काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. अशातच येथील कांगपोकपीमध्ये गोळीबारा झाला. यामध्ये 2 दंगलखोर ठार झाले आहेत. तर पाच जण जखमी झाले आहेत.
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील हरोथेल गावात गुरुवारी सकाळी सुरक्षा कर्मचार्यांशी झालेल्या चकमकीत दोन संशयित दंगलखोर ठार झाले असून आणि पाच जण जखमी झाले आहेत. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आणखी एक दंगलखोर ठार झाला आहे, परंतु घटनास्थळी अधूनमधून गोळीबार होत असल्याने मृतदेह अद्याप ताब्यात मिळाला नाही. हा परिसर राजधानी इंफाळपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे.
या घटनेनंतर दंगलखोरांच्या समुदायातील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत मृतदेहासह मोर्चा काढण्याची धमकी दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यापासून रोखले. यामुळे मोर्चात सहभागी झालेले लोक हिंसक झाले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.
मणिपुरात ३ मे रोजी पहिल्यांदा हिंसाचार झाला. त्यानंतर सातत्याने हिसांचाराच्या घटना घडत आहेत. मणिपुरात गेल्या ५८ दिवासांपासून हिसांचाराच्या घटना घडत आहेत. या दोन गटाच्या हिसांचारात आतापर्यंत राज्याचं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिरेन सिंह आज दुपारी मणिपूरचे राज्यपाल अनुसुईया उईके यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करतील. राज्यात सुमारे दोन महिन्यांच्या अशांततेनंतरही त्यांना राज्यात शांतता प्रस्थापित करण्यात अपयश आले आहे.
हिंसाचारमुळे बिरेन सिंह दोन पर्याय देण्यात आले होते. एकतर राजीनामा द्या. अन्यथा केंद्र हस्तक्षेप करून ते ताब्यात घेईल. यानंतर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता.
यापूर्वी रविवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. शनिवारीच गृहमंत्री शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत 18 पक्षांची सर्वपक्षीय बैठक घेतली. बैठकीत सपा आणि आरजेडीने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यासोबतच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात आली होती.
• गोळीबारात २ दंगलखोर ठार
कांगपोकपीमध्ये गोळीबारात 2 दंगलखोर ठार झाले आहेत. तर पाच जण जखमी झाले आहेत. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आणखी एक दंगलखोर ठार झाला आहे, परंतु घटनास्थळी अधूनमधून गोळीबार होत असल्याने मृतदेह अद्याप ताब्यात मिळाला नाही. हा परिसर राजधानी इंफाळपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे.
या घटनेनंतर दंगलखोरांच्या समुदायातील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत मृतदेहासह मोर्चा काढण्याची धमकी दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यापासून रोखले.