सत्य
गणपतराव दर्याजी थोरात प्र० सत्यवर्तन करणारे कोणास म्हणावे?
जोतीराव गोविंदराव फुले. उ०- सत्यवर्तन करणाऱ्याविषयी नियम देतो, ते येणेप्रमाणे-
१. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकदर सर्व प्राणीमात्रास उत्पन्न केले. त्यांपैकी स्त्रीपुरुष हे उभयतः जन्मताच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र केले आहेत, असे कबूल करणारे, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत. २. स्त्री असो अथवा पुरुष असो, ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने या विस्तीर्ण पोकळीतील निर्माण केलेल्या अनंत सूर्यमंडळासह त्यांचे
ग्रहोपग्रहास अथवा एखाद्या विचित्र ताऱ्यास अथवा एखाद्या धातू दगडाच्या मूर्तीस निर्मिकाच्या ऐवजी मान देत नसल्यास, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत. ३. आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याने निर्माण केलेल्या एकंदर सर्व वस्तूंचा यच्चावत् प्राणीमात्रास उपभोग घेऊ न देता, निरर्थक निर्मीकास
अर्पण करून त्याचे पोकळ नामस्मरण जे करीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
२४. आपण सर्वांच्या निर्माणकर्त्यानि निर्माण केलेल्या एकंदर सर्व प्राणीमात्रांस समस्त वस्तूंचा यथेच्छ उपभोग घेऊन त्यास निर्मीकाचा आभार
मानून त्याचे गौरव करू देतात, त्यास सत्यवर्तन करणारे हाणावेत.
५. विश्वकल्यनि निर्माण केलेल्या प्राणीमात्रास जे कोणी कोणत्याहि प्रकारचा निरर्थक त्रास देत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
६. आपल्या सर्वाच्या निर्मीका एकदर सर्व स्त्रीपुरुषास, एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहेत. त्यातून एखादा मानव
अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करू शकत नाही व त्याप्रमाणे जबरी न करणारास त्यांस सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
७. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषास धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे, ज्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याहि तऱ्हेचे नुकसान करिता येत नाहीं, अथवा जे कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवाचे हक्क समजून इतरांस पीडा देत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
४. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रास निर्माण केलें आहे? त्यापैकी हरएक स्त्रीने एका पुरुषास मात्र आपला भ्रतार
करण्याकरिता वजा करून व तसेच हरएक पुरुषाने एका स्त्रीस मात्र आपली भार्या करण्याकरिता वजा करून, एकंदर जे सर्व स्त्रीपुरुष
एकमेकाबरोबर मोठ्या आवडीने बहीण भावंडाप्रमाणे आचरण करतात, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
९. आपल्या सर्वांच्या निर्माणकत्यनि एकंदर सर्व स्त्रियांस अथवा पुरुषास एकंदर सर्व मानवी हक्काविषयी आपले पाहिजेल तसे विचार,
आपली पाहिजेल तशी मते बोलून दाखविण्यास, लिहिण्यास आणि प्रसिद्ध करण्यास स्वतंत्रता दिली आहे; परंतु ज्या विचारापासून व
मर्तापासून कोणत्याहि व्यक्तीचे कोणत्याच तऱ्हेचे नुकसान मात्र होऊ नये ह्मणून जे खबरदारी ठेवितात, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
१०. आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याच्या व्यवस्थेवरून एकंदर जे सर्व स्त्रीपुरुष दुसऱ्याच्या धर्मसंबंधी मतावरून अथवा राजकीयसंबंधीं
मतांवरून त्यांस कोणत्याहि प्रकारे नीच मानून त्यांचा छळ करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे ह्मणावेत,
११. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्यांनि एकदर सर्व मानव स्त्रीपुरुषास एकदर धर्म-संबंधी गावकी अथवा मुलकी अधिकाराच्या जागा त्यांच्या योग्यतेनुरूप व सामर्थ्यानुरूप मिळाव्यात, ह्मणून त्यांस समर्थ केले आहेत, असे कबूल करणारे, त्यांत सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
१२. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याच्या नियमास अनुसरून एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुष धर्म, गावकी मुलकी यासंबंधीची प्रत्येक मानवाची स्वतंत्रता, मालमत्ता, संरक्षण आणि त्याचा जुलमापासून बचाव करण्याविषयी जे कोणी बाध आणीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
१३. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या मातापित्याचा वृद्धापकाळी परामृष करून इतर मानववृद्ध शिष्टास सन्मान देतात अथवा मातापित्याचा परामृष करून इतर मानववृद्ध शिष्टांस सन्मान देणारास बहुमान देतात, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
१४. स्त्री अथवा पुरुष, जे वैद्यांच्या आज्ञेवाचून अफू, भांग, मद्य वगैरे अमली दार्थाचे सेवन करून नाना तऱ्हेचे अन्याय करण्यास प्रवृत्त होत नाहीत, अथवा ते सेवन करणारास आश्रय देत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
१५. स्त्री अथवा पुरुष, जे पिसू, बेकूण, ऊ वगैरे किटक, विंचू, सरपटणारे सर्प, सिंह, वाघ, लांडगे वगैरे आणि त्याचप्रमाणे लोभी मानव दुसऱ्या मानव प्राण्यांचा वध करणारे किंवा आत्महत्या करणारे खेरीजकरून, जे स्त्री अथवा पुरुष, दुसऱ्या मानव प्राण्यांची हत्या करीत नाहीत अथवा हत्या करणारास मदत देत नाहीत, त्यांत सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
१६. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या हितासाठी दुसऱ्याचे नुकसान करण्याकरिता लबाड बोलत नाहींत अथवा लबाड बोलणारास मदत करीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणार म्हणावेत.
१७. स्त्री अथवा पुरुष, जे व्यभिचार करीत नाहीत अथवा व्यभिचाऱ्यांचा सन्मान ठेवीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
१८. स्त्री अथवा पुरुष, जे हरएक प्रकारची चोरी करीत नाहींत अथवा चोरास मदत करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत,
११. स्त्री अथवा पुरुष, जे द्वेषाने दुसऱ्याच्या घरास व त्यांच्या पदार्थास आग लावीत नाहीत अथवा आग लावणाऱ्याचा सेह करीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
२०. स्त्री अथवा पुरुष, जे स्वतःच्या हितासाठी न्यायाने राज्य करणाऱ्या संस्थानीकावर अथवा राज्यावर अथवा एकदर सर्व प्रजेनें मुख्य केलेल्या प्रतिनिधीवर बंड करून लक्षावधी लोकांची कुटुंबे उघडी पाडीत नाहीत अथवा बंड करणारांस मदत घेत नाहीत अथवा वड करणारास मदत देत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२१. स्त्री अथवा पुरुष, जे एकदर सर्व जगाच्या हितासाठी धर्मपुस्तक तयार केले आहे, म्हणून मोठ्या बढाईने वाचाळपणा करितात; परंतु ते
धर्मपुस्तक आपल्या बगलेत मारून इतर मानवास दाखवीत नाहीत, अशा कपटी बढाईखोरावर जे विश्वास ठेवीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत. २२. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या कुटुंबासह आपल्या भाऊबंदास, आपल्या सोयऱ्या धायऱ्यास आणि आपल्या इष्टमित्र साध्यास मोठ्या
तोऱ्याने पिढीजादा श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यात पिढीजादा कपटाने अपवित्र माजून त्यांस नीच मानीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे हाणावेत.
२३. स्त्री अथवा पुरुष, जे पूर्वी कपटाने लिहिलेल्या ग्रंथाच्या वहिवाटीवरून काही मानवास पिढीजादा दास मानीत नाहीत अथवा दास
मानणाऱ्यांचा बोज ठेवीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत...
