सहृदय समनस्य अविद्वेष कृणोमिवः अन्योन्य अभिहर्यत वत्सजात हवाध्या ।
अनुव्रतः पितुः पुत्री मात्रा भवतु सम्मनः जायापत्ये मधुमतिं वाच वदतु शांतिवान् ।
मा भ्राता भ्रातारं द्विषद् मास्वसार उतस्वसा संभ्यचः सव्रतः भूत्वा वाचे वदत भद्रया ।
अर्थ एक मनाने व एक अंतःकरणाने तुम्ही राहावे, कोणी कोणाचा द्वेष करू नये. नुकतेच जन्मलेले आपले वत्स पाहून ज्याप्रमाणे गाईस आनंद होतो, त्याप्रमाणे तुम्ही परस्परावर प्रेम करा पुत्राने पित्याची आज्ञा पालन करावी. मातेशी एक मनाने वागावे. पत्नीने पतीशी ऐक्याने राहून
त्याजशी सर्वदा मधुर भाषण बोलावे. बंधुभगिनीमध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेपभाव नसावा. अशाप्रकारे गोड बोलून ऐक्य रक्षण करावे. जोतीराव. प्र० त्यांनी या वेळेस पुढे आणलेला तशा प्रकारचा अथर्व वेदात जर श्लोक होता, तर निर्दय आर्याच्या कारकीर्दीत शूद्रादि
अतिशूद्रांसह म्लेंच्छ वगैरे लोकांस निराळे भिन्न जातीचे समजून तुच्छ मानून त्यांचा छळ करण्याची वहिवाट आपले आपण पडली असावी
काय? यशवत 30 पूर्वीपासून आजतागायत धूर्त आर्य भट्टानी आपल्या अपवित्र सोवळ्यात वेदास छपवून ठेविले होते ह्मणून असा अनर्थ घडून आला.
जोतीराव 30 पूर्वी धूर्त आर्य भट्ट ब्राह्मणांच्या कारकिर्दीत दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशूद्रास त्यांच्या वेदातील एक शब्दसुद्धा ऐकू देत नसत आणि या निःपक्षपाति इंग्रज बहाद्दरांच्या राज्यांत वेदांतील वाक्यें बापुड्या लोटन खबुत्रासारखी तुच्छ मानलेल्या शूद्रादि अतिद्रांचे चरणाजवळ गडबडा लोळावयास धूर्त आर्यांनी लावली आहेत, आता त्यांची वेदरुपी काळी चिधी आह्मा शूद्रादि अतिशूद्रामध्ये नको.
यशवंत उ०-तें कसें का होईना, परंतु आपल्या धर्मशील जाहॅमर्द मुसलमानांनी शूद्रादि अतिशुद्रांस धूर्त आर्य भट्टाच्या कृत्रिमी दासत्वांतून का मुक्त केले नाही?
जोतीराव 30- धूर्त आर्य भट्टांनी आपल्या सोवळ्यात लपवून ठेवलेल्या त्यांच्या वेदाचा तपास काढून त्यांतील एकंदर सर्व खोटसाळपणा तपासून शूद्रादि अतिशूद्रांस मुसलमान करून त्या सर्वास आपल्यासारखा पवित्र मानवी अधिकाराचा उपभोग घेण्यास लावले नाही ह्मणून
असा अनर्थ घडून आला, ही सर्व बेफाम मुसलमानांची चूक आहे ह्मणून भी कबूल करितो.
यशवंत प्र० धूर्त आर्य भट्ट केवळ मूठभर असतो त्यांचे वेद तपासून पाहाण्यास तुमचे जाहामर्द मुसलमान लोक आर्य धर्मातील अति कोपीष्ट ऋषी मंडळाचे शापास भ्याले असावे.
