भ्रष्टाचाराचा शाब्दिक अर्थ आहे भ्रष्ट पद्धती. समाजातील नैतिक मूल्ये राखून, आत्म-पूर्ततेसाठी केले जाणारे असे कृत्य भ्रष्टाचार म्हणतात. भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये भ्रष्टाचार झपाट्याने पसरत आहे. आपल्यापैकी बरेचजण देशातील राजकारण्यांना भ्रष्टाचारासाठी जबाबदार मानतात, पण सत्य हे आहे की देशातील सामान्य नागरिकही भ्रष्टाचाराच्या विविध प्रकारांमध्ये सहभागी आहेत. सध्या कोणतेही क्षेत्र भ्रष्टाचाराने अछूत नाही.
बेकायदेशीर मार्गाने पैसे कमवणे म्हणजे भ्रष्टाचार, भ्रष्टाचारात एखादी व्यक्ती आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी देशाची संपत्ती वापरते. देशाच्या प्रगतीच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. जेव्हा दोष व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात असतो तेव्हा देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढते.
• भ्रष्टाचार म्हणजे काय?
भ्रष्टाचार ही एक अनैतिक प्रथा आहे, ज्यामध्ये व्यक्ती स्वतःच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देशाला संकटात टाकण्यास वेळ घेत नाही. देशातील भ्रष्ट नेत्यांनी केलेला घोटाळा हा फक्त भ्रष्टाचारच नाही, तर गुराखी दुधात पाणी मि लणे हा सुद्धा भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे.
देशा देशातील भ्रष्टाचार
युरोपातील अनेक देशांत भ्रष्टाचाराचे अल्प प्रमाण आहे. अमेरिकेतही खालच्या पातळीवर भ्रष्टाचार होत नाही.
विविध देशांच्या कंपन्या विदेशात व्यापार करताना भ्रष्ट मार्गांचा अवलंब करतात. त्यासंदर्भात अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार या प्रकारच्या देशांत भारताला 19 वे स्थान देण्यात आले आहे. भारतातही सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उदंड चर्चा सुरू आहे. भ्रष्टाचाराच्या संकल्पनेविषयी ज्या गफलती आहेत त्यांचा यानिमित्ताने विचार करणे आवश्यक वाटते. नैतिक आणि व्यवस्था
आपण फार बुद्धिमान निष्कर्ष काढला आहे, असा आविर्भाव करीत काही लोक म्हणतात, 'लोकांची वृत्ती बदलल्याशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही.' लोकांवर सगळे लोटून देण्याएवढे सोपे काम नाही. लोकांची वृत्ती काही बदलत नाही व भ्रष्टाचार काही थांबत नाही. भ्रष्टाचार हा नैतिकतेचा विषय आहे व लोक नीतिमान झाल्याशिवाय सुधारणा घडणार नाही अशी त्यांची ठाम समजूत असते. ज्या देशात धार्मिक विचार आणि देशभक्तीचे, संस्काराचे डोस पाजून देशभक्त आणि धर्मरक्षक बनविण्याची केविलवाणी धडपड अखंडपणे चालू राहाते, तेथे भ्रष्टाचार ही नैतिक समस्या मानली जात असेल तर त्यात आश्चर्य कसले? जेथे भ्रष्टाचार कमी आहे, तेथील माणसे नीतिमान आहेत वा जेथे भ्रष्टाचार अधिक आहे, तेथील माणसे अनैतिक आहेत, असे समीकरण लावणे हास्यास्पद आहे. मुळात भारतातील भ्रष्टाचाराची समस्या ही सरळ सरळ व्यवस्थेची आहे. जेथे सरकारवरचे अवलंबन अधिक असते, कायद्यांचे जंजाळ अफाट असते व जेथील शासकीय कामांची पद्धती गुंतागुंतीची असते तेथे भ्रष्टाचाराचे पीक भरभरून येते. सरकारी व्यवस्था ही जर भ्रष्टाचाराची जननी असेल तर त्यात दुरुस्ती करणे हाच मार्ग असू शकतो. हीच व्यवस्था कायम ठेवून कितीही नैतिकतेचे डोस पाजले तरी ते पालथ्या घागरीवर पाणी ठरते.
सरकार आणि जनता 'ज्याने आयुष्यात कधी पाप केले नसेल, त्यानेच पहिला दगड मारावा.' असे तडाखेबंद सुविचार सांगून अनेक जण भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करतात. या मुद्द्याचा वापर जर आंदोलन क्षीण करण्यासाठी कोणी करीत असेल तर तो सरळसरळ कावेबाजपणा आहे. मात्र, गफलतीने कोणाची दिशाभूल झाली असेल तर त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, सरकारमधील लोकांनी केलेला भ्रष्टाचार आणि सामान्य नागरिकांच्या हातून होणारा भ्रष्टाचार यामध्ये गुणात्मक अंतर आहे. सत्ताधारी कायदे बनवतात. कायद्यात जाणीवपूर्वक अशा त्रुटी किंवा तरतुदी ठेवल्या जातात की ज्यामुळे त्यांना भ्रष्टाचार करता येतो. पुढारी आणि नोकरदारांनी संगनमत करून नागरिकांची अडवणूक करणारे जाळे विणले आहे. शिकारी ते आहेत. अडकणारे मासे सामान्य नागरिक आहेत. सामान्य नागरिक कायदा बनवत नाही. सरकारने बनवलेल्या कायद्यांचे ते बळी आहेत. काही वेळेस सरकारने बनवलेल्या कायद्यांचा लाभही उपटला जातो. मूळ दोष सरकारचा आहे. एखादी गोष्ट बेकायदेशीर असेल तेव्हा आपण तिला सामान्यपणे भ्रष्टाचार म्हणतो; परंतु अनेकदा कायदेशीररीत्यादेखील भ्रष्टाचार होत असतो. अनेक सरकारी योजना कायदेशीर भ्रष्टाचारात मोडतात. एकंदरीत सरकारी भ्रष्टाचार ही बाब जास्त चिंतेची आहे. सामान्य नागरिकांनी त्याबद्दल न्यूनगंड बाळगण्याचे काही कारण नाही. ग्रामीण आणि शहरी
दंडशक्तिप्रदान अडवणूक करण्याचे अधिकार आणि पारदर्शकतेचा अभाव ही भ्रष्टाचाराची मूळ कारणे. असे अधिकार असणारे लोक किती असतात?