२४. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या लोकाचे वर्चस्व मुद्दाम राहण्याकरिता शाळेमध्ये शिकवितांना इतर लोकांच्या मुलांबरोबर दुजाभाव करीत नाहीत अथवा शाळेत शिकवितांना दुजाभाव करण्याचा धि:कार करितात, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
२५. स्त्री अथवा पुरुष, जे न्यायाधिशाचा हुद्दा चालविताना अन्यायी लोकाचा, त्यांच्या अन्यायाप्रमाणे त्यास योग्य शिक्षा देण्यास कधीहि
पक्षपात करीत नाहीत अथवा अन्यायाने पक्षपात करणाऱ्याचा धि:कार करितात, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे
२६. स्त्री अथवा पुरुष, जे शेतकी अथवा कलाकौशल्य करून पोट भरणारास श्रेष्ठ मानितात; परंतु वगैऱ्यास मदत करणारांचा आदरसत्कार करितात, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत. २७. स्त्री अथवा पुरुष, जे चाभाराच्या घरी का होईना, बिगाऱ्याचा धंदा करून आपला निर्वाह करणाऱ्यास तुच्छ मानीत नाहीत; परंतु त्या
कामी मदत करणारांची वहावा करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
२८. स्त्री अथवा पुरुष, जे स्वतः काही उद्योगधंदा न करता निरर्थक धार्मिकपणाचा डौल घेऊन अज्ञानी जनास नवग्रहांची पिडा दाखऊन त्यांस भोदाडून खात नाहीत अथवा तत्संबंधी पुस्तकें करून आपली पोट जाळीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
२९. स्त्री अथवा पुरुष, जे भावीक मूढास फसवून खाण्याकरिता ब्रह्मर्षीचे सोंग घेऊन त्यास आगाराघुपारा देत नाहीत, अथवा तत्संबंधी मदत
करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत,
३०. स्त्री अथवा पुरुष, जे कल्पित देवाची शांती करण्याचे निमित्तानें अनुष्ठानी बनून अज्ञानी जनास भोंदाडून खाण्याकरिता जपजाप करून आपली पोटे जाळीत नाहीत अथवा तत्संबंधी मदत करणारांचा बोज ठेवीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे हाणावेत. ३१. स्त्री अथवा पुरुष, जे आपली पोटे जाळण्याकरिता अज्ञानी जनात कलह उपस्थित करीत नाहीत अथवा तत्संबंधी मदत करणारांच्या
सावलीसदेखील उभे राहत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
३२. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या सर्वांच्या निर्मिकानें निर्माण केलेल्या प्राणिमात्रांपैकी मानव स्त्रीपुरुषामध्ये कोणत्याच तऱ्हेची आवडनिवड न करता त्याचे खाणेपिणे व लेणेंनेसर्गे याविषयी कोणत्याच प्रकारचा विधीनिषेध न करिता त्यांच्याबरोबर शुद्ध अंतःकरणाने आचरण करितात, त्यास सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
३३. स्त्री अथवा पुरुष, जे एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांपैकी कोणाची आवडनिवड न करिता त्यांतील महारोग्यास, पंगूस व पोरक्या मुलांस आपल्या शक्त्यनुसार मदत करतात अथवा त्याला मदत करणाऱ्यास सन्मान देतात, त्यांत सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.
गणपतराव प्र० या आपल्या सदरील नियमावरून असे सिद्ध होते की, एकदर सर्व मानवानी सत्य आचरण कसे करावे, याविषयी आपल्या दयामूर्ती निर्मिकाने स्वतः एखादे पुस्तक केले नसावें, असेंच तुम्हाला वाटते काय?