जोतीराव 3०-मुसलमान लोक जर त्यांच्या धूर्त आर्य ऋषीच्या शापास भिणारे असते, तर त्यांनी त्यांच्या सोरटी सोमनाथाच्या मूर्तीचे तुकडे तुकडे केले नसते. परंतु ते थोडेसे ऐश्वर्याच्या मदांत बेफाम झाले असता अति पटाईत मुकुंदराज, ज्ञानोबा, रामदास वगैरे ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधून कल्पित भागवतातील कावेबाज अष्टपैलू काळ्या कृष्णानें कुतर्कभरीत गीतेत पार्थास उपदेश केलेला मात्र उचलून त्यांनी प्राकृत भाषेत विवेकसिंधु, ज्ञानेश्वरी, दासबोद वगैरे अनेक प्रकारचे थोतांडी ग्रंथ रचून त्या सर्वाचे कपटजालीत अक्षरशुन्य शिवाजीसारख्या महावीरास फसवून त्यास मुसलमान लोकाचे पाठलाग करावयास लाविले. यामुळे मुसलमान लोकास एकंदर सर्व महाधूर्त आर्याचे कूट बाहेर पाडण्यास फुरसतच झाली नाही. असे जर नाही म्हणावे, तर मुसलमान लोक या देशांत येण्याच्या संधीस धूर्त आर्य मुकुंदराजास शूद्रादि अतिशूद्रांची दया येऊन त्याने त्याजकरिता प्राकृत विवेकसिंधु त्याचवेळी का केला? यातील कावेबाजी अशी आहे की, अज्ञानी शुद्रादि अतिशूद्रांनी मुसलमान होऊन धूर्त आर्य भट्टाच्या मतलबी धर्माची फटफजीती करू नये. साराश-मुसलमान लोकांस ह्या महाधूर्त आर्य ब्राह्मणाचे कूट बाहेर पाडण्यास जर फुरसत झाली असती, तर त्यांनी त्यांच्या वेदासह एकंदर सर्व पुस्तकाच्या पिंजान्यासारख्या फुसड्या फुसड्या करून उघडून त्यांची धुळधाणी केली असती.
यशवंत प्र०- मुसलमानासारखे धूर्त आर्य भट्ट ब्राह्मण त्यांचे पवित्र वेद बाहेर काढून एकंदर सर्व मानवी प्राण्यांस वाचून पाहण्याची मनाई का करितात? त्यातील इंगीत काय आहे हे आम्हास कळवाल, तर बरे होईल.
जोतीराव 30 धूर्त आर्य भट्ट ब्राह्मणांनी आजपावेतो मोठी कावेबाजी करून त्यांनी आपले खल्लड जुनाट वेद बाहेर काढले नाहीत, म्हणून त्यास शूद्रादि अतिशूद्राबरोबर मोठ्या शेखीने पोकळ पत्राज करिता येती धूर्त आर्यानी जर वेदाची भाषांतरे करून सर्व लोकात प्रसिद्ध केली
असती, तर एकंदर सर्व शूद्रादि अतिशूद्रांसह म्लेच्छ वगैरे लोकानी घूर्त ब्राह्मणाची हुहुऱ्या करून त्यांस मांगामहारांची कामे हौसेने करावयास लावली असती. कारण धूर्त आर्य ब्राह्मणांनी त्या बलिस्थानात जेव्हा जेव्हा स्वाऱ्या केल्या, तेव्हा तेव्हा आर्यानी येथील मूळच्या क्षत्रियास कसकसे स्थातळी घालून त्या सर्वांस कसकसा त्रास दिला, याविषयी त्यांच्या वेदांत कोठे कोठे मागमूस लागतो व यावरून एकंदर सर्व शूद्रादि अतिशूद्रास आर्याचे कपट समजल्याबरोबर ते त्यांच्याबरोबर चोरून छपून रोटीव्यवहार न करिता त्यांची सावलीसुद्धा आपल्या अंगावर पडू देणार नाहीत असे मी खात्रीने भविष्य करितों, पाण्यात वेदरूपी हौस आणि तिचे मोल धूर्त आर्यभट्ट कसें करितात, ही कोणत्या गांवची नीति ह्मणावी?
यशवंत प्र०- सारांश यावरून तुमच्या मते नीति तरी कशास ह्मणावी?
जोतीराव 30- आपल्या सर्वाच्या निर्मीकास संतोष देण्यासाठी सार्वजनीक सत्याचे भय मनी धरून जो कोणी इतर मानव बांधवांबरोबर आचरण करील, त्यास नीति ह्मणावी; मग तो ख्रिस्ती असो, महमदी असो, सत्यशोधक समाजीयन असो अथवा एखादा गावंडेकरी अज्ञानी असो.