राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत नऊ जण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर राजकारणात मोठा भूकंप आला आहेउपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं कार्यालय मुंबईत मंत्रालयासमोर ए फाईव्ह या बंगल्यात थाटण्यात येत आहे. उद्या दुपारी एक वाजता या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येईल. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नाशिकमधील राष्ट्रवादीमध्ये अनेक घडामोडी होतायंत. नाशिकमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांवर कारवाईला मूळ राष्ट्रवादी पक्षाकडून सुरूवात झालीय. काल युवक काँग्रेसच्या अध्यक्षवर कारवाई झाल्यानं आजही काहींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ
अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादी पक्षात देखील दोन गट निर्माण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट सध्या पक्षात पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून आमदारांची जमवाजमव सुरु आहे. मात्र असे असतानाच आता अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षांची सुद्धा जमवाजमव सुरू असल्याचे दिसत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील सध्या 'नॉट रिचेबल' असल्याने ते अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडानंतर आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काहींनी सध्या कोणतेही भूमिका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अशातच आता अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षांची जमवाजमव सुरू झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील कालपासून नॉट रिचेबल आहेत. ते अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता इतर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी काय भूमिका आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शहराध्यक्ष शरद पवारांसोबत?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा असतानाच, शहराध्यक्ष मात्र शरद पवारांच्या सोबत आहेत. शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबरच राहणार असल्याचे सोमवारी शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी जाहीर केले. तर शरद पवार यांचा त्याग, जनमानसातील त्यांची प्रतिमा लक्षात घ्यायला हवी. या वयात असा त्रास त्यांना व्हायला नको होता. ईडीच्या भीतीने ग्रासलेली व कमर्शियल माइंडची मंडळीच अजित पवार यांच्याबरोबर जातील. मात्र आम्ही शरद पवारांच्याच सोबत असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा छाया जंगले पाटील म्हणाल्या आहेत.
कोण आहेत कैलास पाटील?
राष्ट्रवादीचे विध्यामान जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे यापूर्वी शिवसेनेत होते. मात्र छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यावर कैलास पाटील देखील त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत दाखल झाले. पुढे त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आली. मात्र छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जातात. तर जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ते आमदार सतीश चव्हाण यांच्या खंदे समर्थक झाले. त्यामुळे भुजबळ व सतीश चव्हाण हे दोघेही अजित पवार यांच्यासमवेत असल्यामुळे कैलास पाटीलही त्यांच्यासमवेतच असणार असल्याची चर्चा आहे.
राज्याच्या राजकारणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता शिंदे गटाच्या खासदाराने देखील दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना खळबळजनक वक्तव्य केलं होतं. पहाटेचा शपथविधी हा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या सहमतीनेच झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. वेगवेगळे पक्षाचे नेते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. यावर आता शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे.
‘देवेंद्र फडणवीस १०० टक्के बरोबर’
‘ही सत्य गोष्ट आहे. आम्हाला हे माहित होतं. राजकारणात माहिती ठेवावी लागते. ही पवारांनीच केलेली खेळी होती. त्यांची पंरपरा सगळ्यांना माहित आहे. फडणवीस जे म्हणताय ते १०० टक्के खरं आहे. असा दावा देखील शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केलाय.
कोर्टाचा निर्णय आमच्याच बाजुनेच लागणार. मेजोरिटी आमच्याच बाजुने लागणार याबाबत कुठे ही शंका नाही. कायद्यानुसार निकाल आमच्याच बाजुने लागणार आहे.
‘दहा आमदार आमच्या संपर्कात’
दहा आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत. अडचणीमुळे ते समोर येऊ शकत नाहीत. पण ते म्हणतात आम्ही तुमच्यासोबत आहे.ठाकरे गटाकडे ५ आमदार उरतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘उद्धव ठाकरे यांची काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरु होती. तेव्हा आमच्याकडे ऑफर आली स्टेबल गर्व्हमेंट स्थापन करण्याची. जी काही चर्चा झाली ती शरद पवार यांच्यासोबत झाली होती. आधी गोष्टी ठरल्यानंतर त्या नंतर कशा बदलल्या हे नंतर सगळ्यांनी पाहिलं आहे.’
• याच पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत नऊ जण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर राजकारणात मोठा भूकंप आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी 35 वर्ष जनसंघ आणि भाजपसोबत राहिलो. कालच्या घटनेनी मी खूप व्यथित झालो आहे. सत्तेसाठी भाजप एवढं पडेल, एवढा राजकीय व्यभिचार करेल हे मला वाटल नव्हतं. सत्तेची लालसा हे भाजपचे धोरण आहे. ईडी ची भीती अजित पवार यांना आहे. म्हणून हे सर्व एकत्रित आले आहेत. कुठल्या तत्वाखाली एकत्रित आले नाहीत,” असं महाजन म्हणाले.