जोतीराव उ०- भले शाबास! कारण आपण सर्वांच्या निर्मिकाने या अगम्य पोकळीतील अनत सूर्य मंडळासह त्याच्या ग्रहोउपग्रहावरील अनत प्राणीमात्रांस त्याने धडा घालून दिल्याप्रमाणे, ते आपल्या सुवर्तनाने कसे वर्तन करीत आहेत, त्याविषयीं संतोष मानण्याचे एके बाजूला ठेऊन या आपल्या पृथ्वीवरील मानव स्त्रीपुरुषानी सत्य आचारण करावे म्हणून त्याने स्वतः एखादे धर्मपुस्तक जर केले असते, तर त्याने येथील स्त्रीपुरुषाची आवडनिवड न करिता या उभयतांच्या मानवी अधिकाराविषयी निःपक्षपाताने लिहिले असते व त्याचप्रमाणे त्याने ते धर्मपुस्तक एकंदर सर्व जगातील निरनिराळ्या भाषांत समजण्याजोगते केले असते.
गणपतराव. प्र० तर मग ही निरनिराळी धर्मपुस्तकें या जगात कोणी केली? ज्यामध्ये पुरुषाच्या मानवी हक्काविषयीं मात्र अघळपघळ लिहिले आहे.
जोतीराव उ० परंतु ही सर्व निरनिराळी धर्मपुस्तकें अनेक कनवाळू परोपकारी सत्पुरुषानी केली आहेत. व त्यामध्ये त्यांच्या समजुतीप्रमाणे पुरुषांच्या हक्काविषयी काहीना काही तरी प्रतिपादन केले आहे.
गणपतराव प्र०-बरे सुचले! तथापि पहिले, आर्याच्या धर्मामध्ये आपण सर्वांच्या निर्मिकाची उचलबांगडी करून एकंदर सर्व आर्य आपणास अज्ञानी जनांचे भूदेव म्हणवितात. दुसरे, ख्रिस्ती धर्मामध्ये येशूस सर्वांच्या निर्मिकाचा पुत्र म्हणतात. आणि तिसरे, महमदी धर्मामध्ये महमदास आपणा सर्वांच्या निर्मिकाचा पैगवर म्हणतात; या सर्वाविषयी उलगडा करून सांगाल तर बरे होईल.
जोतीराव उ०- कारण पहिले असे की, आर्यानी कुतर्कभरित तत्वज्ञानाच्या लंडाईने वेदांती बनून आपण सर्वांच्या निर्मिकास निकामी करून
त्याची उचलबांगडी केली. आणि ते आपणच स्वतः अब्रह्म होऊन पराजित केलेल्या अज्ञानी लोकांचे भूदेव बनले आहेत. यावरून अर्थात एकंदर सर्व जगातील सुज्ञ पुरुष त्यांस कुचके धर्मलंड नास्तिक म्हणू लागले व दुसरे असे की आपण सर्वाच्या निर्मिकाविषयीं जो काही येशूनें उपदेश केला, त्यामध्ये त्याने आपल्या सर्वांच्या निर्मिकास बापासमान मानून अज्ञानी मानव बंधूजनाचे तारण होण्यासाठी त्यास मोठ्या आशेने बोध केला, यावरुन अर्थात् हल्लीचे एकदर सर्व ख्रिस्ती लोक त्याला देवाच्या पुत्रासारिखा मानून त्यास तारणारा म्हणतात. आणि तिसरे असे की, महमदाने निर्मिकाच्या अधिकाऱ्याविषयी बरेच पवित्र कुराण लिहून ठेविले आहे; त्यात त्याने जो कोही उपदेश केला आहे. त्या सर्वामध्ये एकंदर सर्व मानव बंधुजनास सुमार्गावर आणण्याकरिता आपण सर्वाच्या निर्मिकाने महमदाला येथे पाठविले आहे. म्हणून तो मोठ्या आवेशाने उघड सर्वांस कळवीत असे. यावरून अर्थात् हल्लींचे एकदर सर्व सुन्नी अथवा सिय्या महमदी लोक त्याला पैगंबर अथवा आपण सर्वांच्या निर्मिकाने पाठविलेला, म्हणतात.
