देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. दिल्लीतील गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा श्रद्धा हत्याकांडाची आठवण झाली आहेय. मृतदेहाचे अनेक तुकडे सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.15 वाजता उड्डाणपुलाजवळ मानवी शरीराचे काही अवयव पडून असल्याची माहिती त्यांना मिळाली. अनेक ठिकाणी अवयव विखुरले होते. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
गेल्या वर्षी 27 वर्षीय श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब
पूनावाला याने गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाचे 30 हून अधिक तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि 18 दिवस लपवून ठेवले. काही अवयव फ्रिजमध्येही ठेवले. श्रद्धाच्या वडिलांनी तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर काही महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आले. आफताबला दिल्ली पोलिसांनी अटक केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.