शेतकरी असा व्यावसायिक आहे की आज तरी त्याच्याकडे कोणाची अडवणूक करण्याची शक्ती नाही. या देशात बहुसंख्य लोक या व्यवसायात आहेत. त्यांची पदोपदी अडवणूक होते. शेतकºयांना ज्या परिस्थितीत जगणे भाग पडले आहे तीत त्यांना कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करण्याची अनुकूलता देत नाही. मात्र, ग्रामीण भागातील पुढारी जे सत्तेचा भाग असतात वा सत्तेच्या सावलीत असतात त्यांना मात्र भ्रष्टाचाराची कारणे मिळतात. सेवा सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, कृषी उत्पन्न बाजार समित्या, अन्य सहकारी संस्था ही अशी कुरणे आहेत. शहरी भागात मात्र सत्तेच्या जवळ जाऊन, सत्तेला वाकवून, फसवून असे अनेक प्रकार होताना दिसतात. व्यवस्था आणि लोकपाल
एक काळ असा होता की जेव्हा देवाच्या भीतीने लोक चांगले वागतील अशी समजूत होती. कायदा कडक झाला की भ्रष्टाचार थांबेल ही धारणा त्याच मानसिकतेतून आली आहे. भ्रष्टाचा°यांनी देव गुंडाळून ठेवला, त्यांना कायदा गुंडाळायला किती वेळ लागेल? व्यवस्था हीच ठेवून कितीही कडक कायदा केला तरी त्याचा उपयोग होत नाही... सत्ता हे संपत्तीचे साधन न बनता सेवेचे साधन बनले पाहिजे. सत्तेच्या हातातील संपत्तीचे अधिकार कमी करा, आजूबाजूला टपून बसलेले बोके तिकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. तुम्ही शिंक्यातील लोणी बाजूला काढायला तयार नाहीत. त्याची राखण करायला लोकपाल वॉचमन नेमता. तोही माणूस आहे. रात्री-बेरात्री डोळा लागू शकतो, हे बोके एवढे सराईत आहेत की ते लोण्याच्या वाट्यात वाटेकरी करू शकतात. लोकपालही शेवटी माणूसच असणार ना! त्यापेक्षा सरकारच्या हातापासून संपत्तीची तिजोरी लांब कशी ठेवता येईल याचा विचार करणे जरुरीचे आहे. ते शक्य आहे का? होय आहे. ज्या देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अत्यल्प आहे, त्या देशात नेमके हेच केलेले दिसून येते. आपल्या देशात हजारो योजना आहेत. कशासाठी? या योजनांमुळे कोणत्या गरिबांचा उद्धार झाला? उलट गरिबी वाढत गेली. या योजना आटोपल्या पाहिजेत, थांबवल्या पाहिजेत. कारण सर्व सरकारी योजना ह्या गरिबांचे नाव घेऊन पुढारी व अधिका-यांचे उखळ पांढरे करतात हा अनुभव आहे. सरकारचा विस्तार कमी केला की त्या प्रमाणात भ्रष्टाचार कमी होतो.
भ्रष्टाचाराचे कारण
देशाचा लवचिक कायदा • भ्रष्टाचार ही विकसनशील देशांची समस्या आहे, इथे भ्रष्टाचाराचे मुख्य कारण म्हणजे देशाचा लवचिक कायदा. बहुतेक भ्रष्ट लोक पैशाच्या आधारे निर्दोष सुटतात, गुन्हेगार शिक्षेला घाबरत नाहीत.
लोभ आणि असमाधान हा असा विकार आहे ज्यामुळे व्यक्ती खूप खाली पडते. एखाद्या व्यक्तीच्या मनात नेहमी आपली संपत्ती वाढवण्याची तीव्र इच्छा असते.
सवय - एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर सवयीचा खूप खोल परिणाम होतो. लष्करी सेवानिवृत्त अधिकारी आयुष्यभर निवृत्तीनंतरही प्रशिक्षणादरम्यान मिळवलेली शिस्त पाळतो. त्याचप्रमाणे देशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारामुळे लोकांना भ्रष्टाचाराची सवय लागली आहे.
मानसा - जेव्हा एखाद्या व्यक्तीचा दृढ निश्चय असतो तेव्हा कोणतेही काम करणे अशक्य नसते, त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचे मुख्य कारण म्हणजे व्यक्तीची इच्छा.
निष्कर्ष
भ्रष्टाचार हा देशातील दीमक आहे जो देशाला आतून पोकळ करत आहे. हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे जो दाखवतो की लोभ, असमाधान, सवय आणि मन यांसारख्या विकारांमुळे संधीचा फायदा कसा घेता येईल.