गणपतराव. प्र० काही तात्यासाहेब, ही सर्व धर्मपुस्तकें अनेक सत्पुरुषांनी जर केली आहेत, तर त्यापैकी एखादे धर्मपुस्तक सत्स्त्रीने केलें आहे काय?
जोतीराव उ०- एखाद्या सत्स्त्रीने आजपावेतों जर धर्मपुस्तक केलें असतें, तर मानव पुरुषांनी एकंदर सर्व स्त्रियांच्या हक्काविषयीं हयगय करून त्यांनी आपल्या पुरुषजातीच्या हक्काविषयी मात्र वाचाळपणा केला नसता. कारण स्त्रिया जर ग्रंथ लिहिण्याजोगत्या विद्वान् असत्या. तर पुरुषानी असा उघड गोमा करून पक्षपात केला नसता.
गणपतराव प्र० असो, या महा सत्पुरुषांच्या निरनिराळ्या धर्मपुस्तकात त्यांच्या समजुतीप्रमाणे पुरुषांच्या हक्काविषयी काहीना काही जर
सत्य प्रतीपादन केले आहे, तर त्यांच्या अनुयायांमध्ये इतका भेदभाव पडला आहे, तो का ?
जोतीराव उ०- त्यांच्यामध्ये इतका भेदभाव पडण्याचे कारण, जे ते आपल्या धर्मावरून व दुसऱ्याच्या धर्माविषयी सारासार विचार न करता, माझाच धर्म खरा आहे. म्हणून बेलगामी हट्ट घेऊन बसतात. परंतु एकमेकानी एकमेकाच्या धर्माविषयीं सारासार विचार केल्याबरोबर कोणीच कोणाच्या धर्माला खोटे म्हणणार नाहीत, असे माझ्या विचाराने ठरते. गणपतराव प्र० तथापि दुसरे असे की, ते एकमेकाच्या धर्मपुस्तकातील सत्याविषयीं जरी सारासार विचार करून पाहतात, तरी ते
एकमेकांशी निरर्थक हाडवैर का करितात?
जोतीराव उ० परंतु ते परस्परांच्या धर्मस्थापक सत्पुरुषांसह त्या वेळच्या अज्ञानी लोकांतील सत्य आचरणाच्या अनुमानस्थितीविषयी
सारासार विचार करीत नाहीत, यामुळे तसे घडून येते.
गणपतराव प्र० या तुमच्या सिद्धांतावरुन हल्लीच्याप्रमाणे अति प्राचीन काळचे मानव समंजस नव्हते काय ?
जोतीराव उ० यात काय संपय! कारण, हल्लीप्रमाणे अति प्राचीन काळचे मानव जर समजस असते, तर त्यानी शूद्रादि अतिशूद्र मानवास धिःकारानें नीच मानण्याची वहिवाट पाडली नसती. त्याचप्रमाणे प्राचीन काळचे मानव पराजित केलेल्या मानवांच्या कन्या पुत्रास आपल्या कुणबिणी व दास करून त्यास आपली सेवाचाकरी करावयास लाविली नसती आणि अशा तन्हेचा अधिकार काही लोकास होता, म्हणून एखाद्या धर्मपुस्तकांत महासत्पुरुषांच्याने प्रसिद्धपणे लिहून ठेवविले नसते. यावरून ते हट्टी स्वभावाचे असून ते दुसऱ्यांचा सूड घेणारे मात्र होते, असे सिद्ध होते..
गणपतराव. प्र० अशा तऱ्हेचे धर्मपुस्तक एखाद्या जंगली रानवठ मानवाच्याने लिहून ठेवण्याची छाती झाली नसती. यास्तव धर्मपुस्तक तरी कसे असावे याविषयी थोडक्यात उल्लेख करून दाखवाल, तर बरे होईल?
