शाहबाद डेअरी हा दिल्लीतील गडबजलेला परिसर. लोकांची वर्दळ सुरू असताना एक माथेफिरू आला आणि काही कळण्याच्या आतच त्याने एका अल्पवयीन मुलीवर चाकूने 40 वार केले. इतकेच नाही तर मारेकऱ्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचा भला मोठ्या दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत मुलीचे नाव साक्षी रेड्डी (वय-16) असून ती अल्पवयीन आहे. तर माथेफिरूचे नाव साहील असल्याचे समजते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील रोहिणी परिसरात असलेल्या शाहबाद डेअरीजवळ ही घटना घडली. घटनेच्या आधी साक्षी आणि साहिल यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर साहिलने साक्षीवर एका मिनिटांत चाकूने 40 वार केले. इतकंच नाही तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साक्षीची भल्या मोठ्या दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. अंगाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
एका गल्लीत साहिल हा साक्षीवर चाकूने सपासप वार करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे गल्लीतून अनेक लोक जाता-येताना दिसत आहेत. परंतु एकही जण साक्षीच्या मदतीसाठी धावून आला नाही.
Delhi Shahbad Dairy Murder Case: नवी दिल्लीमधील शाहबाद डेअरी परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीची निघृण हत्या केल्या प्रकरणी आरोपी साहिलला अटक करण्यात आली आहे. या तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी लपून बसला होता. त्याने त्याच्या वडिलांना फोन केल्यानंतर त्याच आधारे त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आली. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती सोमवारी दिली. साहिलने फोन बंद करुन ठेवला होता आणि तो लपून बसला होता. त्याने फोन सुरु करुन वडिलांना फोन केला. त्यानंतर त्याच्यावर तांत्रिक टीमच्या मदतीने लक्ष ठेवण्यात आलं. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा बुलंदशहरामधील आपल्या एका नातेवाईकाकडे लपला होता
फोन केला होता बंद..
तरुणीची हत्या केल्यानंतर आपण पकडले जाऊ नये, आपला फोन ट्रेस होऊ नये म्हणून साहिलने फोन बंद करुन ठेवला होता. साहिल हा त्याच्या आत्याच्या घरी जाऊन लपला होता अशी माहिती बुलंदशहराचे अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) बजरंगबली चौरसिया यांनी दिली. साहिलला पहासू पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या अटरेना गावामधून अटक करण्यात आली.
दोघांचे हे प्रेमसंबंध...
हत्या करण्यात आलेल्या मुलीचे आणि साहिलचे प्रेमसंबंध होते. मात्र शनिवारी त्यांच्या कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. त्यानंतर ही मुलगी रविवारी सायंकाळी आपल्या मैत्रिणीच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्याच वेळी गर्दीच्या ठिकाणी साहिलने तिला गाठलं आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.
निघृण हल्ला...
साहिलने या तरुणीला एका भिंतीवर ढकललं आणि त्यानंतर तिच्यावर चाकूने वारंवार हल्ले केले. एका वृत्तानुसार साहिलने या मुलीवर चाकूने 40 वेळा वार केला. त्यानंतर जवळच पडलेला मोठा दगड उचलून रक्तबंबाळ झालेल्या या मुलीच्या डोक्यात घातला. यानंतर साहिल फरार झाला. या सर्व घटनाक्रमाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मुलीच्या घरच्यांनी ती साहिल नावाच्या मुलाला ओळखायची असं सांगितलं आणि व्हिडीओमधील मुलगा तो असल्याचं वाटतंय असंही सांगितलं.
आत्याचा फोन आणि त्याला अटक...
मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी साहिलच्या घरी छापा टाकला. मात्र तो फरार असल्याचं दिसून आलं. त्यानंतर साहिल कुठे गेला आहे यासंदर्भात चौकशी केली असता त्याच्या वडिलांनी माझ्या बहिणीने मला फोन करुन साहिल इकडे बुलंदशहरमध्ये माझ्या घरी अचानक आल्याचं सांगितलं अशी माहिती दिली. याच माहितीचा फायदा पोलिसांना झाला आणि त्यांना साहिलला अटक करता आली. साहील हा फ्रीज आणि एसी रिपेअरिंगचं काम करायचा. तो त्याचे आई-वडील आणि 3 बहिणींबरोबर राहतो. मृत मुलीच्या पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे साहिलला कलम 302 अंतर्गत हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.
महिला आयोगाने घेतली गंभीर दखल...
दिल्ली महिला आयोगाने (DCW)या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी 'दिल्ली में दरिंदों के हौसले बुलंद हैं' अशा शब्दांत ट्वीट केले आहे. यापूर्वी अशी भयावह घटना कधीच पाहिली नाही. दिल्लीतील शाहबाद डेअरीजवळ एक माथिफिरु तरुण एका अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार करतो. इतकं करून देखील तो थांबत नाही. एक भला मोठा दगड घेतो आणि तिच्या डोक्यात टाकतो. ही घटना अत्यंत क्रूर असल्याचे स्वाती मालिवाल यांनी म्हटले आहे. स्वाती मालिवाल यांनी याबाबत पोलिसांना एक नोटिस बजावली आहे. याआधी अशी भयावह घटना पाहिली नाही, असे देखील त्यांनी म्हटलं आहे.
साक्षी रेड्डीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांत भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी साहिल यांचा पोलिसा कसून शोध घेत आहेत.