प्लास्टिकचे वाढते उत्पादन आणि धोका लक्षात घेऊन बेसल कन्व्हेन्शननुसार विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे प्लास्टिकचा कचरा, वस्तू पाठवण्यावर आळा घालण्यासाठी २०२०मध्ये नियमात दुरुस्ती करण्यात आली. २०२४ अखेरपर्यंत प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येपासून मुक्त होण्याचा उद्देश यामागे आहे. १२ जुलै हा दिवस ‘पेपर बॅग दिन' असतो. या निमित्ताने...
पेपरला गुंडाळून येणाऱ्या प्लॅस्टिकच्या पातळ दोरीचे तुकडे जमा करून पेपरवाले बिल घ्यायला आले तेव्हा त्यांना परत दिले, त्यांनी न कळून विचारलं, हे काय? अहो तुम्हाला उपयोगी पडतील पेपर बांधून द्यायला! असं सांगितल्यावर ते म्हणाले, आहेत माझ्याकडे खूप बंडल्स. असतील हो, पण कचऱ्यात कशाला फेकायचे प्लास्टिक? आता बरेच लोक जागरूक झाले आहेत हो, प्लास्टिकबद्दल, असं म्हणून फार कमी प्रमाण आहे ते असं काही आम्ही म्हणायच्या आत ते तुकडे घेऊन पेपरवाले गेले, जागृती होतेय या वाक्यानं सकाळची एक घटना आठवली. सकाळी दूध आणण्यासाठी किटली सांभाळत चालून झाल्यावर आम्ही दुकानात शिरलो. तिथली मंडळी प्लास्टिकच्या पिशवीमधून दूध, दही घेऊन जात होती. एक शाळकरी मुलगा सायकलवर आला. त्याला म्हटले, दूध घ्यायला आलायस ना, प्लास्टिकच्या पिशवीतून नेणार? काही आणलं का नाहीस? त्यावर त्यानं खिशातून पिशवी काढून दाखवली आणि म्हणाला ही कापडी पिशवी आणली आहे ना! मग प्लास्टिकची पिशवी त्या पिशवीत टाकून हसत निघून गेला. दूधवाल्याकडे घरोघर रतीब घालणारा माणूस किटली घेऊन निघत होता. त्या किटलीतही नुसते दूध आणि माप नव्हते तर प्लास्टिकच्या पिशवीत ग्राहकाच्या रतीबानुसार दूध मोजून त्या पिशव्या भरलेल्या होत्या. म्हणजे घरपोच दूध देऊनही प्लास्टिक वाचणार नव्हतेच. भाजी, फळवाल्याकडे खरेदीसाठी गेल्यावर एका हातानं प्लॅस्टिकची पिशवी बाहेर काढून