल्पना कर की, हल्ली सरकारानें अशी जाहिरात दिली आहे की, ज्या कोणास संस्कृत, मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान झाले असून त्यास त्या सर्व भाषांमध्ये पत्रव्यवहार ठेविता येईल, अशा ह्यारास अथवा मागास दीड हजार रुपये दरमाहा मिळतील यावरून ही सदरची जागा चालविण्यास किती हार अथवा मांग निवडतील ?