पालक आणि तरुण मुलगा किंवा मुलीमधील संघर्षास दोन पिढीतील विचारांचे अंतर कारणीभूत ठरत असते. हे अंतर वेळीच कमी-जास्त केले नाही, तर पालकत्वाच्या प्रक्रियेत ठिणगी पडायला लागते. मग हा संघर्ष इतक्या टोकाला पोहोचतो, की यातून सुटका करून घेण्यासाठी तरुण मुले व मुली घर सोडायलाही तयार होतात!
दोन पिढीतील संघर्ष हा नवा मुद्दा नाही, तो आपल्याला वर्षानुवर्षे सुरू आहे, दिसूनही येतोय. या मागे बरीच कारणे आहेत. पिढीनुसार माणसांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत फरक पडतो. त्यांच्या संपूर्ण वर्तनात बदल होतो, त्यांची श्रद्धा, विशिष्ट संकल्पनांचाही कायापालट होतो. परिणामी, वेगवेगळ्या पिढीतील लोक वेगवेगळ्या पद्धतीने वागताना दिसून येतात. त्यांची विचार करण्याची पद्धतही वेगळी असते. या सर्वांचे पर्यवसान कौटुंबिक संघर्षामध्ये, न संपणाऱ्या वादांमध्ये होताना दिसून येते. कुटुंबातील तरुण यामध्ये जास्त प्रमाणात भरडले जातात. याचा तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि एकूणच वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम दिसून येतो.
काही दिवसांपूर्वी ‘सिम्बायोसिस कॉलेज ऑफ सायकॉलॉजी’मधील आमच्या विद्यार्थ्यांनी एक सर्व्हे केला. या अभ्यासात असे दिसून आले, की कौटुंबिक कलह/संघर्षामुळे तरुणांच्या मानसिक आणि वैयक्तिक आयुष्यावर खोलवर परिणाम होतो आहे. पालकांकडून मुलांवर लादलेली बंधने आणि यामुळे होणारे कौटुंबिक संघर्ष ५० टक्के तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. याचा परिणाम म्हणून ४० टक्के तरुणांना कुटुंबाबाहेर पडणे योग्य वाटते; कारण आपल्या घराबाहेर पडण्यामुळे आई-वडिलांबरोबर होणारे संघर्ष टळतील, असे त्यांना वाटते. हे सर्वेक्षण आपण ‘पॅन इंडिया’ केल्याने भारतभरातील तरुणांची मानसिकता समोर आली. संघर्षाला कंटाळलेल्या या तरुणांना कुटुंबापासून लांब अगदी दु