जोतीराव उ०- स्त्री अथवा पुरुष, जे एकदर सर्व गावच्या प्रांताच्या देशाच्या व खंडाच्या संबंधाने अथवा कोणत्याहि धर्मातील मताच्या संबंधाने स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा सर्व पुरुषांनी एकमेकात एकमेकाची कोणत्याच प्रकारची आवडनिवड न करिता या सर्व स्त्रीपुरुषांनी, या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने, एकजुटीने एकमेकाशी सत्यवर्तन करून आपण सर्वांच्या निर्मिकास संतोष देऊन आपण त्याची आवडती लेकरे होतात; त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत; परंतु या सदरच्या नियमास अनुसरून एकंदर सर्व स्त्रीपुरुषांनी जर सत्य आचरण केले असते तर एकंदर सर्व जगातील देवबापा परशुरामादि शिपायांस पोलिसास, न्यायाधिशास व तुरंगावरील शिपायास अजिबाद फाटा द्यावा लागला असता.
गणपतराव. प्र० तर मग एकदर सर्व जगातील स्त्रीपुरुष मानवानी कोणत्या धर्माचा स्वीकार करावा, याविषयी आपण निकाल कराल, तर बरे होईल.
जोतीराव उ०- अहो बाबा, या भूमंडळावर महासत्पुरुषांनी जेवढी म्हणून धर्मपुस्तके केली आहेत, त्या सर्वात त्या वेळेस अनुसरून त्यांच्या समजुतीप्रमाणे काहींना काही सत्य आहे. यास्तव कोणत्याहि कुटुंबातील एका मानव स्त्रीने बौद्ध धर्मी पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे
पाहिजे असल्यास तिने तो धर्म स्वीकारावा व त्याच कुटुंबातील तिच्या पतीने जुना व नवा करार वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने ख्रिस्ती व्हावे व त्याच कुटुंबातील त्यांच्या कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिनें महमदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्याच्या पुत्राने सार्वजनीक सत्यधर्मपुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने सार्वजनीक सत्यधर्मी व्हावे, आणि या सर्व मातापित्यासह कन्यापुत्रांनी आपला प्रपंच करीत असता प्रत्येकाने कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये आणि त्या सर्वानी आपण सर्वांच्या निर्माणकर्त्याने निर्माण केलेली लेकरें असून त्याच्याच (निर्मिकाच्या कुटुंबातील आहोत, असे समजूत प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकांनी वर्तन करावें म्हणजे ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याच्या राज्यात धन्य होतील.
गणपतराव प्र० पुरे आती; कारण त्या सर्व धर्मपुस्तकात काहीना काही जर सत्य आहे, तर या भूमंडळावर जेवढे म्हणून धर्म आहेत, ते सार्वजनिक सत्याची लेकरे आहेत, अशी माझी खात्री झाली.
जोतीराव फुले. उ० यावरून एकंदर सर्व धर्मासह त्यांच्या अनुयायी लोकांनी नमुन सार्वजनीक सत्यास साष्टांग प्रणिपात करावा, अथवा सार्वजनीक सत्याने एकंदर सर्व धर्मासह त्यांच्या अनुयायी लोकास कोणत्या तऱ्हेचा मान द्यावा? याविषयीं तुमचा तुह्मीच सरळ चोख विचार करून पाहा. असो; परंतु प्रत्येक स्त्री-पुरुष मानवाने दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान न करिता त्यास कोणत्याहि तऱ्हेचें आचरण करण्यास अधिकार जर आहे, तर तुम्ही कोणत्याहि धर्मासह त्यांच्या अनुयायी लोकांची आवडनिवड न करिता त्या सर्वाबरोबर बहिण-भावंडाप्रमाणे सत्य वर्तन करण्याचा क्रम चालू करा, ह्मणजे तुम्ही आपणा सर्वांच्या जगनियंत्यासमोर धन्य व्हाल,