मानवाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. यामध्ये प्रामुख्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होताना दिसत आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होताना दिसत आहे.
यामुळे इंटरनेट, वर्ल्ड वाइड वेब, ई-मेल, संगणक यांचा वापर खरेदी विक्री व्यवहारात अचूकता येऊन कार्यक्षमता वाढली आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माल, सेवा, पैसे आणि माहिती यांची देवाणघेवाण होऊ लागले आहे.
जगातील सर्व उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कामात अचूकता येऊन कार्यक्षमता वाढते. खरेदी आणि विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असतो.
व्यवसायाची व्याप्ती वाढत जाते. वेळेची बचत होऊन व्यवसाय वाढीस लागतो. तसेच कामगारांचे शारीरिक श्रम कमी होऊन बौद्धिक क्षमता आणि विकास वाढीस लागतो.
पारंपारिक व्यापारात जश्या क्रिया घडत असतात, तशाच ई-कॉमर्स मध्ये देखील घडत असतात. फरक फक्त इतकाच आहे की, पारंपारिक व्यवसाय पद्धतीमध्ये घडणाऱ्या क्रिया थोडा वेळ घेतात तर ई-कॉमर्समध्ये या क्रिया अतिशय जलद गतीने होत असतात.
उदाहरणार्थ. तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असल्यास घरापासून त्या दुकानापर्यंत जावे लागते. त्यानंतर त्या दुकानात वस्तू पाहून त्याबद्दल किंमत आणि दर्जा याबद्दल चौकशी करावी लागते. एकापेक्षा अधिक वस्तू घ्यायची असल्यास त्या एका दुकानात मिळतीलच असे नाही. यामुळे दुसरी वस्तू घेण्यासाठी दुसऱ्या दुकानात जावे लागेल. यामध्ये तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो.
याउलट जर ई-कॉमर्स पद्धतीमध्ये वस्तू घ्यायची असल्यास, ज्या वस्तू पाहिजेत त्याची यादी तयार करायचे. उत्पादकांनी आपल्या वस्तू वेबसाइटवर प्रदर्शित केलेल्या असतात. त्यातून आपल्याला हवी असलेली वस्तू निवडायची. ती वस्तू निवडल्यानंतर काही सेकंदात त्या वास्तूचे मूल्य आणि इतर माहिती समजते.
यानंतर ती वस्तू खरेदी करण्याचा आदेश दिल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने आपल्याला बिल मिळते. हे बिल आपण ऑनलाईन पद्धतीने भरून खरेदी करू शकतो, किंवा वस्तू आपल्या जवळ पोचल्यानंतर देऊ शकतो. त्यानंतर काही वेळाने ती वस्तू आपल्या घरपोच प्राप्त होते.
ई-कॉमर्स पद्धती मुळे आपला वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतो
• उत्पादक ते उत्पादक (B2B)
हा ई-कॉमर्स पहिला प्रकार आहे. यामध्ये दोन व्यापारी संस्थांमध्ये व्यापार होत असतो. अमेरिका, जपान, युरोपातील देश मोठ्या प्रमाणावर होत आहे.
• उत्पादक ते ग्राहक (B2C)
यामध्ये उत्पादक ग्राहकांशी थेट संपर्क साधून मालाची विक्री करतो. या व्यवहारात कोणी मध्यस्ती नसतो. त्यामुळे वर या वस्तू स्वस्त किमतीत मिळतात.
ग्राहकांना वस्तूमध्ये काही बदल हवा असल्यास तो प्रत्यक्ष उत्पादकाला कळवू शकतो. यामुळे उत्पादकाला आपल्या मालाचा दर्जा सुधारण्यामध्ये मदत होते.
• ग्राहक ते उत्पादक (C2B)
या प्रकारात ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या सेवा मिळवतो. हा प्रकार सध्या फार कमी प्रमाणात अस्तित्वात आहे. परंतु येत्या काही दिवसांत यामध्ये बदल होऊ शकतो.
उदरणार्थ. प्रवासाची तिकिटे काढणे, सिनेमा आणि नाटक यांच्यासाठी जागा आरक्षित करणे, घरातील वस्तूची दुरुस्ती आणि देखभाल करणे इत्यादी.
• ग्राहक ते ग्राहक (C2C)
यामध्ये ग्राहक त्यांच्या जुन्या वस्तू दुसऱ्याला विकत असतात. उदाहरणार्थ. OLX India माहिती काय खातो यावर ग्राहक आपले जुने फर्निचर, टीव्ही, फ्रिज, मोबाईल, लॅपटॉप, गाड्या, घर अशा विविध वस्तू मध्यस्ती किंवा मध्यस्थी नसताना ग्राहकांशी थेट संपर्क करून विकू शकतो.
