मोबाईल ही सध्या आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक अशी वस्तू ठरली आहे. किंबहुना मोबाईल Mobile ही एक जीवनावश्यक वस्तू ठरली आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही.
मोबाईल Mobile हे संपर्काचं प्रमुख साधन निर्माण झालंय. त्यामुळे मोबाईलची विशेष काळजी घेणं सध्याच्या घडीला महत्वाची बाब आहे. खास करून पावसाळ्यामध्ये Monsoon मोबाईलची विशेष काळजी घ्यावी लागते.
पावसाळ्यात अनेकदा मोबाईलवर पाणी उडण्याची किंवा मोबाईल भिजण्याची शक्यता असते. तसेच ओल्या कपड्यांमुळे किंवा बॅगेमुळे Bag मोबाईलमध्ये मॉइश्चर पकडण्याची देखील भिती असते. यासाठी पावसाळ्यामध्ये मोबाईलची खास काळजी घेणं जास्त गरजेचं असतं.
पावसाळ्यामध्ये पाण्यापासून मोबाईलचं संरक्षण करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, तसचं मोबाईल ओला झाल्यास किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यास घरच्या घरी तुम्ही कोणते उपाय करू शकता, , याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वॉटरप्रूफ केस - खास करून पावसाळ्यात मोबाईल ठेवण्यासाठी वॉटप्रूफ मोबाईल केस किंवा कव्हरचा वापर करावा. पावसाळ्याचा सिझन सुरु झाला की अलीकडे बाजारात मोठ्या प्रमाणात या केस उपलब्ध होतात. तसचं ऑनलाईन देखील तुम्ही या वॉटरप्रूफ मोबाईल केस ऑर्डर करू शकता.
या वॉटरप्रूफ मोबाईल केस ट्रान्स्परन्ट म्हणजेच पारदर्शी असल्याने तुम्हाला मोबाईल वापरताना तो प्रत्येकवेळी त्यातून
बाहेर काढणं गरजेचं नाही. तसंच अनेक केस या टच सेन्सेबल
असल्याने तुम्ही मोबाईलवर ही केस किंवा कव्हर घालून
पावसातही मोबाईल ऑपरेट करू शकता.
सील बॅग - जर तुम्हाला वॉटरप्रूफ कव्हर विकत घेणं शक्य झालं नाही तर तुम्ही अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या सील बॅग Sealed Bag For mobile देखील खरेदी करू शकता. या बॅगमध्ये देखील पाणी जात नसल्याने तुमचा मोबाईल पावसातही सुरक्षित राहू शकतो.
बॅग किंवा खिशात फोन ठेवू नका- अनेकजण पावसापासून मोबाईलचं संरक्षण व्हावं म्हणून तो बॅगेत किंवा खिशामध्ये ठेवतात. मात्र, अशावेळी जर तुमच्या फोनला वॉटरप्रूफ कव्हर नसेल तर मोबाईलमध्ये मॉइश्चर पकडण्याचा धोका वाढतो. अनेकदा पावसाळ्यामध्ये बॅग ओली राहते किंवा छत्री असूनही बॅग ओली होण्याची शक्यता जास्त असते. तसतं खिशातही जर तुम्ही भिजलात तर मोबाईल ओला होण्याचा धोका असतो.
अशात अनेकदा मोबाईल थेट पाण्याचा संपर्कात आला नाही तरी दमटपणामुळे तो बिघडण्याची शक्यता असते. यासाठी एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत किंवा सील किंवा झिप लॉक बॅगमध्ये मोबाईल ठेवून तो बॅगेत ठेवावा.
• पावसात फोनचा वापर टाळावा- पाऊस पडत असताना गरज
नसल्यास मोबाईलचा वापर करू नये. अनेकदा जोरदार पावसाच्या सरी किंवा वाऱ्यासोबत उडणाऱ्या पाण्यामुळे मोबाईल भिजू शकतो. अशात अत्यंत महत्वाचं काम असल्याल सुरक्षित जागा पाहून, जिथं पाणी पडत नसेल अशा ठिकाणी जाऊन कॉल लावावा.
IP 67 किंवा IP68 रेटिंगचा मोबाईल - स्मार्टफोन खरेदी करताना त्याची रेटिंग पाहणं गरजेचं आहे. वॉटर रझिस्टंटसाठी मोबाईलला IP 67 किंवा IP68 रेटिंग असणं गरजेचं आहे.
• स्मार्टफोन भिजल्यानंतर घ्यायची काळजी
पावसाळ्यामध्ये जर काही कारणांमुळे तुमचा मोबाईल भिजला किंवा त्यावर थोडंफार पाणी उडालं असेल तर काही गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचा फोन बिघडू शकतो.
मोबाईल ओला झाल्यास तो त्वरित तुमच्याकडे असलेल्या एखाद्या कोरड्या कापडाने ड्राय करा..
मोबाईल लगेच वापरू नका. अनेकदा मोबाईल सुरु आहे हे पाहून आपण तो वापरू लागतो. मात्र जर मोबाईलच्या आत पाणी गेलं असल्यास तो काही तासांनी देखील बिघडू शकतो.
घराबाहेर असल्यास मोबाईल घरी येईपर्यंत बंद करून ठेवा.
तसंच मोबाईलमधले सिम कार्ड, मेमरी कार्ड काढा आणि सोबत मोबाईलचं कव्हर देखील लगेचच काढून टाका.
घरी आल्यावर एका डब्यात तांदूळ घेऊन त्यामध्ये मोबाईल ठेवा. तांदूळ ओलावा शोषण्याचं काम करतो. यामुळे मोबाईलच्या आतील ओलावा दूर होईल. यासाठी २४ तास मोबाईल तांदळामध्ये ठेवा.
मोबाईल संपूर्णपणे कोरडा होत नाही तोवर तो चार्जिंगला लावू नका. तसचं हेडफोन्सचा वापरही करू नका.
अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये तुम्ही मोबाईल सुरक्षित ठेवू शकता.