केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तेव्हापासून या आजाराची जोरदार चर्चा सुरू आहे.
नुकतंच केरळ मधून एक आगळीवेगळी बातमी समोर आली आहे. एका आगळ्यावेगळ्या आजाराने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या अजाराला 'ब्रेन इटिंग अमिबा असं म्हंटल जात आहे. केरळमध्ये दूषित पाण्यात राहणारा अमीबा या मुलाच्या नाकावाटे मेंदूपर्यंत गेला आणि त्याने मेंदू खाल्ला यामुळे त्याचा मृत्यू झाला. या अमिबाचे नाव नैग्लेरिया फावलेरी (Naegleria fowleri) असून बोलक्या भाषेत याला मेंदू खाणारा अमिबा असेही म्हणतात. यामागील कारण म्हणजे मेंदूमध्ये जाऊन हा अमिबा मेंदूच्या ऊतींचा नाश करतो.
मीडिया रिपोर्टनुसार, गुरुदत्त असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो दहावीचा विद्यार्थी होता. त्याला प्राथमिक अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस संसर्ग झाला होता. त्यामुळे गुरुदत्तला ताप आणि झटके येत होते. तपासणीत संसर्ग आढळून आला. गुरु दत्त यांना १ जुलैपासून अलप्पुझा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पानवली येथील झऱ्यात आंघोळ केल्यावर हे झाल्याचे सांगितले जात आहे.
काय म्हणाले आरोग्यमंत्री ?
याप्रकरणी केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक्रवारी मुलाच्या मृत्यूची माहिती दिली. यासोबतच लोकांनी दूषित पाण्यात आंघोळ करणे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे, कारण हा अमिबा नाकातून शरीरात प्रवेश करतो. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, अमिबा साचलेल्या पाण्यात राहतो आणि नाकाच्या पातळ त्वचेतून आत प्रवेश करतो. हा संसर्गजन्य आजार नसल्याचेही त्यांनी सांगितले. हे फार क्वचितच घडते, घाबरण्याची गरज नाही. यापूर्वी अशी ५ प्रकरणे समोर आली होती. २०१६ मध्ये पहिले प्रकरण समोर आले होते. यानंतर २०१९, २०२० आणि २०२२ मध्ये प्रत्येकी एक केस आढळून आली. या सर्व बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे ही या आजाराची लक्षणे आहेत...
कुठे आढळतो हा अमिबा ?
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, मेंदू खाणाऱ्या अमिबाचे नाव नैग्लेरिया फावलेरी आहे. हे दूषित पाण्यात आढळते आणि नाकातून शरीरात प्रवेश करते. यानंतर, हळूहळू ते मेंदूपर्यंत पोहोचू लागते आणि ते मेंदूच्या ऊतींना नष्ट करू लागते. त्यामुळे प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस हा आजार उद्भवतो. प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस हा मेंदूचा दुर्मिळ संसर्ग आहे. हा संसर्ग मेंदूमध्ये पसरल्याने मेंदूला सूज येऊ लागते आणि ही स्थिती जीवघेणी बनते.
स्वतःचे संरक्षण कसे करावे? उबदार पाणवठे टाळा.
आपले नाक निर्जंतुक पाण्याने स्वच्छ करा.
पाणवठ्यांमध्ये प्रवेश करताना नाकासाठी क्लिप वापरा. नीट देखभाल न केलेले स्वामिंग पूल किंवा अन्य तलाव टाळा.
नाएग्लेरिया फॉवलेरी' म्हणजेच मेंदू खाणारा अमीबा बातम्यांमध्ये याची चर्चा झाली. कारण केरळच्या अलप्पुला गावात 15 वर्षीय मुलाचा मेंदूच्या दुर्मिळ संसर्गामुळे मृत्यू झाला. दूषित पाण्यात आढळणारा एक प्रकारचा अमीबा हे यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. हा अमीबा नाकातून मृत व्यक्तीच्या मेंदूपर्यंत पोहोचला आणि त्याचा मृत्यू झाला.