∆ ई-कॉमर्स चे फायदे
1. दुकानामध्ये जाण्यायेण्याचा वेळ आणि त्रास वाचतो.
2. रोख पैसे नसले तरी व्यवहार होतो.
3. बँकेत जाऊन पैसे काढण्याची गरज नसते.
4. वस्तू घरी आणण्याचा खर्च आणि वेळ वाचतो.
5. उत्पादकाकडून माल मिळत असल्याने कमी दरामध्ये मिळतो.
6. वस्तूबद्दल आपल्या तक्रारी, बदलांच्या सूचना प्रत्यक्ष उत्पादकाला कळवता येतात.
7. पाहिजे त्या वस्तू, पाहिजे त्या दिवशी, पाहिजे त्या व्यक्तीला, पाहिजे त्या ठिकाणी भेट म्हणून पोहोचवण्याची सोय उपलब्ध होते.
8. तिकिटे आरक्षित करणे, वस्तूंची देखभाल आणि दुरुस्ती अश्या कटकटीचा वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात.
9. घरातील जुन्या वस्तूंना योग्य ग्राहक मिळणे शक्य होते.
या प्रकारच्या व्यवहारात सुट्टी नसते, त्यामुळे दिवसाचे 24 तास 10. आणि वर्षाचे 365 दिवस असे कधीही व्यवहार करता येतात.
11. ई-कॉमर्स चे फायदे मराठी माहिती – e commerce benefits in marathi (विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून)
इंटरनेटच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेमध्ये सहज प्रवेश करता येतो.
11. संपूर्ण जगातून ग्राहक मिळण्याची शक्यता निर्माण होते, त्याने व्यवसायाची व्याप्ती वाढत जाते.
12. व्यवसाय करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा व्यापारी संकुलात महाग जागा भाड्याने घेण्याची गरज नसते.
13. दुकानाच्या अंतर्गत सजावटीवर फार खर्च करावा लागत नाही.
14. दुकान चालू करण्यासाठी पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी भांडवल लागते.
15. व्यवसाय चालविण्याचा खर्च कमी येतो.
16. या पद्धतीमध्ये मध्यस्थी नसल्याने प्रत्यक्ष ग्राहकांशी संबंध येतो, यामुळे आपल्या ग्राहकाचा अभिप्राय आणि गरज सहज लक्षात येते. याचा वापर करून आपला व्यवसाय वाढविणे शक्य होते.
17. यंत्राच्या साहाय्याने व्यापार होत असल्याने त्यातील मानवी हस्तक्षेप टाळता येतो त्यामुळे अत्यंत वेगाने आणि अचूक व्यवहार करता येतात.
18. पारंपरिक पद्धतीने जाहिरात करण्यासाठी जास्त खर्च लागतो तर ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर माल प्रदर्शित करण्यासाठी कमी खर्च लागतो.
× कॉमर्स ची सुरुवात कधी झाली ?
ई-कॉमर्स ची सुरुवात इसवी सन 1982 पासून झाली.
× ई-कॉमर्स चे प्रकार किती आणि कोणते आहे ?
ई-कॉमर्स चे प्रकार चार आहेत, ते पुढील प्रमाणे.
1. उत्पादक ते उत्पादक (B2B)
2. उत्पादक ते ग्राहक (B2C)
3. ग्राहक ते उत्पादक (C2B)
4. ग्राहक ते ग्राहक (C2C)
× ई-कॉमर्स व्यवहार कोणत्या व्यापार सर्वाधिक प्रमाणात आहे ?
ई-कॉमर्स व्यवहार उत्पादक ते ग्राहक (B2C) हा व्यापार सर्वाधिक प्रमाणात आहे.
× ई-कॉमर्स व्यवहार जे कोणत्या दोन घटकांमध्ये घडून आल्याने त्या व्यवहारात b2b असे संबोधले जाते ?
ई-कॉमर्स व्यवहार जे उत्पादक ते उत्पादक या दोन घटकांमध्ये घडून आल्याने त्या व्यवहारात b2b असे संबोधले जाते.
× ई व्यवसाय म्हणजे काय ?
इंटरनेटच्या मदतीने संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने केला जाणारा व्यवसाय म्हणजे ई-व्यवसाय होय.