कोव्हीड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीने पुन्हा IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांना समन्स बजावलं. शुक्रवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना जयस्वाल यांना देण्यात आल्या आहेत
कोव्हीड काळात मुंबईत उभारलेल्या जंबो सेंटर्सशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या संदर्भात चौकशीसाठी जयस्वाल यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र, ते गैरहजर राहिले. 1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी, जयस्वाल सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कथित कोविड जंबो सेंटर घोटाळा झाला तेव्हा जयस्वाल हे मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त होते. ईडीला जयस्वाल यांचा जवाब नोंदवायचे आहे.
ईडीने काही दिवसांपूर्वी, कथित जंबो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबईमध्ये तब्बल 15 ठिकाणी छापे टाकले. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरीही ईडीच्या छापेमारी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या जवळचे असलेले सुजित पाटकर यांच्याही घरी ईडीचे पथक धडकले होते.लाइफलाइन रुग्णालयाशी संबंधित ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले.पाटकर यांच्यासह ठाकरे गटाचे आणखी एक पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित ठिकाणीही ईडीने छापे टाकले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात माहिती देत वर्क ऑर्डरचे पत्र ट्विट केले आहे. पुणे महानगरपालिकेने सुजीत पाटकर यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकलं होतं. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने पाटकर यांच्या कोव्हीड सेंटरचे कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसेच तक्रारदेखील दाखल केली होती.
त्यानंतर काल पाटकर यांच्या घरी छापे टाकण्यात आलं. दरम्यान सोमय्या यांनी मोठी अपडेट दिली आहे.
काय आहे ट्विटमध्ये ?
किरीट सोमय्या यांनी जुलै २०२० वर्क ऑर्डची कॉपी ट्विट केली आहे. यावर बीएमसीचे आयुक्त इकबाल सिंग चहल तसेच अतिरिक्त आयुक्त या दोघांची स्वाक्षरी आहे, असं नमुद केलं आहे... या घोटाळ्यात ज्यांनी ज्यांनी साथ दिली आहे त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागणार. असा इशारा सोमय्या यांनी दिला होता. तर आता या ट्विटमुळे आयुक्त अतिरिक्त आयुक्त रडारवर येण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसेस ही कंपनी आहे. कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या कंपनीला दिलं होतं. पण त्यात मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. त्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू झाला होता. हा तपास सुरू असतानाच ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून पाटकर यांना दणका दिला.
त्यानतंर ईडीने सुजीत पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित 10 ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या दहाही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. किती तास हे सर्च ऑपरेशन चालेल याची काहीच शाश्वती नाही. मात्र, या सर्च ऑपरेशनमध्ये ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.